कोरेगाव भीमा येथे लढले गेलेले मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्ध राजकीय कारणांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या बाजूने या युद्धाचे नेतृत्व बाजीराव पेशवे द्वितीय करत होते. इंग्रजांच्या बाजूने एल्फिन्स्टन नेतृत्व करत होता. या युद्धाबद्दल ज्याला जे पसरवावंसं वाटतं तो ते पसरवतो. आणि आवाज चढवून बोलणाऱ्या किती जणांनी या युद्धासंदर्भात उपलब्ध असलेली ऐतिहासिक साधने अभ्यासलेली असतात हे तो परमेश्वरच जाणे. असो. इतिहासाचे विद्यार्थी या नात्याने भावना आणि इतिहास यांची गल्लत शब्दयात्री मध्ये होणार नाही ही खात्री आम्ही नक्कीच देऊ इच्छितो. या कोरेगाव भीमा येथे लढले गेलेल्या युद्धाबद्दल मध्यंतरी काही पुस्तके वाचनात आली. त्यातील तपशील इंग्रजीत आहे. त्या मजकुराचा मराठी अनुवाद वाचकांपुढे मांडत आहोत.
ज्यांना इतिहास, वास्तव आणि तर्क समजून न घेता केवळ भावनिक होऊन आपले पूर्वग्रह जोपासायचे आहेत त्यांनी हा ब्लॉग नाही वाचला तरीही “चालेल”. कृपया इथूनच या ब्लॉगचे वाचन सोडून द्या. कारण इथून पुढे इतिहास, वास्तव, आणि तर्क यांचा प्रदेश सुरु होतो! ज्याच्याशी कदाचित तुमचा परिचय झालेला नसेल…
“एल्फिन्स्टन”ची नोंद
J. S. Cotton या ब्रिटिश इतिहासकाराने आपल्या “Rulers of India” – Mountstuart Elphinstone” या पुस्तकात एल्फिन्स्टन याच्या नोंदवहीतील काही नोंदी दिलेल्या आहेत. माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ने मराठ्यांच्या विरोधातील युद्धात इंग्रज फौजेचे नेतृत्व केले होते. अर्थातच त्यामुळे, त्याच्या नोंदीला फार महत्व आहे. याची दोन मुख्य करणे म्हणजे एल्फिन्स्टन कोरेगाव भीमा युद्धाच्या वेळेस त्याच भागात होता, सैन्याचे नेतृत्व करत होता. तो स्वतः अधिकारी असल्यामुळे त्याला मिळालेली माहिती अधिकृत असली पाहिजे हे समजणे मुळीच चुकीचे ठरणार नाही. दुसरे महत्वाचे कारण भारतीयांच्या गुलाम मानसिकतेत आहे. ते म्हणजे आपण आपल्या लोकांनी सांगितलेल्या इतिहासापेक्षा “परकीयांनी” सांगितलेल्या इतिहासावर जास्त विश्वास ठेवतो. त्यातून एल्फिन्स्टन अशा लढ्याचे नेत्रीत्व करत होता, ज्यात पेशव्यांचा पाडाव झाला, त्यामुळे त्याचे शब्द नाकारणे म्हणजे आपल्याच रचलेल्या व्याख्यांना छेद देण्यासारखं आहे.
“Rulers of India” – Mountstuart Elphinstone” या पुस्तकातील एल्फिन्स्टन कोरेगाव भीमा युद्धाबद्दल लिहिलेला मजकूर खालीलप्रमाणे.
'Our men could not be got to storm. The Europeans talked of surrendering. The native officers behaved very ill; and the men latterly could scarce be got, even by kicks and blows, to form small parties to defend themselves. Most that I have seen tried to excuse themselves and are surprised to find that they are thought to have done a great action: yet an action really greater has seldom been achieved a strong incitement never to despair.’
