या माझ्या चालण्या, थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराचं कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खरं तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके […]
मस्तानी – स्वरचित कविता
मस्तानी.. मस्तानी इतकी अवांछिलेली, दुस्वास सहन केलेली स्त्री इतिहासात क्वचितच आढळेल. जिच्या सौंदर्याबद्दल लोकांनी बरंच काही लिहिलेलं आहे, चितारलेलं आहे अशी ही मस्तानी. यवनी गर्भात उमललेली हिंदुस्थानी गुलाबाची कळी. जिच्या सौंदर्याला आणि शौर्याला वास्तवाच्या काट्यांची वेढलेले आहे. राजकारणाच्या खेळात तिचा हात राऊंच्या हाती दिला गेला खरा पण राऊंना देखील याची कल्पना नव्हती की राजकारण म्हणून […]
चेहरा बोलतो.. फक्त ऐकता आलं पाहिजे
आज २९ ऑगस्ट, इन्ग्रिड बर्गमन यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन सुद्धा. इन्ग्रिड बर्गमन मला आधीपासून माहित होतीच पण तिचा आणि माझा, माझ्या माहितीपेक्षा अधिक जवळचा संबंध आहे हे नंतर समजलं. माणिक गोडघाटे नावाच्या कवीने स्वतःसाठी “ग्रेस” हे टोपणनाव का निवडले? याबद्दल मला कायम कुतुहल वाटायचे. त्याचे उत्तर ग्रेसने एका मुलाखतीत दिले. की इन्ग्रिड बर्गमन यांचे वर्णन […]
नमन स्वातंत्र्यवीरा
काही लोकांना सूर्याचं अस्तित्व मान्य नाही म्हणून मी त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, हा त्या सूर्याचा अपमान आहे. सूर्य स्वयंसिद्ध आहे!
म्हणूनच आणि इथेही तिथेही
एकटेपणा आणि एकान्त यात निश्चित फरक आहे. एकटेपणा ही एक मानसिक अवस्था आहे पण एकांत ही परिस्थितीतून निर्माण झालेली वास्तविकता आहे. पण या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा लक्षात येतं की लिहिणारे ही आपणंच बोलणारे ही आपणंच करणारे ही आपणंच .. स्वतःला सावरणारे ही आपणंच कारण या संगमावर मानसिक अवस्था आणि वास्तविकता या दोन […]
कावळे
गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या […]
शिवछत्रपती
देशी गनिमी उत्पात । स्वकीयांनी केला घातराहिली ना अब्रू घरात । जावे कोठे ?।। देवळे जाहली माती । संतांच्या जाळील्या पोथीस्वधर्म सोडूनी जाती । केविलवाणे ।। मावळ रक्तात न्हाता । सह्याद्री क्षीण होताजाहली तयांची माता । शिवनेरी ।। सांडोनी स्वतःचे जगणे । हिंदवी राज्य कारणेराज्याची बांधिली तोरणे । कडेकपारी ।। कुणी उमराव सरदार । पातशाहीचे […]