वृत्ताचे नाव – अभंग (लहान)
वृत्त प्रकार – अक्षरवृत्त
अक्षरांची विभागणी – प्रत्येक ओवीत (कडवे) दोन चरण आणि चार खंड असतात. प्रत्येक चरणात ८ अक्षरांचे दोन खंड असतात.
यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते.
नियम –
अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. प्रत्येक चरणात ८-८ अक्षरांचे खंड असतात आणि प्रत्येक चरणात यमक जुळलेले असते.
अभंग बद्दल माहिती
अभंग वृत्त किंवा छंद हा लोकसाहित्यातून आणि भक्तिगीतांमधून उदयाला आलेले वृत्त आहे. अभंग वृत्ताचे मराठी साहित्यात विशेष महत्व आहे कारण अनेक थोर संतांनी या अभंगात रचना केल्या आणि त्यातून अध्यात्मिक व धार्मिक उपदेश लोकांपर्यंत पोहोचवले. या अभंगातील अक्षरांची विभागणी निश्चित असल्यामुळे अभंग चालीत गाणे सुकर होते.
अभंग वृत्ताची उदाहरणे
संत तुकाराम महाराजांचे अनेक लोकप्रिय अभंग या वृत्तात आहेत
जें कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥१॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा ॥१॥ देवा सांगो सुखदुख। देव निवारिल भूक ॥२॥
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ॥१॥
सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा ।
महानंदा महानुभावा । सदाशिवा सहजरूपा ॥२॥
– संत तुकाराम महाराज
याचप्रमाणे अनेक संतांनी अभंग वृत्तात रचना केलेल्या आहेत
जे जे बोले तैसा चाले । तो चि वहिले निवांत ॥१॥
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥२॥
– संत एकनाथ महाराज
संत मुक्ताईंचा अत्यंत प्रसिद्ध अभंग देखील याच वृत्तातील आहे
मुंगी उडाली आकाशीं । तिणें गिळीलें सूर्याशीं ॥ १ ॥
थोर नवलाव जाहला । वांझे पुत्र प्रसवला ॥ २ ॥
विंचु पाताळाशी जाय । शेष माथां वंदी पाय ॥ ३ ॥
माशी व्याली घार झाली । देखोन मुक्ताई हांसली ॥ ४ ॥
– संत मुक्ताई
आणखीन एक उदाहरण माझ्या कवितेतील द्यावेसे वाटते
निळ्या गालावर डुले, शुक्र चांदव्याची कणी
गर्द क्षितिजाची वेणी, उभी सुखान्त साजणी
– रोहित बापट (हृद्रोग)
अभंग वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!
शब्दयात्री वर वृत्तांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा!