लहानपणापासून आपण “वैष्णव जन तो” हे भक्तीगीत ऐकत आलेलो आहोत. हे काव्य थोर गुजराती संत, कवी आणि विष्णुभक्त नरसी मेहता (नरसिंह मेहता) यांनी रचलेले आहे. पण खूप कमी जणांना माहित आहे की, या सुपरिचीत भक्तिगीताचे मूळ शब्द वेगळे आहेत. महात्मा गांधींनी आपल्या गायनात वेगळे शब्द आणले. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर वाचकांसमोर आणत आहोत.
वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे । पर दुःखे उपकार करे तो ये, मन अभिमान न आणे रे ॥ ॥ वैष्णव जन तो तेने कहिये..॥ | खरा वैष्णव तोच आहे ज्याला दुसऱ्याच्या दुःखांची जाण आहे. दुसऱ्यांच्या दुःखांच्या निवारणासाठी त्याने जरी काही कार्य केले तरीही त्याच्या मनाला गर्वाचा आणि अहंकाराचा स्पर्श देखील होत नाही. |
सकल लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे । वाच काछ मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे ॥ ॥ वैष्णव जन तो तेने कहिये..॥ | जो कधीही कुणाचा अपमान करत नाही, कुणालाही कमी लेखत नाही, निंदा करत नाही, ज्याचे बोलणे, विचार आणि वागणे निष्कलंक आहे व ज्याचे मन स्थिर आहे, अशा पुण्यात्म्याची आई धन्य आहे. तो खरा वैष्णव (विष्णुभक्त).. |
समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे । जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥ ॥ वैष्णव जन तो तेने कहिये..॥ | जो सगळ्यांकडे समदृष्टीने बघतो, मोहाचा – हव्यासाचा त्याग करतो, परस्रीला मातेसमान मानतो कधीही असत्य बोलत नाही दुसऱ्याच्या संपत्तीला कधीही हात लावत नाही. तो खरा वैष्णव (विष्णुभक्त).. |
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे । रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे ॥ ॥ वैष्णव जन तो तेने कहिये..॥ | जो मोह मायेला बळी पडत नाही, ऐहिक स्वार्थ आणि वस्तूंच्या लालसेपासून मुक्त आहे, ज्याची रामनाम घेता टाळी लागते (तल्लीन होतो), सर्व तीर्थक्षेत्रे ज्याच्या ठायी एकवटली आहेत. तो खरा वैष्णव (विष्णुभक्त).. |
वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवार्या रे । भणे नरसैयॊ तेनुं दरसन करतां, कुल एकोतेर तार्या रे ॥ ॥ वैष्णव जन तो तेने कहिये..॥ | ज्याच्या मनात लोभ नाही, कपट नाही, काम आणि क्रोधापासून जो दूर आहे, नरसी (मेहता) म्हणे ज्या अशा पुण्यात्म्याला भेटून मी धन्य होईन आणि माझ्या सकल कुळाचा उद्धार होईल! तो खरा वैष्णव (विष्णुभक्त).. |
आणखीन काव्यांचे रसग्रहण वाचण्यासाठी इथे क्लीक करा!
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]