January 12, 2025
विषारी टोमॅटो? – टोमॅटोचा एक रोचक इतिहास

विषारी टोमॅटो? – टोमॅटोचा एक रोचक इतिहास

Spread the love

आजच्या दिवशी म्हणजेच २८ जून १८२० साली सगळ्यांनी पहिल्यांदा हे मान्य केलं की टोमॅटो विषारी फळ नाही आणि ते खाण्यास योग्य आहे हे सगळ्यांनी मान्य केलं. ऐकायला विचित्र वाटेल पण इंग्लंड, उत्तर युरोप व अमेरिका येथे कैक वर्षे टोमॅटो हे एक विषारी फळ मानले जात होते.टोमॅटो आपण भाजी म्हणून खात असलो तरी वनस्पतीशास्त्रानुसार टोमॅटो हे एक फळ आहे. तर या रोचक कथेची सुरुवात होते मेक्सिकोत. टोमॅटो खरं तर मूलतः दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशातील फळ आहे. इतिहासाच्या प्रवासात कधीतरी मेक्सिकोत Aztec लोकांनी ते फळ मेक्सिकोत आणलं व त्याची लागवड केली.

टोमॅटो हा शब्द टोमाटल म्हणजे स्थानिक मेक्सिकन भाषेत फुगलेले फळ या शब्दावरून आलेला आहे. आता साधारण १५ व्या शतकाच्या दरम्यान टोमॅटो युरोपात पोहोचला अशी आख्यायिका आहे. काही जण म्हणतात स्पॅनिश सैनिकांनी १५४० च्या दरम्यान सर्वप्रथम टोमॅटो युरोपात आणला, तर काही जण म्हणतात त्यांच्याआधी कोलंबसने अमेरिकेहून परत येताना हे फळ आपल्या बरोबर युरोपात आणले.  तिथे आधी हे फळ स्पेन, इटली या दक्षिण युरोपीय देशात एक भाजी म्हणून वापरले जावू लागले.

स्पॅनिश प्रवाशांनी टोमॅटो कॅरेबियन, आफ्रिकेत नेला. हळुहळु टोमॅटो सगळ्या युरोपात देखील पसरला. तसाच तो इंग्लंडला देखील पोहोचला. इंग्लंडमध्ये टोमॅटोची लागवड होवू लागली. पण Gerard नावाच्या एका टोमॅटो उत्पादकाने जो वनस्पती शास्त्रात रस असणारा होता, त्याने हा दावा केला की टोमॅटो मध्ये टोमॅटीन नावाचे विषारी द्रव्य असते.

Gerard considered ‘the whole plant’ to be ‘of ranke and stinking savour.’… The fruit was corrupt which he left to every man’s censure. While the leaves and stalk of the tomato plant are toxic, the fruit is not.

गेरार्डच्या मते टोमॅटो हे हलक्या प्रतीचे आणि दुर्गंधी पसरवणारे आहे. हे फळ चांगले आहे की नाही हे मी ज्या त्या व्यक्तीवर सोडतो. पाने आणि देठ विषारी आहेत, फळ नाही. 

John Gerard’s publication of Herball in 1597
Tomato poison John Gerard टोमॅटो विषारी
John Gerard
John Gerard tomato
“Herball” जॉन जेरार्ड चे पुस्तक

मग काय ही बातमी इंग्लंडमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि कैक वर्षे इंग्लंड, पर्यायाने त्यांच्या अमेरिकन वसाहतींमध्ये टोमॅटो या फळाला विषारी घोषित करून, खाण्यास अयोग्य ठरवलं गेलं. हे कैक वर्षे चालू राहिलं. हे खरं आहे की टोमॅटो मध्ये ग्लायको अल्कलॉइड नावाचे बुरशी सारखे द्रव्य असते. पण त्याचे प्रमाण इतके कमी असते की त्याने कुठलीही इजा होवू शकत नाही. तसा टोमॅटो हा वांगी आणि बटाटे यांचा नातेवाईक आहे पण त्याहूनही जास्त म्हणजे टोमॅटो हा  Solanaceae (सोलॅनेसे) किंवा Nighshade (नाईटशेड) या विषारी वनस्पतींच्या कुटुंबात मोडतो. त्याच्यामुळे देखील टोमॅटोबद्दल अनेक समज पसरायला मदत झाली. 

Apples of Loue Gerard टोमॉटोचे रेखाचित्र
Apples of Loue (Herball) जेरार्ड यांच्या पुस्तकातील टोमॅटोचे रेखाचित्र

काही लोकांनी तर टोमॅटोतील या रसायनांमुळे आणि त्याच्या लाल चुटुक रंगामुळे त्याला जादूटोण्यात देखील वापरायला सुरुवात केली. अर्थातच सामान्य जनतेने अशा फळापासून दूर राहाणं पसंत केलं. आपल्याकडे देखील गुरं ढोरं शक्यतो टोमॅटो खात नाहीत किंवा त्यांना टोमॅटो जास्त खायला देऊ नये म्हणतात. अर्थात त्याला बरीच करणे आहेत. पण गुरांना देखील अपाय होऊ शकतो असं काहीतरी टोमॅटोमध्ये आहे हे युरोपीय शेतकऱ्यांना समजलं नसेल कशावरून? 

ही बंदी अशीच होती मात्र, अमेरिकेतल्या कर्नल रॉबर्ट गिबन जॉन्सन यांना मात्र या भाकडकथेवर विश्वास नव्हता. शेवटी त्यांनी टोमॅटो विषारी नाही हे जाहीररीत्या सिद्ध करायचं आणि त्याचं प्रात्यक्षिक सादर करायचं ठरवलं.

कर्नल रॉबर्ट गिबन जॉन्सन

शेवटी २८ जून १८२० साली, अमेरिकेत न्यू जर्सी, येथील सालेम मध्ये, मुख्य सरकारी इमारतीच्या पायऱ्यांवर कर्नल रॉबर्ट गिबन जॉन्सन यांनी सगळ्यांसमोर टोमॅटो खाऊन हे सिद्ध करून दाखवलं की टोमॅटो विषारी नाही! तेव्हा कुठे हळुहळु लोकांना खात्री व्हायला लागली आणि अमेरिकेत लोक टोमॅटो खावू लागले. परिणामी इंग्लंड आणि टोमॅटो ला विषारी फळ मानणाऱ्या देशांमध्ये देखील लोक टोमॅटो खावू लागले!

Colonel Robert Gibbon Tomato टोमॅटो
Trial of Salem (सालेम चा खटला)

इतक्या साध्या गोष्टींचा देखील इतका रंजक इतिहास असू शकतो हा विचार करून नवल वाटते!

Click to rate this post!
[Total: 1 Average: 1]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *