December 2, 2024
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

Spread the love

कोणत्याही आरतीच्या शेवटी ही लोटांगण आरती गायली जातेच. ती “घालीन लोटांगण” आरती खाली देत आहोत.

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

संपूर्ण आरती संग्रहासाठी इथे क्लिक करा

या आरतीची बांधणी नक्की कोणी केली हे सांगणं कठीण आहे. पण “घालीन लोटांगण” आरती वाचताना, गाताना एक गोष्ट नक्की लक्षात अली असेल की काही पंक्ती मराठी आहेत, काही संस्कृत! याचे कारण असे आहे की घालीन लोटांगण आरतीमधले प्रत्येक कडवे वेगवेगळ्या काळात रचलेल्या वेगवेगळ्या स्रोतांमधून घेतलेले आहे.

पहिले कडवे

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

हे संत नामदेव महाराज यांनी १३ व्या शतकात रचलेले आहे. घालीन लोटांगण आरती म्हणत असताना अनेकजण शेवटचे दोन शब्द उच्चारताना “म्हणे नमा” म्हणतात त्यामुळे संत नामदेव महाराजांचे नाव उच्चारले जात नाही. आणि हा संदर्भ सापडत नाही.

दुसरे कडवे

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

हे आद्य शंकराचार्य यांनी ८ व्या शतकात गुरुस्तोत्रात रचलेले आहे. परमेश्वराबद्दल प्रेम आणि आदरभाव एकाच वेळी ऐकायला विशेष मिळत नाही!

तिसरे कडवे

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

हे कडवे श्री व्यास यांनी रचलेल्या श्रीमद्भागवतपुराणातून घेतलेले आहे.

चौथे कडवे

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हे कडवे आद्य शंकराचार्य यांच्या अच्युताकष्ठम् मधून घेतलेले आहे. हे आठव्या शतकातील आहे.

अखेरचे कडवे

हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

हा मंत्र ‘कलीसंतरणं’ या उपनिषदातील आहे.

अत्यंत रोचक अशी रचना आणि इतिहास असलेली “घालीन लोटांगण” ही आरती. जेव्हा भक्तगण एका सूरात गातात तेव्हा भेदभेवाच्या सगळ्या भिंती नाहीशा होतात!

श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏻

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *