वाचकहो! जगात काही गोष्टी, काही घटना इतक्या रोचक असतात की त्या सांगितल्यावाचून चैन पडत नाही. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. प्रत्येकाने किमान एकदा तरी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. त्यांचे फोटो, पुतळे आणि विशिष्ट शरीरयष्टी देखील सुपरिचित आहे. पण.. एक गोष्ट जी या सगळ्यात सर्रास दिसते ती आधीपासून तशी नव्हती. ती […]
पंचचामर वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – पंचचामर वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ + १५ वृत्त अक्षर संख्या – ११ + ११ गणांची विभागणी – ज, र, ज, र, ज, ग (ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा) यति – इंद्रवज्रा आणि […]
अंत्यविधी – एक दुर्दैवी स्नेह संमेलन
काही महिन्यांपूर्वी माझ्या आजीचे दुःखद निधन झाले तेव्हा अंत्यविधी साठी पुण्यातील ओंकारेश्वर येथील घाटावर जावे लागले. आमच्या आस्थेनुसार सर्व दिवसांचे विधी ज्या त्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व दिवसांना अंत्यविधी च्या घाटावर जावे लागले. अर्थातच त्या दिवसात केवळ आमचेच नव्हे तर अनेक दुर्दैवी कुटुंबियांचे विधी घडले. पण त्या दिवसांत त्या घाटावर आणि परिसरात जे काही […]
नेणीव म्हणजे काय?
“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग २
“जेजुरी गड आणि कडेपठार” च्या मागच्या भागात आपण जेजुरी गडाची यात्रा केली. आता या ब्लॉगमध्ये आपण जेजुरी गड ते कडेपठार आणि कडेपठाराहून परत जेजुरी गड अशी यात्रा करू. जेजुरी गडावर त्यामानाने गर्दी अधिक असल्यामुळे आम्ही (म्हणजे मी आणि माझे बाबा) कडेपठाराकडे कूच करायचे ठरवले. आणि त्या दिशेने जाऊ लागलो. पादत्राणे जिथे काढली होती त्या ठिकाणी […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
बोअरिंग जॉब? ऐका भगवद्गीता काय सांगते
प्रत्येकाच्या आजूबाजूला किमान एक व्यक्ती तरी असतेच जिला आपला जॉब बोअरिंग वाटत असतो, कंटाळवाणा वाटत असतो. त्या व्यक्तीला जर आपण विचारलं “मग कशाला करतोयस हे काम?” तर ती व्यक्ती कुटुंब, अर्थार्जन इत्यादींचा आधार घेत म्हणते “पर्याय नाही”. अशा वेळेस त्याला काय उत्तर द्यावं किंवा सांगावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर, “निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान” अवघ्या […]
मराठ्यांचे “Achilles” – रामचंद्र हरी पटवर्धन
रामचंद्र हरी पटवर्धन मराठ्यांचा इतिहास ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी “पटवर्धन घराणे” नवीन नाही. पण त्यांच्याविषयी फारसा कुठे उल्लेख झालेला दिसत नाही. या घराण्याच्या इतिहासाबद्दल आणि शौर्यगाथांबद्दल लिहावे तितके कमीच आहे. आणि एकाच ब्लॉगमध्ये सगळे सामावणे देखील अशक्य आहे. हळूहळू सगळं इतिहास समोर आणूच. पण, आम्ही ज्यांना “मराठ्यांचे Achilles” म्हणतो त्या रामचंद्र हरी पटवर्धन यांच्या आयुष्यातील […]
“पाटील” शब्दाचा रोचक इतिहास
इतिहासाची पाने पालटताना “पाटील” शब्दाबद्दल एक वेगळा संदर्भ सापडला. याबद्दल आम्ही पूर्वी वाचले नव्हते. शिलाहार राजवंशातील हरिपालदेव राजाचा ठाण्यातील आगाशी नावाच्या गावी शक संवत १०७२ सालचा एक शिलालेख सापडला होता. त्याच्या मजकुराचा उद्देश खालीलप्रमाणे या मजकुरात “पट्टकिल” म्हणजेच पाटील असा उल्लेख ठळकपणे दिसत आहे. हा शिलालेख वाचल्यावर आम्ही संशोधन सुरु केले. तेव्हा लक्षात आले की […]
शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो?
१० नोव्हेंबर हा संबंध भारतात शिवप्रताप दिन म्हणून मानला जातो. या दिवशी १६५९ साली समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर साक्षात प्रभू श्री रामाचे अवतार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान नावाच्या राक्षसाचा वध केला. या घटनेचे वर्णन, जिवा महाला (महाले) यांचे शौर्य, अफझल खानाचे शीर धडावेगळे करणारे संभाजी कावजी, सय्यद बंडा (बंदा) चे वार इत्यादी इत्यादी. […]