“सुंदरा मनामध्ये भरली” या सुप्रसिद्ध लावणीचे रचनाकार शाहीर रामजोशी! महाकवी मोरोपंत यांनी ज्यांना कविप्रवर म्हणून संबोधले ते रामजोशी. ज्यांच्या काव्यावरून केशवकरणी हा छंद निर्माण झाला ते शाहीर रामजोशी. राम जगन्नाथ जोशी म्हणजेच शाहीर रामजोशी, पेशवेकाळातील एक उत्तुंग कवी, कीर्तनकार. “वेदशास्त्रसंपन्न शाहीर” म्हणवण्याचा मान बहुदा रामजोश्यांनाच मिळू शकेल. सोलापूर येथे एका वेदोक्त ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला […]
केशवकरणी वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – केशवकरणी वृत्त प्रकार – मात्रावृत्त वृत्त मात्रा संख्या – ध्रुवपद : २७, १६ आणि कधीकधी अंतरा २१ मात्रांचा मात्रांची विभागणी – ध्रुवपदात पहिल्या चरणात २७ आणि दुसऱ्या चरणात १६ मात्रांच्या विभांगामध्ये विभागले जाते. काही काव्यांमध्ये सगळे काव्य अशाच मांडणीत असते. काही काव्यांमध्ये ध्रुवपद वरीलप्रमाणे आणि अंतऱ्यातील चरणे २१ मात्रांच्या असतात. यति – […]
नको देवराया – संत कान्होपात्रा यांची मूळ रचना आणि भावार्थ
संत कान्होपात्रा, महाराष्ट्रातील महान संत परंपरेतील एक अत्यंत आदरणीय नाव. पांडुरंग परमेश्वराने जिचे प्राण आपल्या स्वरुपामध्ये मिळवून घेतले ती संत कान्होपात्रा. आपला जन्म कुठल्या कुळात आणि समाजात व्हावा हे आपल्या हाती नसते. पण, आपल्या जन्माचे सार्थक ईश्वरभक्तीने कसे करावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे, संत कान्होपात्रा! एका गणिकेच्या पोटी जन्म झाला पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल […]
वसंततिलका वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – वसंततिलका वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २१ वृत्त अक्षर संख्या – १४ गणांची विभागणी – त, भ, ज, ज, ग, ग यति – नियम – वसंततिलका वृत्तात त भ ज ज ग ग गण आणि शेवटी एक ग (गुरू) म्हणजे – – U | – U U | […]
मंदारमाला वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – मंदारमाला वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – ३६ वृत्त अक्षर संख्या – २२ गणांची विभागणी – त, त, त, त, त, त, त, ग यति – ४ थ्या, १० व्या ,१६ व्या आणि २२ व्या मात्रेवर नियम – मंदारमाला वृत्तात सात त गण आणि शेवटी एक ग (गुरू) म्हणजे […]
संत मुक्ताबाई यांचा अभंग – प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण
संत मुक्ताबाई, साक्षात मुक्तीचा मार्ग! ज्ञानदेवांना “ताटी उघडून” विश्वाला उपदेश द्या सांगणाऱ्या संत मुक्ताबाई! त्यांना आपण प्रेमाने मुक्ताई देखील म्हणतो. संत मुक्ताबाई यांनी देखील अभंग रचले. अद्वैतावर त्यांचे भाष्य विचार करायला लावणारे आणि गूढ आहे. प्रत्येक शब्द जणू शिवधनुष्य आहे. खऱ्या अर्थाने ज्याला इंग्रजीत आपण “Mystic” म्हणतो तशा मुक्ताई आहेत. त्यांच्याच अभंगाच्या संग्रहातील एक अप्रतिम […]
प्रारंभी विनती करू गणपति – गणेश स्तोत्र । गोसावीनंदन
चिंचवडचे मोरया गोसावी सर्वविख्यात गणपती भक्त आणि गाणपत्य पंथाचे मुख्य आहेत. त्यांनी गणपती वर अनेक श्लोक आणि आरत्या रचल्या. त्यातील काही प्रसिद्ध “शेंदूर लाल चढायो” आणि “नानापरिमळ दूर्वा“. पण याखेरीजही अशी अनेक स्तोत्रे आणि श्लोक आपण लहानपणापासून ऐकत अथवा म्हणत आलेलो आहोत, जी खरं तर मोरया गोसावी यांनी रचली आहेत हे देखील लक्षात राहात नाही. […]
शार्दूलविक्रीडित वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – शार्दूलविक्रीडित वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – ३० वृत्त अक्षर संख्या – १९ गणांची विभागणी – म, स, ज, स, त, त, ग यति – १२ व्या मात्रेवर नियम – शार्दूलविक्रीडित वृत्तात म, स, ज, स, त, त, ग गण येतात य म्हणजे – – – । U U […]
भुजंगप्रयात वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – भुजंगप्रयात वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २० वृत्त अक्षर संख्या – १२ गणांची विभागणी – य, य, य, य यति – १० व्या मात्रेवर नियम – भुजंगप्रयात वृत्तात चार य गण येतात य म्हणजे U– | U– | U– | U– म्हणजे १२२ । १२२ ।१२२ । १२२ […]
कामदा वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – कामदा वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त वृत्त मात्रा संख्या – १६ वृत्त अक्षर संख्या – १० गणांची विभागणी – र, ज, य, ग यति – निश्चित नियम नाही नियम – कामदा वृत्तात रा, य, ज, ग गण -U- | U– | U-U | – म्हणजे २१२ । १२२ ।१२१ । २ कामदा बद्दल […]