September 13, 2025
D. B. Cooper: अमेरिकेतील सर्वात मोठे रहस्य – एक रोचक कथा

D. B. Cooper: अमेरिकेतील सर्वात मोठे रहस्य – एक रोचक कथा

Spread the love

D. B. Cooper चे रहस्य

D. B. Cooper नमस्कार वाचकांनो! आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी आणि रहस्यमयी घटना आहे. ही गोष्ट आहे D. B. Cooper ची – एका माणसाची जो १९७१ मध्ये विमानाचे अपहरण करतो, खंडणी घेतो आणि नंतर आकाशातून पॅराशूट घेऊन उडी मारतो… आणि कधीच कोणाला सापडत नाही! अनेक संस्थांनी अनेक प्रयत्न केले पण त्याचा मागमूस सुद्धा कुठे आजतागायत लागलेला नाही. ही कथा इतकी रोचक आहे की त्यावर चित्रपट, पुस्तके आणि अगदी वार्षिक कॉन्फरन्स होतात. चला, या रहस्याला उलगडण्याचा प्रयत्न करूया – गोष्ट, थिअरी आणि नवीन माहितीसह.

D. B. Cooper Image
प्रत्यक्षदर्शींनी केलेले D. B. Cooper मूळ वर्णन

घटनेची सुरुवात: एक सामान्य उड्डाण आणि एक बॉम्बची धमकी

२४ नोव्हेंबर १९७१ – थँक्सगिव्हिंगच्या आधीचा दिवस. पोर्टलंड (ओरेगॉन) ते सिएटल (वॉशिंगटन) जाणाऱ्या नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाइन्सच्या फ्लाइट ३०५ मध्ये एक मध्यमवयीन माणूस चढतो. तो सूट घातलेला, काळे केस आणि तपकिरी डोळे असलेला दिसतो. स्वतःला “डॅन कूपर” म्हणवतो, त्याच्या तिकिटावर देखील डॅन कूपर लिहिलेले असते. उड्डाण सुरू होताच, तो फ्लाइट अटेंडंटला एक कागद देतो. सुरुवातील फ्लाइट अटेंडंटला वाटते की कोणीतरी फोन नंबर लिहून दिलेला आहे. पण त्याच वेळेस कूपर म्हणतो की “तो कागद तुम्ही वाचला पाहिजे. माझ्याकडे एक बॉम्ब आहे”. त्या कागदात लिहिलेले असते “माझ्या ब्रीफकेसमध्ये बॉम्ब आहे. माझ्या बाजूला शांत बसा.”

फ्लाइट अटेंडंट त्याच्या शेजारी बसते तेव्हा कूपर तिला आपली बॅग उघडून काही पाइपसारख्या आणि वायर वगैरे असलेल्या गोष्टी दाखवतो आणि म्हणतो हा बॉम्ब आहे. कूपर फ्लाइट अटेंडंटला काही लिहायला सांगतो. त्यात त्याच्या काही मागण्या असतात ज्या ती लिहून घेते आणि वैमानिकाला नेऊन देते. त्यात खालील मागण्या असतात.

“$२००,००० (आजच्या किमतीत सुमारे $१.५ मिलियन) आणि चार पॅराशूट्स.”

विमान सिएटलमध्ये उतरते. प्रवासी सोडले जातात, पण क्रू मेंबर्सना ठेवले जाते. खंडणी आणि पॅराशूट्स मिळाल्यानंतर, कूपर विमानाला मेक्सिको सिटीच्या दिशेने उड्डाण करण्यास सांगतो – पण कमी उंचीवर (१०,००० फूट) आणि कमी वेगाने (२०० नॉट्स). उड्डाणानंतर अंदाजे ३० मिनिटांनी, वॉशिंगटनच्या जंगलांमध्ये, तो विमानाच्या मागच्या दरवाजातून पॅराशूट घेऊन उडी मारतो. विमान रेनो (नेवाडा) मध्ये उतरते, पण कूपर गायब! FBI ने याची तपासणी “NORJAK” नावाने सुरू केली, पण ५० वर्षांनंतरही केस अनसॉल्व्ड आहे, हे न उलगडलेले रहस्य आहे.

कूपरने उडी मारली तेव्हा हवामान खराब होते – थंडी, पाऊस आणि वादळ. तो जंगलात उतरला असावा, पण त्याचा मृतदेह किंवा पैसा कधीच सापडला नाही. फक्त १९८० मध्ये, कोलंबिया नदीच्या किनाऱ्यावर एका मुलाला $५,८०० च्या नोट्स सापडल्या, ज्या खंडणीच्या पैशाशी जुळत होत्या. बाकी $१९४,२०० कुठे गेले? हा प्रश्न आजही कायम आहे.

