February 18, 2025
द्रुतविलंबि‍त वृत्त – नियम आणि उदाहरणे

द्रुतविलंबि‍त वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – द्रुतविलंबि‍त

वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – १६

वृत्त अक्षर संख्या – १२

गणांची विभागणी – न, भ, भ, र

यति

नियम
द्रुतविलंबि‍त वृत्तात न, भ, भ, र गण U U U | – U U | – U U | – U – आणि मात्रा १११ । २११ । २११ । २१२

द्रुतविलंबि‍त बद्दल माहिती

द्रुतविलंबि‍त, नावातच ज्याच्या छंदाची लय दडलेली आहे! द्रुत म्हणजे जोरात, विलंबित म्हणजे सावकाश जे एका मागोमाग एक येतात. द्रुत आणि विलंबित या व्याख्या संगीताच्या नादात वापरतात.

या छंदाला “सुंदरी” देखील म्हणतात. अर्थातच कवींना या रचनेत सौंदर्य दिसतच असणार!

वृत्ताचे लक्षणसूत्र

१.
द्रुतविलंबित वृत्त घडे तिथें ॥
न भ भ र क्रम हाच गणीं जिथें ॥
रविमितें चरणांतील अक्षरें ॥
त्वरित धर्म करा अपुल्या करें ॥
– (“वृत्तदर्पण”, परशुराम बल्लाळ गोडबोले)

२.
द्रुतविलंबितमाह न भौ भ रौ
– (“रत्नालंकार”)

द्रुतविलंबि‍त वृत्ताची उदाहरणे

घन पिता मम जो नटवी धरा, (११ १२ ११ २ ११२ १२)
मम असे जननी गिरि-कन्दरा; (११ १२ ११२ ११-२१२)
जननिचे शरिरीं बहु नाचतों, (१११२ ११२ ११ २१२)
खदखदा हसतों अणि खेळतों. (१११२ ११२ ११ २१२)
– (“झरा”, भा रा तांबे)

द्रुतविलंबि‍त वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

मधुरयं मधुरैरपि कोकिला
कलरवैर्मलयस्य च वायुभिः ॥
विरहिणः प्रहिणस्ति शरीरिणो
विपदि हन्त सुधाऽपि विषायते ॥
– (“शृंगारशतकं”, भर्तृहारी)

अमृतही पयही म्हणवीतसे ।
उभय होय तसी रुचि वीतसे ॥
मधुर सारस ते जल गा तसे ।
मधुर सारस यास्तव गातसे ॥
– (“दमयंती स्वयंवर”, रघुनाथ पंडित)

यश किती मिळणार करें बळें ।
सुकृत सर्व तुझेंच सदा फळें ॥
करिं जरी तरवारहि मोडकी ।
तरिहि शेवट होईल गोड कीं ॥
– (“तिकुडचे पहिले पत्र”, कृष्णाजी नारायण आठल्ये)

घनरवांतकरा ! खणतो पहा, वनबिडाल महीस कसे वनीं,
बहु भयंकर कर्कश हे महा, परम सस्पृह मूषकसेवनीं. ॥
– (“कुशलवोपाख्यान”, मोरोपंत)

खालील उदाहरण श्रीसद्गुरू दासगणु यांच्या कान्होपात्रा आख्यानातून घेतले आहे जिथे, संत कान्होपात्रांची आई शामा जी स्वतः गणिका आहे, ती कान्होपात्राला देखील या मार्गावर येण्याचे सुचवते तेव्हा कान्होपात्रा म्हणते..

शिकवि ना मज ही अनिती खरी ।
जडल काच न गे फ़ुटल्यावरी ॥
म्हणुनिया भलत्या मज आग्रहा ।
करि न गे जननी ! उगली रहा ॥
– (“कान्होपात्रा आख्यान”, श्रीसद्गुरू दासगणु)

दिवस का अवसान समीप था,
गगन था कुछ लोहित हो चला
तरु शिखा पर थी अब राजती,
कमलिनी – कुल – वल्‍लमभ की प्रभा
– (“प्रियप्रवास”)

त्रि – घटिका रजनी गत थी हुई ।
सकल गोकुळ नीरव – प्राय था
ककुभ व्योम समेत शनैः शनैः
तमवती नबती ब्रज – भूमि थी
– (“प्रियप्रवास”)

द्रुतविलंबि‍त वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *