“अनागोंदी कारभार” वाक्प्रचार “अनागोंदी कारभार” भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी जनांसाठी काही नवीन नाही! सरकार दरबारी तर अनागोंदी कारभार जणू पाचवीलाच पूजलेला आहे. सगळ्यांना या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहे. अनागोंदी कारभार म्हणजे पूर्ण अव्यवस्था, भोंगळ कारभार किंवा कशाचा कशाला मेळ नसणे! पण अनेकदा हा प्रश्न पडायचा की हा वाक्प्रचार आला कुठून? अनागोंदीचा काय अर्थ आहे? विशेषतः […]
दामाजी नाईक – अपरिचित दर्या सुभेदार!
दामाजी नाईक आणि पेशव्यांचे आरमार केवळ युद्धनौका शत्रुच्या हाती लागू नये म्हणून नौकेसकट अग्निसमाधी घेणारे शूर वीर “दामाजी नाईक”! गोष्ट आहे १७५०-६० च्या आसपासची. पण, माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जवळजवळ कोणालाच या वीर योद्ध्याचे नाव देखील माहित नसेल. जिथे पेशव्यांबद्दल माहिती नसते तिथे त्यांच्या आरमाराबद्दल माहिती असणे फारच दूर राहिलं! “पेशव्यांचे आरमार” हे शब्द […]
बाजार बुणगे म्हणजे कोण?
बाजार बुणगे .. (गैर) समज बाजार बुणगे! हे विशेषण राजकारणाच्या कर्दमी वाटांवर वारंवार ऐकायला मिळते. मी देखील बाजार बुणगे हा शब्द लहानपणापासून ऐकत, वाचत आलेलो आहोत. पण, साधारण अर्थ समजला तरीही नेमका अर्थ कधी कळला नाही. ज्या वयात वाचन कमी होते त्या काळी बाजार बुणगे, या शब्दांचा अर्थ समजून घेताना “बाजार” या शब्दावर देखील अधिक […]
दारूबंदी ! गोष्ट अमेरिकेतील “दारूबंदी”ची
दारूबंदी आणि काही प्रश्न कोणत्याही देशात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा, नेते दारूबंदी करण्याबद्दल विचार करत असतात. भारतात देखील वेळोवेळी ड्राय डे (दिवसभराची दारूबंदी) घोषित केलेले आहेत. अनेक राज्यांमध्ये कायद्याने दारूबंदी केलेली आहे. दारूबंदी बद्दल लोकांची अगदी टोकाची भूमिका ऐकायला मिळते. अर्थातच यामागे कारणे देखील आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत, […]
लघुलेखन उद्गम आणि इतिहास – सर आयझॅक पिटमन
इतिहासाची पाने चाळत असताना “सर आयझॅक पिटमन” यांचे नाव समोर आले. Onthisday च्या मते १२ जानेवारी १८९७ ला मृत्यू झाला आणि विकिपीडिया नुसार त्यांच्या मृत्यू २२ जानेवारी १८९७ रोजी झाला. इंग्रज मंडळी सुद्धा स्मृतिदिन तिथीनुसार आणि तारखेनुसार असे पाळतात की काय!? असो, विनोदाचा भाग सोडून देऊ पण, सर आयझॅक पिटमन यांच्याबद्दल माहिती वाचली तेव्हा मात्र […]
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय पालक स्नेह सम्मेलन – एक मुक्तपीठ !
पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वार्षिक पालक स्नेह सम्मेलनाला जायचा योग आला. यापूर्वीही डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने माझ्या अपेक्षा उंचावलेल्या होत्याच. विद्यार्थ्यांची स्नेह सम्मेलने होतात यात काही नवल नाही पण पालकांचे स्नेह सम्मेलन माझ्यासाठी नवीन होते. एक चांगला उपक्रम याच दृष्टीने मी या सोहळ्याकडे बघत होतो. जेव्हा एका ओळखीच्या […]
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग १
खिडक्या काळ्या कार्डबोर्डने झाकलेल्या, एक छोटा LED दिवा डावीकडच्या भिंतीवर खाली मन घालून मंदपणे जळत होता. त्याच्या खाली कॉम्प्युटर, माईक इत्यादी साधनसामग्री. धूसर काळोख दाटलेला, बाहेरचे आवाज दबलेले. वेळ दिवसाची असूनही, आत अंधार. अशांत अंधार. एका चित्रपटाच्या अनुषंगाने या साऊंड स्टुडिओ मध्ये जाण्याचा योग आला. एका फ्लॅट चे रूपांतर साऊंड स्टुडिओ मध्ये केलेले आहे. या […]
मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व
मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा […]
राम गणेश गडकरी आणि दुतोंडी मराठी कलाकार
३ जानेवारी २०१७, पुण्यातील छ. संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. ज्यांनी विटंबना केली त्यांचा कला, लेखन, वाचन, इतिहास या विषयांशी सुतराम संबंध नाही, नव्हता. ज्या संघटनेने त्यांची पाठराखण केली त्यांना तर ब्राह्मणद्वेषाचा विषडोह म्हणायला हरकत नाही. शक्यतो “शब्दयात्री”वर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही पण समाजाच्या दृष्टीने जे घटक आहे […]
“कोरेगाव भीमा”चे युद्ध, ऐतिहासिक नोंदी, वास्तव आणि प्रश्न
कोरेगाव भीमा येथे लढले गेलेले मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्ध राजकीय कारणांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या बाजूने या युद्धाचे नेतृत्व बाजीराव पेशवे द्वितीय करत होते. इंग्रजांच्या बाजूने एल्फिन्स्टन नेतृत्व करत होता. या युद्धाबद्दल ज्याला जे पसरवावंसं वाटतं तो ते पसरवतो. आणि आवाज चढवून बोलणाऱ्या किती जणांनी या युद्धासंदर्भात उपलब्ध असलेली ऐतिहासिक साधने अभ्यासलेली असतात हे […]