त्या मजकुराचा मराठी अनुवाद खालील प्रमाणे
आमचे लोक वादळाला तोंड देण्यास समर्थ नव्हते. युरोपियन (सैनिक) आत्मसमर्पण करण्याबद्दल बोलत होते, स्थानिक अधिकारी (भारतीय) चांगले वागले नाहीत आणि (इतर) माणसे (सैनिक) तर मारून मुटकून देखील छोट्या छोट्या तुकड्या करून स्वतःचे संरक्षण करायला सिद्ध होऊ शकत नव्हते. मी भेटलेल्यांपैकी बहुतेक लोक स्वतःसाठी क्षमायाचना करत होते आणि त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले की त्यांच्या कृत्याला लोक "महान कृत्य" समजत आहेत, जरी (खरं सांगायचं तर) या कामगिरीला क्वचितच लाभणारी, कधी कमी न पडणारी उत्तेजना लाभलेली आहे.
“कोरेगाव भीमा”चे युद्ध – नोंद १
J. S. Cotton च्या “Rulers of India” – Mountstuart Elphinstone” याच पुस्तकात कोरेगाव भीमा येथे झालेल्या मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्धाचा काही तपशील दिलेला आहे. तो खालील प्रमाणे
In the second month of the war, when the Peshwa's army was still unsubdued, and when its precise position was unknown, was fought the battle of Koregaon, which is still remembered with pride by the Bombay Army. A weak battalion of Sepoys, less than 500 strong, had been injudiciously summoned from Sirur to reinforce the garrison at Poona. After marching all one night it found itself in the morning on the river Bhima, face to face with the whole army of the Peshwa. Baji Rao himself, with his Sardars, sat on a hill two miles off, to witness the battle. Cut off from their only water-supply in the river, the little force entrenched itself in the village of Koregaon, where through the whole of the day and part of the following night it resisted the attacks of the enemy. The Maratha horse repeatedly charged into the village, which was also searched by showers of rockets; but the most formidable opponents were found in the Arab sharpshooters, of whom we hear much during this war. Besides terrible sufferings from thirst, hunger, and fatigue, the Sepoys lost more than half their number in killed and wounded, including six British officers out of eight. At last, when the situation seemed desperate, the enemy’s fire began to slacken, and they were presently in full retreat, alarmed by the news of General Smith’s approach. Elphinstone accompanied the general to the scene two days afterwards.
या नोंदीचा मराठी अनुवाद खालीलप्रमाणे
युद्धाचा दुसरा महिना येऊन ठेपलेला होता, पेशव्यांचे सैन्य अजूनही पराजित झालेले नव्हते, आणि जेव्हा त्या सैन्याचा निश्चित ठाव ठिकाण माहित नव्हता तेव्हा कोरेगाव भीमा चे युद्ध लढले गेले, जे अजूनही बॉम्बे सैन्यबलाकडून आदराने स्मरले जाते. ५०० सैनिकांची एक तुकडी, अचानकपणे शिरूरहून पुण्याच्या रक्षणार्थ मागवण्यात आली. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी भीमा नदीच्या किनारी या तुकडीचा सामना पेशव्यांच्या सैन्याशी झाला. बाजीराव (द्वितीय) आणि त्यांचे सरदार जवळ २ मैल अंतरावरच्या टेकडीवरून युद्ध बघत होते. पाण्याची रसद संपलेली असताना (इंग्रजांच्या) सैन्याने कोरेगाव भीमा या गावी आसरा घेतला, जिथे संपूर्ण दिवस आणि रात्रीच्या काही घटका या सैन्याने शत्रूच्या (मराठे) सैन्याचा प्रतिकार केला. मराठ्यांचे घोडदळ सतत गावाकडे चाल करून येत होते, ज्याच्या बरोबर रॉकेटचा मारा देखील होत होता. पण, सगळ्यात जास्त कडवे प्रतिस्पर्धी अरबी बंदूक निशाणेबाज होते युद्धात ज्यांच्याबद्दल अधिक ऐकायला मिळाले. भयंकर तहान, भूक आणि थकवा यांच्याबरोबर (इंग्रजांच्या) सैन्यातील अर्ध्याहून अधिक सैनिक मृत्युमुखी पडले अथवा जखमी झाले, ज्यात ८ पैकी ६ ब्रिटिश अधिकारी देखील होते. अखेर अत्यंत निर्णायक आणि नाजूक वेळ आली असताना, जनरल स्मिथ यांच्या येण्याची खबर लागताच, शत्रूचा (मराठे) मारा कमी होत गेला आणि ते संपूर्णतः परतले. एल्फिन्स्टनने दोन दिवसांनंतर जनरल (स्मिथ?) या जागेला भेट दिली.
