February 18, 2025

तक्रार

व्युत्पत्ति:

मराठीत वापरला जाणारा परकीय शब्द “तक्रार” मूळ अरबी शब्द तक्रार (परत परत तेच करणे, प्रत) वरून आलेला आहे.

 

परत परत तीच गोष्ट करणे या अर्थाच्या शब्दाचे रूपांतर आक्षेप घेणे, परिवाद या अर्थाच्या शब्दात कसे झाले हे सांगणे कठीण आहे. पण तक्रार, सत्यशोधन आणि दंड, साधारणपणे या गोष्टी कायदा आणि कचेऱ्या यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्याअनुषंगाने हे रूपांतर झाले असावे हा कयास आहे. तक्रार शब्द या अरबी शब्दाचे क्रियापदवाची रूप आहे कर्रार, ज्याचा अर्थ पुन्हा करणे किंवा वस्तू जागच्या जागी ठेवणे असा आहे.

शब्द-प्रयोग:

राधाने यशोदेकडे कृष्णाची तक्रार केली.

सरकारदरबारी केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करावा लागतो.

 

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]