Author: शब्दयात्री

इंद्र जिमि जम्भ पर Shivaji Maharaj
कविता, रसग्रहण, साहित्य

इंद्र जिमि जम्भ पर

महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी अनेक वीररसयुक्त काव्ये रचली. त्यातील “इंद्र जिमि जम्भ पर” हे काव्य मराठी चित्रपटांमुळे आणि गाण्यांमुळे अधिक प्रकाशात आले. महाकवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवार्थी रचलेल्या “इंद्र जिमि जंभ पर” या काव्याचा मराठी रसास्वाद इन्द्र जिमि जंभ पर , बाडब सुअंभ पर ।रावन सदंभ पर , […]

Read More
तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस
कविता, रसग्रहण, साहित्य

तीन चरण (राजपुत्र आणि डार्लिंग) – कवी ग्रेस

काही पत्रे आणि हलकेसेछायाचित्रपरत पाठवण्याची व्यवस्थाकेलीय मी.आईचे चोरून वाढविलेले केसनाही पाठवता यायचेमला.प्रारंभीच नष्ट झालेल्या एका प्रदीर्घ कवितेचे फक्ततीन चरण शिल्लक आहेत.माझ्याजवळ: काळीज धुक्याने उडतेतू चंद्र जमविले हाती;वाराही असल्यावेळीवाहून आणतो माती…अवकाश थंड हाताशीदुःखाचा जैसा व्याप;काळाच्या करुणेमधुनीसुख गळते आपोआप…पाण्यावर व्याकुळ जमल्याझाडांच्या मुद्रित छाया;मावळत्या मंद उन्हानेतू आज सजविली काया…

Read More
सीट डाऊन – पाऊस आणि ‘ते’ मित्र Pathway and Rain Drops
ब्लॉग, मुक्तांगण

सीट डाऊन – पाऊस आणि ‘ते’ मित्र

पाऊस आणि काही ‘ते’ मित्र यांच्यात मला फार साम्य वाटतं. आधीच सांगून टाकतो मला पाऊस आणि पावसाळा फार आवडत नाही. कवी किंवा लेखकाला पाऊस, ढग आणि पावसाळी वातावरण आवडू नये हा आपल्या (उरल्या सुरल्या) साहित्यिक समाजात फाऊल मानला जातो. काही काही लोक तर कुत्सित प्रश्न करतात “तू कवी आहेस आणि तुला पाऊस आवडत नाही!?” थोडक्यात त्यांना […]

Read More
कलाकाराचा मृत्यु Image by Layers from Pixabay
ब्लॉग, मुक्तांगण

कलाकाराचा मृत्यु

मला विचाराल तर नोकरदार मध्यमवर्ग स्वतःच्या घरात जन्माला आलेली कला आणि कलाकार यांच्यासाठी एक चिरंतन थडगे आहे. कलाकाराचा खून करून त्यावर आनंदाने भयाची चादर चढवली जाते आणि वर व्यावहारिक परिपक्वतेचे उपदेश एखाद्या नशेप्रमाणे एकदुसऱ्यांना दिले जातात. या थडग्यावर उभे राहून ही अहमामिका सुरू असते आणि कलाकार वास्तविकतेच्या ढिगाऱ्याखाली थडग्यात हुंदके देत असतो आणि विचारत असतो […]

Read More
म्हणूनच आणि इथेही तिथेही Image by claudia martinez from Pixabay
कविता, साहित्य, स्वरचित

म्हणूनच आणि इथेही तिथेही

एकटेपणा आणि एकान्त यात निश्चित फरक आहे. एकटेपणा ही एक मानसिक अवस्था आहे पण एकांत ही परिस्थितीतून निर्माण झालेली वास्तविकता आहे. पण या दोन गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा लक्षात येतं की लिहिणारे ही आपणंच बोलणारे ही आपणंच करणारे ही आपणंच .. स्वतःला सावरणारे ही आपणंच कारण या संगमावर मानसिक अवस्था आणि वास्तविकता या दोन […]

Read More
बेरोजगारी .. ट्विटर निबंध
ब्लॉग, मुक्तांगण

बेरोजगारी .. ट्विटर निबंध

काल ट्विटर वर अगदी बेमालूमपणे एका हॅशटॅग बेरोजगारी यावर लिहू लागलो. लिहिता लिहिता हे लक्षातच आलं नाही की मी एक लघु निबंध किंवा छोटा ब्लॉगच लिहून काढलेला आहे. त्याच ट्विट्सचं संकलन खाली करत आहे. मी स्वतः नोकरी करतो त्यामुळे उद्योग आणि व्यवसाय यांवर फार बोलू शकणार नाही. पण जे नोकरी विषयक किंवा शिक्षण विषयक सल्ला […]

Read More
कावळे
कविता, ब्लॉग, मुक्तांगण, ललित, साहित्य, स्वरचित

कावळे

गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या […]

Read More
सजातीय अंतरजातीय विवाह – एक मॉडर्न विचार Marriage Photo by Foto Pettine on Unsplash
ब्लॉग, मुक्तांगण

सजातीय अंतरजातीय विवाह – एक मॉडर्न विचार

सध्या नेते मंडळी आपापली कामं करण्यापेक्षा, लोकांच्या लग्नांबद्दल जास्त चिंतीत दिसतात. लग्न सजातीय१ (एकाच जातीत) आहे की अंतरजातीय (वेगवेगळ्या जातीत) याची काळजी त्यांना दिवसरात्र झोपू देत नाहीये. आपण कंटाळवाणे लोक, असल्या जुन्या जातींच्या फंदात न पडता पुढे (म्हणजे पुढच्याच्या पुढे नव्हे) तर भविष्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या आजुबाजूला अशी अनंत उदाहरणे जिथे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा आणि इतर […]

Read More
हॉर्न ओके पैसे Noise Pollution Image by mohamed Hassan from Pixabay
ब्लॉग, मुक्तांगण

हॉर्न ओके पैसे

उत्क्रांतीच्या शर्यतीत माणूस बराच पुढे आला असला तरीही अजूनही काही माकडांच्या सवयी त्याने शाबूत ठेवल्या आहेत, असं आपल्याला सर्वसामान्यपणे रोज रस्त्यावर पदोपदी दिसत असतं. पण अशा या माकडपंथी लोकांना याचं अजिबात भान नसतं की आपल्या अशा वागण्याने माकडांची किती बदनामी होते. असो..  अशा या थोर विभुतींमध्ये माझ्या मते पहिला क्रमांक लागतो तो हॉर्न वाजवणाऱ्यांचा! त्यातून […]

Read More
अटकेपार भगवा झेंडा – पेशव्यांचा इतिहास
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

अटकेपार भगवा झेंडा – पेशव्यांचा इतिहास

पार्श्वभूमी गेल्या काही दिवसांत पेशवे (ब्रिटिशांहून) क्रूर आणि भेदभाव करणारे म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. असो याबद्दल चर्चा नंतर. आजकाल पेशव्यांचा फक्त मोजकाच (स्वतःला पटतो तेवढाच) इतिहास वाचला, सांगितला आणि वापरला जातो, पण अटकेपार भगवा फडकवण्याबद्दल फारसं बोललं जात नाही! पण या सगळ्या इतिहासात आजचा दिवस बरेच जण विसरून गेलेत. ८ मे ही तारीख खरं तर कुठेतरी, […]

Read More