“कोरेगाव भीमा”चे युद्ध – नोंद २
प्रतुल सी गुप्ता यांच्या “Baji Rao II and the East India Company: 1796 – 1818” या प्रबंधात देखील या युद्धाबद्दल थोडे विस्ताराने लिहिलेले आहे. Phd साठी १९३९ साली युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे हा प्रबंध सादर करताना, गुप्ता यांनी वेगवेगळ्या साधनांमधील मजकूर एकत्र करून वाचकांसमोर मांडलेला आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने देखील या प्रबंधाला स्वीकृती दिलेली आहे. या प्रबंधातील कोरेगाव भीमा च्या युद्धाबद्दलचा मजकूर खालीलप्रमाणे.
The news of Baji Rao’s advance near Poona caused great consternation in the city. It was believed to be the Peshwa’s object to capture Poona. Colonel Burr, who had been left for the protection of the city, had with him 2,000 sepoys, 200 Europeans and 300 irregular horse. On the 28th December, Lieutenant-Colonel Cunningham arrived at Poona with 1,700 irregular horse, to have his troops mustered and paid. On the 30th December, Burr learnt that the van of the Peshwa’s army had arrived at Chakan, eighteen miles from Poona. At midnight he applied to Sirur for the assistance of the 2nd Battalion, 1st Regiment, and any cavalry that could be spared. Accordingly, a detachment consisting of the 2nd Battalion, 1st Regiment, about 500 strong, with four officers and an assistant surgeon, twenty-five of the Madras artillery with one officer and one assistant surgeon and 300 auxiliary horse, the whole under Captain Staunton, left Sirur on the evening of the 31st December. On the next morning the British troops were suddenly confronted by the whole of the Peshwa’s army on the other side of the river Bhima. Captain Staunton took cover in the village of Koregaon, but the Peshwa a Arabs and a body of horse forded the river and entered the village. The fighting continued throughout the day. Tired after a long march, and cut off from the river, the Company’s sepoys fought with admirable gallantry. In the evening their position became desperate. But luckily the Peshwa feared General Smith’s approach and retreated. By nine o clock the firing ceased. On the English side the number of killed and wounded in the battalion and the artillery was 175 men and four officers. In the auxiliary horse the loss was 96 men and one officer killed or wounded.
“कोरेगाव भीमा”चे युद्ध – नोंद ३
खालील मजकूर डॉ. बाबासाहेब आंबडेकर लेखन आणि भाषणे खंड – १९ या पुस्तकातील परिशिष्ट ९ – “कोरेगावचा जयस्तंभ” मधील आहे.