D. B. Cooper Notes
१९८० साली सापडलेल्या कूपर च्या तथाकथित नोटा (स्रोत: FBI)

थिअरी आणि संशयित: कोण होता हा D. B. Cooper?

ही गोष्ट इतकी रहस्यमयी आहे की अनेक थिअरी आणि संशयित समोर आले. काही म्हणतात की कूपर उडी मारताना मेला असावा – जंगल, नदी आणि खराब हवामानामुळे. पण काही थिअरी म्हणतात की तो जिवंत राहिला आणि नवीन आयुष्य जगला. चला, काही प्रमुख संशयित आणि थिअरी पाहूया:

  1. रिचर्ड मॅकॉय ज्युनियर: १९७२ मध्ये त्याने समान पद्धतीने विमान हायजॅक केले आणि पकडला गेला. त्याचे वर्णन आणि पद्धत जुळते, पण FBI ने पुरावा नाकारला. २०२४ मध्ये, मॅकॉयच्या मुलांनी दावा केला की त्यांचा बापच कूपर होता, आणि एक पॅराशूटही सापडले. पण हे अद्याप अपुष्ट आहे.
  2. ड्वेन वेबर: त्याच्या पत्नीने दावा केला की त्याने मृत्यूपूर्वी कबूल केले: “मीच D. B. Cooper आहे.” त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी जुळतात, जसे की तो आर्मी पॅराट्रूपर होता. पण डीएनए आणि फिंगरप्रिंट्स जुळले नाहीत.
  3. रॉबर्ट रॅकस्ट्रॉ: एक पायलट आणि व्हिएतनाम वॉर व्हेटरन. त्याचे फोटो आणि वर्णन जुळते. काही म्हणतात की तो कॅनडात पळून गेला आणि नवीन नावाने जगला. २०१८ मध्ये त्याचा मृत्यू झाला, पण पुरावा अपुरा.

यांच्या खेरीज, टेड ब्रॅडन, केनेथ ख्रिश्चियनसन, जॅक कॉफेल्ट, लिन कूपर, विल्यम गॉसेट, जो लकीच, टेड मेफील्ड, शेरिडन पीटरसन, विल्यम स्मिथ इत्यादीदी लोकांवर देखील ते कूपर असल्याचा संशय घेतला होता. पण सगळं निष्फळ!

D. B. Cooper Suspects
संशयितांचे फोटो

अन्य थिअरी? काही म्हणतात की कूपर CIA एजंट होता किंवा बोइंग कंपनीचा कर्मचारी (विमानाचे डिझाइन माहिती असल्यामुळे). एक थिअरी म्हणते की पैसा नदीत वाहून गेला, कारण सापडलेल्या नोट्स ओल्या होत्या. पण हे सर्व अनुमानच आहेत – FBI ने २०१६ मध्ये केस बंद केली, कारण नवीन पुरावा नव्हता.

नवीन अपडेट्स: २०२५ पर्यंतची घडामोडी

ही मिस्ट्री थांबलेली नाही! मार्च २०२५ मध्ये, FBI ने ४७२ पाने सार्वजनिक केली, ज्यात संशयित, टिप्स आणि फसवणुकीची माहिती आहे. उदाहरणार्थ, एका पत्रकाराला $३०,००० ची लाच दिली गेली चुकीची माहिती लिहायला होती. जुलै २०२५ मध्ये, आणखी फाइल्स समोर आल्या, ज्यात नवीन संशयित आणि टिप्स आहेत. पण तरीही, केस अनसॉल्व्ड राहिली.

कूपर चा टाय
कूपर चा टाय जो वापरून डीएनए तपासणी केली जात आहे

आजही “CooperCon” नावाचे वार्षिक इव्हेंट होतात, जिथे उत्साही लोक थिअरी शेअर करतात. Netflix आणि HBO सारख्या प्लॅटफॉर्म्सवर डॉक्युमेंटरी आहेत. कदाचित भविष्यात डीएनए टेक्नॉलॉजीने उत्तर मिळेल?

शेवट: एक अनंत रहस्य

D.B. Cooper ही फक्त एक हायजॅकिंगची गोष्ट नाही – ही स्वातंत्र्य, धाडस आणि रहस्याची कथा आहे. तो जिवंत राहिला की मेला? पैसा कुठे आहे? हे प्रश्न आजही लाखो लोकांना भुरळ घालतात. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये सांगा!

धन्यवाद वाचण्यासाठी. आणखी अशा रोचक गोष्टींसाठी फॉलो करा. 😊

कूपरचा मार्ग (स्रोत – दुवा)
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *