मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा […]
झेन कथा मराठीत – संयमी योद्धा
ही झेन कथा आहे एका योद्धाची, संयमी योद्धाची! पूर्वी जपानमध्ये एक उत्तम तलवारबाज होते. त्यांची ख्याती मोठी होती. याला आणखीन एकच कारण म्हणजे, ते झेन मास्टर देखील होते. झेन मास्टर आणि उत्तम तालवारबाज, वयाने ज्येष्ठ आणि प्रावीण्याने श्रेष्ठ त्यामुळे त्यांची चांगलीच ख्याती होती. त्याच काळात आणखीन एक तलवारबाज होता. उत्तम होता. त्याची एक सवय होती. […]
“कोरेगाव भीमा”चे युद्ध, ऐतिहासिक नोंदी, वास्तव आणि प्रश्न
कोरेगाव भीमा येथे लढले गेलेले मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्ध राजकीय कारणांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. मराठ्यांच्या बाजूने या युद्धाचे नेतृत्व बाजीराव पेशवे द्वितीय करत होते. इंग्रजांच्या बाजूने एल्फिन्स्टन नेतृत्व करत होता. या युद्धाबद्दल ज्याला जे पसरवावंसं वाटतं तो ते पसरवतो. आणि आवाज चढवून बोलणाऱ्या किती जणांनी या युद्धासंदर्भात उपलब्ध असलेली ऐतिहासिक साधने अभ्यासलेली असतात हे […]
झेन कथा मराठीत – एशुन वर उघड प्रेम
ही झेन कथा आहे एशुन नावाच्या झेन शिष्येची. कथा छोटी आहे पण मानवी मनाच्या भित्रेपणाबद्दल, स्वतःची फसवणूक करण्याबद्दल आणि सत्यनिष्ठतेबद्दल बरंच काही सांगणारी आहे. कथा अशी.. एका झेन मठात, अनेक शिष्य जमत असत. एकदा झालं असं की एके वर्षी त्या झेन मठात २० पुरुष शिष्य आणि एकच स्त्री शिष्या होती. ती शिष्या म्हणजे “एशुन”! एशुन […]
विठ्ठलराव देवाजी दिघे (काठियावाड दिवाणजी) – अपरिचित समाजसुधारक
३ डिसेंबरला सगळ्यांनी इंग्रजांनी सती प्रथा कायदा करून शिक्षापात्र गुन्हा बनवला हे वाचलेलं आहे. त्यावरून इंग्रजांची बरीच वाहवा केली जाते. अनेक प्रश्न मनात येतात भारतात फक्त ही एकच कुप्रथा होती का? फक्त हिंदूंमध्येच कुप्रथा होत्या का? आहेत का? इंग्रज सोडून बाकी कोणी राज्यकर्त्याने काही विशेष केले नाही का? पण फारसे चांगले उत्तर मिळाले नाही. तेव्हा […]
बाजीराव पेशवे द्वितीय आणि मिथ्या आरोप
बाजीराव पेशवे आणि ब्राह्मणांची बदनामी १ जानेवारी तारीख जवळ आली की अर्थातच कोरेगावचे युद्ध, आणि बाजीराव पेशवे द्वितीय यांची आठवण येते. हा दिवस जवळ येताच, आपण कोणाला कोणत्या नियमाने देशभक्त मानतो आणि आपल्या इतिहासाची किती माहिती आहे? याचे स्वैर प्रदर्शन मांडले जाते. असो, त्याबद्दल पुढे कधी लिहूच. पण बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याबद्दल वाचन सुरु असताना […]
घटकंचुकी – एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा
घटकंचुकी – आमचा संदर्भ घटकंचुकी, दोन तीन दिवसांपूर्वीच हा शब्द प्रथम वाचनात आला. इतिहासाबद्दल वाचन करत राहणे हा आमचा आवडता उद्योग. एका बहुचर्चित मराठे – इंग्रज युद्धाच्या पाऊलखुणा आणि सत्यता शोधत होतो. तेव्हा दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्याबद्दल काही साधने वाचत असताना इतिहासाचार्य राजवाडे यांचे “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” हे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकात भारतातील विवाहाच्या, […]
Transit of Venus – शुक्र पारगमन आणि काही आठवणी
काल म्हणजे २४ नोव्हेंबर २०२२, मी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी इतिहासात काय झालं याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. तेव्हा मला हे पान सापडले. या पानावर Jeremiah Horrox या खगोलशास्त्रीच्या मित्राला म्हणजे William Crabtree नावाच्या एका विणकाराला Transit of Venus किंवा शुक्राचे पारगमन बघताना दाखवले आहे. Jeremiah ने आपल्या मित्राला हे पाहायला सांगितले होते. त्याचे […]
कला म्हणजे काय? – एक विचित्र उदाहरण
कला म्हणजे काय? “कला” समस्त मानव प्रजातीला प्रत्येक पिढीला पडणारा एक सनातन प्रश्न. आज पुन्हा या प्रश्नाच्या मृगजळात काही काळ यथेच्छ डुंबून घेतलं. ट्विटरवर एक ट्विट पाहिला ज्यात काही चित्रांची अनेक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे असं सांगण्यात आलं होतं. अर्थातच जेव्हा कुठल्या कलाकृतीला एवढी किंमत मिळते तेव्हा चकित व्हायला होतं. कलाकार म्हणून थोडा आनंद पण […]
लोकमान्य टिळकांचे किस्से
नमस्कार, लोकमान्य टिळक हे नाव माहित नसलेले लोक शोधूनच काढावे लागतील. पण आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या “टरफले” आणि “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” किंवा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” अशा दोन तीन गोष्टी सोडल्या तर विशेष काहीच माहित नसतं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासकारांनी लोकमान्य टिळकांना फक्त केसरी, मराठा, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहेत. […]