February 15, 2025
उपेंद्रवज्रा वृत्त – नियम आणि उदाहरणे

उपेंद्रवज्रा वृत्त – नियम आणि उदाहरणे

Spread the love

वृत्ताचे नाव – उपेंद्रवज्रा

वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)

वृत्त मात्रा संख्या – १५

वृत्त अक्षर संख्या – ११

गणांची विभागणी – ज, त, ज, ग, ग

यति – ५ व्या अक्षरानंतर

नियम
उपेंद्रवज्रा वृत्तात ज, त, ज, ग, ग गण U – U | – – U | U – U | – – U – U | – U – आणि मात्रा १२१ । २२१ । १२१ । २ २

उपेंद्रवज्रा बद्दल माहिती

उपेंद्र म्हणजे इंद्राचा धाकटा भाऊ. कदाचित एका मात्रा कमी असल्यामुळे असे नाव मिळाले असावे.

इतर अनेक प्राचीन छंदांपैकी हा एक छंद आहे. स्फुट काव्यांसाठी उत्तम. अनेक पौराणिक काव्यांमध्ये यांच्या उपयोग केलेला आढळून येतो.

इतर वृत्तांशी साम्य
पहिल्या ज गणाच्या जागी त गण आला की इंद्रवज्रा!

वृत्ताचे लक्षणसूत्र

१.

उपेंद्रवज्रा म्हणतात तीला ॥ ज ता ज गा गा गण येति जीला ॥
पदास होणें शिव अक्षरांनीं ॥ पहा मनीं धुडिशि काय रानीं ॥
– (“वृत्तदर्पण”, परशुराम बल्लाळ गोडबोले)

२.
उपेन्द्रवज्रा जतजास्ततो गौ।
– (“रत्नालंकार”, केदार भट्ट)

उपेंद्रवज्रा वृत्ताची उदाहरणे

तया वनीं एक तटाक तोयें ॥
तुडुंबलें तामरसानपायें ॥
निरंतरामंद मरंद वाहे ॥
तपांतही यास्तव रिक्त नोहे ॥
– (“दमयंती स्वयंवर”, वामन पंडित)

आणखीन एक प्रसिद्ध उदाहरण ज्याला उपेंद्रवज्रा मानले गेले आहे, जरीही यातील प्रत्येक पंक्तीच्या शेवटी “व” ला उच्चार करताना दिर्ग मानले गेले आहे

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वं मम देव-देव॥

उपेंद्रवज्रा वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!

खालील उदाहरणात काही पंक्तींमध्ये शेवटचे अक्षर ऱ्हस्व असले तरीही गुरू मानले गेले आहेत.

विरोचनाचा सुत देवभक्त । बली असे नाम तयास उक्त ।
गुरु असे शुक्र तया कुळासी । बलीगृहीं आणवि पूजनासी ॥१॥
यथाविधी पूजुन तो वदे कीं । स्वर्गीं करी इंद्रच राज्य कीं कीं ।
अहो असे बंधुच तो खरा कीं । न देतसे भाग आम्हांस तो कीं ॥२॥
मनास शंका मम येत आहे । म्हणून आतां गुरु पूसतों हें ।
अहो समाधान करा मदीय । वदे गुरु त्या पुढतीच काय ॥३॥
– (“गणेश पुराण – क्रीडा खंड”, बलभीम मोरेश्वर भट)

माहेश्वरीमाश्रितकल्पवल्ली-
महंभवोच्छेदकरीं भवानीम्।
क्षुधार्तजायातनयाद्युपेत-
स्त्वामन्नपूर्णे शरणं प्रपद्ये
– (“अन्नपूर्णाश्लोकत्रय”, शंकराचार्य)

उपेंद्रवज्रा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *