व्युत्पत्ति:
मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “आलाराम” मूळ इंग्रजी शब्द अलार्म (चेतावनी) वरून आलेला आहे.
इंग्रज भारतात आले आणि त्यांचे शब्द देखील. पण जसे आपले शब्द उच्चारताना इंग्रजांची तारांबळ होत असे तसे, आपल्या भाबड्या लोकांचीही इंग्रजी शब्द म्हणताना गडबड व्हायची. आणि त्यातून इंग्रजी शब्दांचे काही भारतीय भाषेतले रूप समोर आले. उदाहरणार्थ पीस्टान, फलाट इत्यादी. त्यातीलच एक म्हणजे अलार्म ज्याला मराठीत आपण अगदी सहज आलाराम म्हणतो. आजकाल शिक्षणाच्या प्रगतीमुळे हा उच्चार मागे पडला आहे. पण अजूनही जुने लोक किंवा गावात अलार्म ला पटकन आलाराम म्हणतात. ती पूर्वीची आलाराम ची किल्ली द्यायची घड्याळे अजूनही आठवतात!
शब्द-प्रयोग:
आलाराम वाजल्याशिवाय बबनला जाग येतच नाही.
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]