एकदा कुठून कुठे जायचं हे नक्की झालं की पुढचा मुद्दा येतो तिकीटाचा. सध्या सगळी विमान तिकिटे ऑनलाईन जातात. त्यामुळे तिकीट काढल्यावर हातात येतं ते म्हणजे इ-तिकीट. कुठल्याही इ-तिकीटावर खालील गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात..१. प्रवास करणाऱ्याचं नाव (Passenger Names)२. पी एन आर नंबर (PNR Number)३. गंतव्याचे ठिकाण (विमानतळ) (Departure/Departs)४. पोहोचायचे ठिकाण (विमानतळ) (Arrival/Arrives)५. विमान क्रमांक (Flight […]
Airport Travel Photo by Erik Odiin on Unsplash
पहिला विमान प्रवास?
घाबरू नका ! पहिला विमान प्रवास म्हटलं की आधी मनात विचार येतो तो म्हणजे.. “अरे बापरे !! आता कसं होणार ? आपल्याला हे जमणार का ?” म्हणूनच मी यावर थोडं मार्गदर्शन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे पुढे जायच्या आधी एकच गोष्ट सांगायची आहे “विमान प्रवास हा एक अत्यंत सोपा आणि सरळ प्रकार आहे. काही चुकीच्या कल्पनांमुळे […]
ती गेली तेव्हा रिमझिम (पूर्ण कविता)
ती गेली तेव्हा रिमझिम .. ही कवी ग्रेस यांची कविता घराघरात पोहोचली जेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या कवितेला सुरांची जोड दिली. पण या गाण्यामध्ये कवितेतील फक्त तीनच कडवी घेतली गेली. त्यामुळे खूपशा लोकांना पूर्ण कविता माहित नाहीये. मी ही पूर्ण कविता सादर करत आहे ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होतामेघांत अडकली किरणे, हा सूर्य […]
शिवछत्रपती
देशी गनिमी उत्पात । स्वकीयांनी केला घातराहिली ना अब्रू घरात । जावे कोठे ?।। देवळे जाहली माती । संतांच्या जाळील्या पोथीस्वधर्म सोडूनी जाती । केविलवाणे ।। मावळ रक्तात न्हाता । सह्याद्री क्षीण होताजाहली तयांची माता । शिवनेरी ।। सांडोनी स्वतःचे जगणे । हिंदवी राज्य कारणेराज्याची बांधिली तोरणे । कडेकपारी ।। कुणी उमराव सरदार । पातशाहीचे […]
‘फुले बटाटे आणि मी’ .. !
एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ?
ग्रेस तू का गेलास?
हे आजचं स्वप्न आहे. याला स्वप्न म्हणावं की मनाच्या कुठल्यातरी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका बाळमुठीने लपवलेले एक रंगवलेले पान? अजून बरंच काही विचारायचं होतं मला. खिडकीतून सूर्य हळुहळू लुप्त होताना दिसत होता.पण तेवढ्यात डोळे उघडले आणि…ग्रेस तू का गेलास?