क्वचितच कोणी मराठी माणूस असेल ज्याला “आभाळमाया” शीर्षक गीत माहित नाही. मंगेश कुळकर्णी यांचे अत्यंत हळुवार पण गभीर शब्द, अशोक पत्की यांचे मनाला भावणारे संगीत आणि सांजेच्या किरणांसारखे वाहून येणारे देवकी पंडित यांचे स्वर. हे गाणं ऐकताना एका वेगळ्याच विश्वास पाऊल ठेवल्यासारखं वाटतं. पण, गाण्यात या कवितेची सगळी कडवी घेतलेली नाहीत. या काव्याचे रसग्रहण मी आधी केलेले आहे. ते इथे युट्युबवर पाहू शकता.
एका कार्यक्रमात मंगेश कुळकर्णी यांनी या गीताबद्दल खुलासा केलेला आहे. त्या वेळी मालिकेच्या निर्मात्यांना ते कडवं गाण्यात नको असल्याने ते गाण्यात आलं नाही. पण त्याच कार्यक्रमात मंगेश कुळकर्णी यांनी त्या कवितेबद्दल आणि गाण्यात नसलेल्या कडव्याबद्दल अधिक माहिती दिली. बसमधून प्रवास करत असताना मंगेश कुळकर्णी यांना ही कविता सुचत गेली. लिहायला कागद नसल्याने बसच्या तिकिटाच्या मागे ते लिहू लागले. त्यामुळे एका तिकिटामागे एक कडवे लिहून घेतले. आभाळमाया हे संपूर्ण काव्य रसिकांसाठी..
जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोहा
पोटी गूढ माया
आभाळमाया..
आभाळमाया..
(गीतात नसलेलं कडवं 👇)
दडते ते पाप
घडते ते पुण्य
चढते ती धुंदी
उरतो तो शून्य
कवी – मंगेश कुळकर्णी
गायिका – देवकी पंडित
संगीत – अशोक पत्की