कॅप्टन स्टॉटन पेशव्यांच्या सैन्याचा कसा पाडाव करता येईल याचा व्यूह रचीत होता. त्याने पेशव्यांच्या सैन्याला हुलकावण्या देऊन कोरेगांव खेड्यांत प्रवेश केला. या गावाला मातीचे कुसू होते. हे कुसू आणि गावातील घरे यामुळे पेशव्यांच्या घोडदळाला गावात शिरून लढाई करणे कठीण होते, हे स्टॉटनने हेरून, गाव आपल्या ताब्यात घेतला, आणि भीमा नदीच्या किनाऱ्यावर आणि शिरूरला जाणाऱ्या रस्त्यावर, जेथून पेशव्यांच्या सैन्यावर अचूक मारा करता येईल अशा ठिकाणावर त्याने दोन तोफा डागल्या. गावाच्या मध्यभागी जी गढी होती तिच्यावर त्याने तोफ डागली नाही. त्यामुळे पेशव्यांचे सैन्य गावात शिरतांना त्यावर तोफेचे गोळे झाडून तो सैन्याचा ग्रामप्रवेश थांबवू शकला नाही. त्यामुळे गावातील चकमकीत त्याला आपले बरेचसे सैनिक गमवावे लागले. पेशव्यांच्या सैन्यांत अरब, गोसावी आणि मराठे यांचा भरणा होता. तेही चांगले लढवय्ये होते. त्यांच्या माऱ्यापुढे इंग्रज सैनिकांची अनेक वेळा कच खाल्ली. त्यांची झोप उडाली, तहानभूक हरपली आणि ते शत्रूला शरण जांऊ या म्हणून ओरडू लागले. लेफ्टनंट चिशोल्म आणि इतर अधिकारी स्टॉँटनला पुनः पुनः तेच सुचवू लागले. घनघोर युद्धांत तरुण अधिकारी लेफ्टनंट पॅटिन्सन आणि लेफ्टनंट चिशोल्म हे या लढाईत कामी आले. चिशोल्मच्या देहाचे शत्रूनी तुकडे तुकडे केले होते. त्याकडे लक्ष वेधवून, स्टॉटन आपल्या सैनिकांना सांगत होता की तुम्ही जर शत्रूला शरण गेलात तर तुमचा किती छळ करतील हे तुम्ही या तुकडे करण्यावरून लक्षांत घ्या व प्राणपणाने लढा ; मरण पत्करा पण शरण जाऊ नका. मग इंग्रज सैनिकांनी निकराचे हल्ले चढविले. आणि १ जानेवारी १८१८ ला रात्री ९ वाजता पेशव्यांच्या सैन्याने पळ काढला. इंग्रज सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला तो भीमा नदीपर्यंत. नदीतील पाणी पिऊन त्यांनी आपली २५ तासांची तहान भागविली. पेशव्यांच्या सैन्याला पळ काढावयास लावणारी जी प्रमुख तुकडी होती ती सर्व महार सैनिकांची होती. त्यांनी आपल्या ४० पट संख्येने असलेल्या पेशव्यांच्या सैन्याला पळवून लावले. हे महारांचे शौर्य पाहून बाकीच्या पेशव्याच्या सैन्याचा धीर खचला व सर्वच सैन्य पळू लागले. इंग्रजांच्या एकंदर ८३४ (सैनिक व अधिकारी) लढवय्यापैकी २७५ लढवय्ये मेले अगर जखमी झाले. आणि पेशव्याचे सुमारे ६०० लोक कामास आले.
युद्ध आणि वास्तव
विविध राजकीय कारणांसाठी (स्वार्थांसाठी) या युद्धाचा उल्लेख केलेला दिसून येतो. इतिहासाबाबत कोणी कुणाचे शब्द प्रमाण मानायचे हे आम्ही वाचकांवर सोडतो. पण, इतिहासाच्या दृष्टीने समकालीन लिखित पुरावे, हेच इतिहासाच्या दृष्टीने वैध आणि योग्य मानले जातात. इतिहासाचा विचार करताना इतिहासकारांनी कोणत्या साधनांचा आधार घेऊन इतिहास मांडला आहे हे बघणे नितांत आवश्यक आहे. नाहीतर ऐकिवात गोष्टी देखील इतिहास म्हणून खपवल्या जाऊ शकतात. इतिहासकार कोण आहे आणि कोण नाही? याची परीक्षा त्याने दिलेल्या प्रमाणांवरूनच ठरते भावनांवर नाही. इतिहास निष्ठुर आहे आणि कितीही झाकला तरीही आपले डोके वर काढतोच.
