आर्या वृत्त – नियम आणि उदाहरणे

आर्या वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – आर्या

वृत्त प्रकार – मात्रावृत्त

वृत्त मात्रा संख्या – ३०, २७

मात्रांची विभागणी – पहिल्या चरणात १२, दुसऱ्या चरणात १८, तिसऱ्या चरणात १२ आणि चौथ्या चरणात १५

यति – यतिचे नियम नाहीत.

नियम – आर्या वृत्तात अक्षरांचा नियम नसला तरीही गणांचे नियम आहेत. तेव्हाच आर्या पूर्ण मानली जाते. आर्येंत विषम म्हणजे पहिला, तिसरा, पांचवा व सातवा हे गुण ज गण नसावे व सहावा गण ज गण अथवा न गण असावा, असा नियम आहे पूर्वार्धात चार चार मात्रांचा एकेक गण असे सात गणव पाडतां येऊन आणखी शेवटीं दीर्घ अक्षर असावें. उत्तरार्धातही चार चार मात्रांचे पांच गण असून सहावा गण एकाच लघु अक्षराचा असावा व सातवा गण चार मात्रांचा असून शेवटीं गुरु अक्षर असावे. (हे नियम तंतोतंत पळाले पाहिजेत असा कुठेही अट्टाहास नाही पण वृत्ताच्या नियमांचा विचार करता हे गरजेचे आहेत. खालील संस्कृत श्लोकात या नियमांचा उल्लेख आहे.)

यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि ।
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश सार्या ॥

लक्ष्मैतत्सप्त गणा गोपेता भवति नेह विषमे जः ।
षष्ठोऽयं च नलघु वा प्रथमेऽर्धे नियतमार्यायाः ॥ १ ॥
षष्ठे द्वितीयलात्परके न्ले मुखलाच्च सयतिपदनियमः ।
चरमेऽर्धे पंचमके तस्मादिह भवति षष्ठो लः ॥ २ ॥

~ सुकविहृदयानन्दिनी

गिती वृत्त आणि आर्या

आर्या वृत्ताबद्दल माहिती घेत असताना इथे गिती या मात्रावृत्ताबद्दल किंवा जातिबद्दल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. कारण, प्राकृत भाषेत आर्या आणि गिती यांच्यात कवींनी मुक्त संचार केलेला सहज आढळतो. त्यामुळेच बऱ्याचदा मराठीत आर्या म्हणून समोर येणारी रचना १२+१८ । १२+१५ मात्रांच्या गणितात बसताना दिसत नाही. याचे मुख्य कारण असे की गिती हे वृत्त किंवा जाति आर्या वृत्तातून जन्म घेतलेली जाति आहे. जिच्या चरणांत १२ + १८ । १२ + १८ अशी फोड केलेली दिसते. (उपगिती या जातीमध्ये १२ + १५ । १२ + १५ अशी मात्रांची फोड केलेली आढळते)

याचमुळे अनेक ठिकाणी आर्या मात्रावृत्ताचे वर्णन करताना लोक आर्या वृत्तात ३० मात्रा असतात असे म्हणतात. वास्तविक पाहता ते गिती वृत्त आहे. त्यामुळे पूर्वीच्या कालच्या लिखाणांत अनेक ठिकाणी तुम्हाला काव्याच्या वर “आर्या [गिती]” असे लिहिलेले आढळेल

उदाहरणे

आर्या शब्द कानी पडताच पहिली आठवण होते ती महाकवी मोरोपंतांची! ज्यांनी सबंध महाभारत आर्या वृत्तात “आर्यभारत” नावाने पुनः रचले. त्यातीलच कृष्णार्जुन संवादातील खालील आर्या आजही मन मोहतात.

[आर्या – गिती]

आर्या आर्यासि रुचे, ईच्या ठार्यी जशी असे गोडी ॥ (२२ २२१ १२ = १२ । २२ २२ १२ १२ २२ = १८)
आहे इतरा छंदी गोडी परि यापरीस ती थोडी ॥ (२२ ११२ २२ = १२ । २२ ११ २१२१ २ २२ = १८)

[आर्या – गिती]

रथचक्र उद्धरूं दे श्रुति-शास्त्रज्ञा, महा-रथा कुल-जा, (११२१ २१२ २ = १२ । ११ २२२ १२ १२ ११ २ = १८)
साधु न हाणिति अरिला, पाहति अ-धृतायुध व्यथाकुल ज्या. (२१ १ २११ ११२ = १२ । २११ १२२११ १२११ २ = १८)

[आर्या]

भ्यालों न तुज हरीसहि; जो न तुला विमुख, काय कातर तो? (२२ १ ११ १२११ = १२ । २ १ १२ १११ २१ २११ २ = १८)
किथतों यास्तव कीं जन धर्में भवसिंधु, नायका, तरतो. (११२ २११ २ ११ = १२ । ११ ११११ २१२ ११२ = १५)

[आर्या]

फेडी वस्त्र सतीचें जेव्हां ऊघडे करावया आंग, (२२ २१ १२२ = १२ । २२ २१२ १२१२ २१ = १८)
गेला होता कोठें धर्म तुझा तेधवां? वृषा, सांग (२२ २२ २२ = १२ । ११ १२ ११२ १२ २१ = १५) * इथे ते वर जोर नसल्याने लघु

संपूर्ण संवाद इथे वाचा.

आर्या वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

कीचक-बंधु-शतांना बाहुबलें रात्रि मारिलें कोणी
वस्त्राविरणेंच तद वध केल्याचें स्पष्ट येतसे देसुनी
– (परशुरामपंत गोडबोले)

कस्तं गुणारविन्दं शीलमृगांङ्क जनो न जानाति ?
भापन्न-दुःखमोक्षं चतुःसागरसारं रत्नम्‌
– (मृच्छकटिक, शूद्रक)

दारिद्र्यान्मरणाद्वा मरणं मम रोचते न दारिद्र्यम् ।
अल्पक्लेशं मरणं दारिद्र्यमननन्तकं दुःखम्
– (मृच्छकटिक, शूद्रक)

(खालील श्लोकात १२ राशींची नावे आर्या वृत्तातील श्लोक सांगितलेली आहेत)

क्रियतावुरीजितुमकुलीरलेयपाथोनजूककौर्प्याख्या:
तौक्षिक आकोकेरो हृद्रोगश्चान्त्यभं चेत्थम्
– (बृहद्जातकम्, वराहमिहीर)

धूर असे, मेघ न हां कां धांवशि, चातका, दिनावाणी
यांच्यामार्गे आणिल हा नेत्रा मात्र बा तुझ्या पाणी
– (पद्यरत्नावली, कृष्णशास्त्री चिपळूणकर)

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *