ती गेली तेव्हा रिमझिम .. ही कवी ग्रेस यांची कविता घराघरात पोहोचली जेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या कवितेला सुरांची जोड दिली. पण या गाण्यामध्ये कवितेतील फक्त तीनच कडवी घेतली गेली. त्यामुळे खूपशा लोकांना पूर्ण कविता माहित नाहीये. मी ही पूर्ण कविता सादर करत आहे
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |
तशी सांजही अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता |
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता |
Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]