इतिहासकार कोण आहे आणि कोण नाही? याची परीक्षा त्याने दिलेल्या प्रमाणांवरूनच ठरते भावनांवर नाही. इतिहास निष्ठुर आहे आणि कितीही झाकला तरीही आपले डोके वर काढतोच.
कोरेगाव भीमा चे युद्ध घडले हे वास्तव आहे. युद्ध ब्रिटिश आणि मराठे यांच्यात घडले हे वास्तव आहे. मराठ्यांच्या सैन्याचे नेतृत्व बाजीराव पेशवे द्वितीय करत होते हे देखील वास्तव आहे. पण मराठ्यांच्या सैन्यात सगळेच पेशवे नव्हते, फक्त एकाच समाजाचे सैनिक नव्हते तर निरनिराळ्या समाजातील सैनिक होते. इतकेच नव्हे तर अरब सैनिक देखील होते! हे सुद्धा वास्तव आहे. ब्रिटिशांच्या सैन्यात फक्त भारतीय सैनिक नव्हते, फक्त महाराष्ट्रातील सैनिक नव्हते हे एक वास्तव आहे. कोरेगाव भीमा मधील ब्रिटिश सैन्याने मराठ्यांच्या सैन्याचा सामना केला हे वास्तव आहे. मराठ्यांचे सैन्य, जनरल स्मिथ आपले सैन्य आपले सैन्य घेऊन येत आहे हे समजल्यावर दुसऱ्या दिशेने निघून गेले हे पण वास्तव आहे. त्यावर एल्फिन्स्टन ने लिहिलेले प्रत्यक्षदर्शी वास्तव वर नमूद केलेले आहेच.
या वास्तवांच्या आधारावर “कोरेगाव भीमा” च्या युद्धाबद्दल जे काही संभ्रम “सत्य” म्हणून पसरवले जातात त्यांची शहानिशा वाचकांना सहज करता येईल.
“कोरेगाव भीमा”चे युद्ध आणि प्रश्न
आत्तापर्यंत कोरेगाव भीमा येथे लढल्या गेलेल्या युद्धाबद्दलचे वास्तव आणि संभ्रम यातला फरक वाचकांच्या लक्षात आला असेल अशी आशा करतो. भारताच्या इतिहासात बाहेरून आलेल्या आक्रमणकर्त्यांना स्वकियांविरुद्ध मदत करणे हे नवीन नाही. पण पूर्वीच्या काळी त्याचा आधार राजकीय असे. इंग्रजांच्या बाबतीतही हेच सत्य आहे. क्वचितच असे घडते की आक्रमणकर्त्यांना मदत करणार्यांचा गौरव केला जातो. समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रांत वारंवार या युद्धाचा उल्लेख जातीयवादी चष्मा घालून केला जातो. प्रत्येक गोष्टीला, घटनेला जाती-समूह या दृष्टिकोनातून बघणे इतिहासाच्या, तर्काच्या तसेच समाजाच्या दृष्टीने घातक आहे, हे खरे तर समाजसुधारकांनी सांगितले पाहिजे. पण जिथे तथाकथित समाजसुधारकच या युद्धाचा आपल्या राजकारणासाठी वापर करत असतील तिथे काय अपेक्षा करायची? असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर, युद्धाबद्दल संशोधन करत असताना काही प्रश्न मनात आले ते वाचकांसमोर मांडत आहोत, ज्याची उत्तरे वाचकांनी स्वत: शोधायची आहेत.
- ब्रिटिशांना शत्रू मानायचे की नाही?
- शत्रू मानायचे असल्यास त्यांच्या बाजूने लढणारे कोण होते? शनिवारवाड्यावरील मराठ्यांचा भगवा उतरवणारे आणि त्यांना उतारवण्याला मदत करणारे कोण होते?
- शत्रू मानायचे नसल्यास ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे उदा झाशी ची राणी, तात्या टोपे इत्यादी मंडळी आपले नायक कसे?
