देवाशप्पथ सत्य सांगेन आणि फक्त सत्यच सांगेन! पण, काही योगायोगसुद्धा इतके विचार असतात की स्वतःलाच विश्वास बसत नाही. दुसऱ्यांनी शंका घेतली तरी वाईट वाटत नाही. तसंच काहीसं झालं आज सकाळी. सोशल मिडीयावर शेतकरी वर्गातील श्रीमंत शेतकऱ्यांना उत्पन्न कर (Income Tax) लावणे अथवा न लावणे यावरून खल सुरु होता. अनेक जणांचं मत कर न लावण्याच्या बाजूने […]
विठ्ठलराव देवाजी दिघे (काठियावाड दिवाणजी) – अपरिचित समाजसुधारक
३ डिसेंबरला सगळ्यांनी इंग्रजांनी सती प्रथा कायदा करून शिक्षापात्र गुन्हा बनवला हे वाचलेलं आहे. त्यावरून इंग्रजांची बरीच वाहवा केली जाते. अनेक प्रश्न मनात येतात भारतात फक्त ही एकच कुप्रथा होती का? फक्त हिंदूंमध्येच कुप्रथा होत्या का? आहेत का? इंग्रज सोडून बाकी कोणी राज्यकर्त्याने काही विशेष केले नाही का? पण फारसे चांगले उत्तर मिळाले नाही. तेव्हा […]
सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नी – एक अपरिचित वीरांगना
भारतीय इतिहास आणि सरदार त्र्यंबकजी डेंगळे भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये १८०० ते १८२० दरम्यानचा महाराष्ट्राचा इतिहास केवळ आणि केवळ भारतीयांना, इथल्या शूरवीरांना आणि मराठ्यांच्या साम्राज्याचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांना दूषण दिल्याचेच दिसते. माझ्या मते इतिहासकारांनी आपल्या वीरपुरुषांबद्दल अफवा आणि अपप्रचार करून मोठा अन्याय केलेला आहे. त्यात भर पडली सामाजिक द्वेषाची. त्यामुळेच आजकाल भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला […]
बाजीराव पेशवे द्वितीय आणि मिथ्या आरोप
बाजीराव पेशवे आणि ब्राह्मणांची बदनामी १ जानेवारी तारीख जवळ आली की अर्थातच कोरेगावचे युद्ध, आणि बाजीराव पेशवे द्वितीय यांची आठवण येते. हा दिवस जवळ येताच, आपण कोणाला कोणत्या नियमाने देशभक्त मानतो आणि आपल्या इतिहासाची किती माहिती आहे? याचे स्वैर प्रदर्शन मांडले जाते. असो, त्याबद्दल पुढे कधी लिहूच. पण बाजीराव पेशवे द्वितीय यांच्याबद्दल वाचन सुरु असताना […]
घटकंचुकी – एक अपरिचित अचर्चित शाक्त प्रथा
घटकंचुकी – आमचा संदर्भ घटकंचुकी, दोन तीन दिवसांपूर्वीच हा शब्द प्रथम वाचनात आला. इतिहासाबद्दल वाचन करत राहणे हा आमचा आवडता उद्योग. एका बहुचर्चित मराठे – इंग्रज युद्धाच्या पाऊलखुणा आणि सत्यता शोधत होतो. तेव्हा दुसरे बाजीराव पेशवे त्यांच्याबद्दल काही साधने वाचत असताना इतिहासाचार्य राजवाडे यांचे “भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास” हे पुस्तक वाचनात आले. त्या पुस्तकात भारतातील विवाहाच्या, […]
Transit of Venus – शुक्र पारगमन आणि काही आठवणी
काल म्हणजे २४ नोव्हेंबर २०२२, मी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या दिवशी इतिहासात काय झालं याबद्दल जरा माहिती गोळा करत होतो. तेव्हा मला हे पान सापडले. या पानावर Jeremiah Horrox या खगोलशास्त्रीच्या मित्राला म्हणजे William Crabtree नावाच्या एका विणकाराला Transit of Venus किंवा शुक्राचे पारगमन बघताना दाखवले आहे. Jeremiah ने आपल्या मित्राला हे पाहायला सांगितले होते. त्याचे […]
आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान
“आ नो भद्राः क्रतवो” आणि आपली सोय “आ नो भद्राः क्रतवो” एक वाक्य जे मी, हातातल्या पत्त्यांसारखे फेकलेले आहे, अनेकांनी सोयीस्कररीत्या वापरलेले आहे. “अहिंसा परमो धर्म:” या अर्धवट श्लोकाबद्दल माहिती असेलच! भारताला आणि भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दल विशेष काही माहिती नसते. त्याहूनही भयंकर परिस्थिती संस्कृत ग्रंथांबद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल आहे. लोक लगेच म्हणतील की “तुम्हीच शिकवलं नाही”. […]
कला म्हणजे काय? – एक विचित्र उदाहरण
कला म्हणजे काय? “कला” समस्त मानव प्रजातीला प्रत्येक पिढीला पडणारा एक सनातन प्रश्न. आज पुन्हा या प्रश्नाच्या मृगजळात काही काळ यथेच्छ डुंबून घेतलं. ट्विटरवर एक ट्विट पाहिला ज्यात काही चित्रांची अनेक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे असं सांगण्यात आलं होतं. अर्थातच जेव्हा कुठल्या कलाकृतीला एवढी किंमत मिळते तेव्हा चकित व्हायला होतं. कलाकार म्हणून थोडा आनंद पण […]
लोकमान्य टिळकांचे किस्से
नमस्कार, लोकमान्य टिळक हे नाव माहित नसलेले लोक शोधूनच काढावे लागतील. पण आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या “टरफले” आणि “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” किंवा “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” अशा दोन तीन गोष्टी सोडल्या तर विशेष काहीच माहित नसतं. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासकारांनी लोकमान्य टिळकांना फक्त केसरी, मराठा, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्यापुरतेच मर्यादित करून ठेवले आहेत. […]
त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर
त्रिशुंड गणपती – थोडी पार्श्वभूमी काही कलाकृती, काही जागा आणि काही मंदिरे दुर्दैवाने अपरिचित राहतात. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे असेच एक अत्यंत अपरिचित, दुर्लक्षित आणि अद्भुत मंदिर! १७५४ च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. हिंदू मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत. हिंदू मंदिर ही कला, श्रद्धा आणि इतिहास यांचा […]