जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग २
“जेजुरी गड आणि कडेपठार” च्या मागच्या भागात आपण जेजुरी गडाची यात्रा केली. आता या ब्लॉगमध्ये आपण जेजुरी गड ते कडेपठार आणि कडेपठाराहून परत जेजुरी गड अशी यात्रा करू. जेजुरी गडावर त्यामानाने गर्दी अधिक असल्यामुळे आम्ही (म्हणजे मी आणि माझे बाबा) कडेपठाराकडे कूच करायचे ठरवले. आणि त्या दिशेने जाऊ लागलो. पादत्राणे जिथे काढली होती त्या ठिकाणी […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
कृषीधन – रिक्षातला प्रवासा आणि एक निराळाच अनुभव
देवाशप्पथ सत्य सांगेन आणि फक्त सत्यच सांगेन! पण, काही योगायोगसुद्धा इतके विचार असतात की स्वतःलाच विश्वास बसत नाही. दुसऱ्यांनी शंका घेतली तरी वाईट वाटत नाही. तसंच काहीसं झालं आज सकाळी. सोशल मिडीयावर शेतकरी वर्गातील श्रीमंत शेतकऱ्यांना उत्पन्न कर (Income Tax) लावणे अथवा न लावणे यावरून खल सुरु होता. अनेक जणांचं मत कर न लावण्याच्या बाजूने […]
त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर
त्रिशुंड गणपती – थोडी पार्श्वभूमी काही कलाकृती, काही जागा आणि काही मंदिरे दुर्दैवाने अपरिचित राहतात. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे असेच एक अत्यंत अपरिचित, दुर्लक्षित आणि अद्भुत मंदिर! १७५४ च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. हिंदू मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत. हिंदू मंदिर ही कला, श्रद्धा आणि इतिहास यांचा […]
चौकटीतले विश्व – गरज, प्रारब्ध, लाचारी आणि करुणा
चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते हे मी नवीन सांगण्याची गरज नाही. पण कधी कधी एखादा प्रसंग, मनाच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये असा काही बसतो की विचारांची ढवळाढवळ सुरु होते. काही दिवसांपूर्वी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. फिरत फिरत जंगली महाराज रस्त्यावर आलो. बालगंधर्व जवळील फुटपाथवर चालण्याची इच्छा झाली. त्यातल्या त्यात बरा भाग आहे चालण्यासाठी. आधीच काही फोटो, […]
फेरफटका – आजचा काल (Pune Street Photography)
पहाटे उठल्या उठल्या आधी खिडकीतून बाहेर बघितलं, कुठेही ढग दिसत नव्हते! ताबडतोब आवरून बाहेर पडलो. कुठे ते बाहेर पडेपर्यंत निश्चित माहित नव्हतं. बाहेर पडताना प्रभात रोडच्या दिशेने जायचं मनात होतं पण बिल्डिंगबाहेर पाय पडताच, ते सरळ अलका टॉकीज चौकाकडे चालू लागले. आणि मनातल्या मनात एक Google Map तयार झाला. अलका चौक, डेक्कन, जंगली महाराज रस्ता […]