- तसेच ज्या राज्यकर्त्यांनी ब्रिटिशांचे मांडलिकत्व पत्करले त्यांच्याबद्दल काय म्हटले जावे?
- आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक याच ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध करत होते, लढा देत होते जेव्हा हे कोरेगाव भीमा चे युद्ध लढले गेले. मग उमाजी नाईक यांच्या त्यागाबद्दल काय म्हणाल?
- कोरेगाव भीमा चे युद्ध पेशव्यांच्या विरोधात लढले गेले होते का?
- वरील नोंदींवरून हे स्पष्ट आहे की ब्रिटिशांचे सैन्य युद्ध करायला चालले नव्हते तर, पुण्याच्या दिशेने निघाले होते.
- युद्धाची सुरुवात मराठ्यांनी केली आणि ब्रिटिशांच्या सैन्याने त्याचा प्रतिकार केला
- मराठ्यांच्या सैन्याचे नेतृत्व बाजीराव पेशवे द्वितीय करत होते म्हणून ते पेशव्यांचे सैन्य होते का?
- मराठ्यांच्या बाजूने अनेक समाजातील सैनिक तसेच अरबी सैनिक लढत होते, पेशवे फक्त एकच होते. ते म्हणजे बाजीराव पेशवे द्वितीय.
- असे असेल तर या पूर्वी पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लागल्या गेलेल्या सगळ्या लढाया आणि युद्ध पेशव्यांनी लढले असे म्हणावे का? त्यांना मिळालेले यश केवळ पेशव्यांचे होते किंवा विशिष्ट समूहाचे होते असे म्हणावे का?
- या युद्धाला जातींच्या चष्म्यातून बघणे कितपत योग्य आहे?
- मराठ्यांच्या बाजूने केवळ एका विशिष्ट समूहाचे सैन्य लढत नव्हते हे उघड आहे.
- तसेच ब्रिटिशांच्या सैन्यातही फक्त महाराष्ट्रातील विशिष्ट समाजातील सैनिक नव्हते हे वास्तव आहे.
- असे असताना या युद्धाकडे एका समाजाने दुसऱ्या समाजाच्या अन्यायाविरुद्ध पुकारलेले बंड म्हणणे कितपत तर्कसंगत आहे?
- जर असे मानले तर मराठ्यांच्या बाजूने, एक विशिष्ट समूह सोडल्यास बाकी जे सैनिक लढत होते त्यांनी देखील हा अन्याय केला होता का?
- ब्रिटिशांच्या सैन्यात काही मद्रास चे सैनिक आणि काही ब्रिटिश सैनिक व अधिकारी होते. त्यांच्यावर पेशव्यांनी कोणता अन्याय केलेला होता?
- मुळात ब्रिटिशांचे सैन्य हे युद्ध करायला चाललेच नव्हते तर, याला युद्ध पुकारलं किंवा बंड पुकारलं म्हणणं तर्कसंगत आहे का?
- महाराष्ट्रात मराठे आणि इंग्रज यांच्यात अनेक लढाया झाल्या. केवळ याच युद्धाला जातींच्या चष्म्यातून का बघितले जाते? यात कोणाचा फायदा आहे?
- या युद्धाबद्दल अनेक आकडे सत्य म्हणून समाज माध्यमांवर फेकले जातात, “सत्यशोधक” म्हणवणाऱ्या मराठी समाजाने त्यांना कधी दाखले, पुरावे मागितले आहेत का? नसेल तर कोणत्या आधारावर आपण स्वतःला सत्यशोधक म्हणवून घेत आहोत?
भावनिक न होता इतिहासातील सत्ता संघर्षातील युद्धाचा प्रसंग याच अर्थाने आम्ही कोरेगाव भीमा च्या युद्धाकडे बघतो. याच्यापलीकडे जे काही सांगितलं जातं अथवा पसरवलं जातं ते निव्वळ “राजकीय स्वार्थ” आहेत!