अकादमी शब्द मराठी माणसाला नवीन नाही. अकादमी म्हणजे काय? हे सुद्धा कुणाला सांगायची फारशी गरज नाही. पण अकादमी शब्द आला कुठून, त्याची व्युत्पत्ति कशी झाली आणि त्याचा इतिहास काय आहे? हे फारसे कुणाला माहित नाही. या ब्लॉग मध्ये अकादमी शब्दाच्या इतिहासाबद्दल आणि व्युत्पत्तीबद्दल लिहिणार आहोत.
मूलतः अकादमी हा शब्द इंग्रजी शब्द “Academy” वरून आलेला आहे. आता Academy या शब्दाचीही व्युत्पत्ति पाहू. Academy French शब्द académie वरून जो Latin शब्द acadēmīa वरून जो प्राचीन Greek शब्द Ἀκαδημία (Akadēmía) वरून आलेला आहे.
आता प्रश्न असा आहे की मूळ शब्द Ἀκαδημία (Akadēmía) म्हणजे काय?
Akadēmía म्हणजे प्रसिद्ध ग्रीक विचारक प्लेटो यांनी अथेन्स शहराच्या बाहेर, खाचखळगे, झाडे आणि व्यायामशाळांच्या दरम्यान उभी केलेली एक प्रबोधिनी. जिथे अनेक विषयांचे अध्ययन, विचारमंथन आणि अध्यापन केले जात असे. या भागाचे नाव Akadēmía हे त्या भागाच्या पूर्व मालकाचे नाव (त्या काळचा एक शूर वीर) Akademos वरून त्याची स्मृती म्हणून देण्यात आले.