गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या […]
ती गेली तेव्हा रिमझिम (पूर्ण कविता)
ती गेली तेव्हा रिमझिम .. ही कवी ग्रेस यांची कविता घराघरात पोहोचली जेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या कवितेला सुरांची जोड दिली. पण या गाण्यामध्ये कवितेतील फक्त तीनच कडवी घेतली गेली. त्यामुळे खूपशा लोकांना पूर्ण कविता माहित नाहीये. मी ही पूर्ण कविता सादर करत आहे ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होतामेघांत अडकली किरणे, हा सूर्य […]
शिवछत्रपती
देशी गनिमी उत्पात । स्वकीयांनी केला घातराहिली ना अब्रू घरात । जावे कोठे ?।। देवळे जाहली माती । संतांच्या जाळील्या पोथीस्वधर्म सोडूनी जाती । केविलवाणे ।। मावळ रक्तात न्हाता । सह्याद्री क्षीण होताजाहली तयांची माता । शिवनेरी ।। सांडोनी स्वतःचे जगणे । हिंदवी राज्य कारणेराज्याची बांधिली तोरणे । कडेकपारी ।। कुणी उमराव सरदार । पातशाहीचे […]
‘फुले बटाटे आणि मी’ .. !
एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ?
ग्रेस तू का गेलास?
हे आजचं स्वप्न आहे. याला स्वप्न म्हणावं की मनाच्या कुठल्यातरी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका बाळमुठीने लपवलेले एक रंगवलेले पान? अजून बरंच काही विचारायचं होतं मला. खिडकीतून सूर्य हळुहळू लुप्त होताना दिसत होता.पण तेवढ्यात डोळे उघडले आणि…ग्रेस तू का गेलास?