October 9, 2024
शहाण्यांसाठी इसापनीती – ससा आणि कासव

शहाण्यांसाठी इसापनीती – ससा आणि कासव

Spread the love
इसापनीती ससा आणि कासव

मित्रांनो ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. त्यावर नाना तऱ्हेची गाणी, बडबडगीते लिहिली आणि गेली गेलेली आहेत. लहान मुलांना देखील हे ठाऊक असते की शर्यत कोण जिंकला ससा की कासव? हे ही सगळ्यांना ठाऊक आहे की ससा गाफील राहिला म्हणून त्याला शर्यत जिंकता अली नाही. कासव त्याच्या “कूर्मगतीने” न थांबता चालत राहिला. शेवटी त्याने शर्यत सशाच्या आधी पूर्ण केली.

या कथेचे तात्पर्य सांगितले जाते की “Slow and Steady wins the race” म्हणजे “हळू / संथ पण अविरत वाटचाल केल्यास (सातत्य राखल्यास) शर्यत जिंकता येते”. माझ्या आणि माझी खात्री आहे की तुमच्याही लहानपणापासून तुम्हाला, कासव कसा हुशार आहे आणि शर्यत जिंकण्यास कसा जास्त योग्य आहे हे नकळतपणे मनावर बिंबवलं गेलेलं आहे. मला तर वाटतं कधीकधी आपल्याला कासवाचा आदर्श दाखवतात की काय!

प्रामाणिकपणे विचार करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या

  • कासव संथ आणि सातत्याने वाटचाल करत होता म्हणून जिंकला की सशाने प्रतिस्पर्ध्याला कमी लेखायचा मूर्खपणा केला म्हणून?
  • देवाने सशाला जोरात पळवण्यासाठी बनवलेले आहे की कासवाला?
  • ही कथा काही क्षणांसाठी विसरून, तुम्हाला जर पैज लावायला लावली तर शर्यत जिंकण्यासाठी तुम्ही कोणाची निवड कराल?

वरील प्रश्नांच्या उत्तरात माझा तर्क लपलेला आहे. सशाला देवाने जोरात पळण्यासाठी बनवलेले आहे. सशाने जर आपल्या चुका सुधारल्या तर उभ्या आयुष्यात कासव सशाला शर्यतीत हरवू शकणार नाही. मग आपण कासवाचा आदर्श कशाला घ्यायचा? संथ वाटचाल कशाला? जोरात का नाही? फक्त एक पथ्य, सशाने पाळायचे, ते म्हणजे अतिआत्मविश्वास कटाक्षाने टाळायचा! बाकी सशाला कासवाने शर्यतीत हरवणे अशक्य आहे.

फक्त एक पथ्य, सशाने पाळायचे, ते म्हणजे अति आत्मविश्वास कटाक्षाने टाळायचा! बाकी सशाला कासवाने शर्यतीत हरवणे अशक्य आहे. Why not be Fast, Smart and Consistent?

जर असे झाले तर यश सशालाच मिळणार हे निश्चित आहे. सरते शेवटी आपली शर्यत ही आपल्याशीच असते त्यामुळे स्वतःला सतत पुढे नेट राहणे ही आपली जबाबदारी आहे. मग आपल्या कार्यशैलीची निवड करताना संथ गती का? Why not be Fast, Smart and Consistent? कासवासारखे संथ न होता सशासारखे गतिमान पण चलाख आणि अविरत प्रयत्न का करू नये. म्हणून म्हणतो ससा व्हा कासव नको ! 😊

आमचे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *