इसापनिती मधील ही आणखी एक लोकप्रिय कथा “वारा आणि सूर्य”. तर कथा अशी आहे की एकदा वारा आणि सूर्य यांचे “अधिक ताकदवान कोण?” यावरून भांडण होते. दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होत नाही. त्यांचे भांडण चालू होते तोच एक माणूस अंगावर शाल पांघरून तिथून चालला होता. सूर्य वाऱ्याला म्हणाला,
“तो बघ एक माणूस शाल पांघरून चालला आहे. आपल्यापैकी जो त्या माणसाच्या अंगावरून शाल काढून / उतरवून दाखवेल तो खरा ताकदवान. काय म्हणतोस? लावतोस का पैज?”
“चल पैज!” वारा रागाने भावनेच्या भरात आणि अविचाराने पैज मान्य करतो.

वारा माणसासमोर येतो आणि माणसाच्या अंगावर जोरात फुंकर घालतो. सोसाट्याचा वारा सुटतो. एकदम इतका वारा आल्याचं पाहून माणूस भांबावून जातो. शाल उडून जाईल या भीतीने, शालीला आणखीनच घट्ट धरतो. वारा पूर्ण जोर लावतो पण माणूस शालीवरची पकड आणखीनच घट्ट करतो. शेवटी थकून वारा माघार घेतो.

आता सूर्याची पाळी येते. सूर्य शांतपणे त्या माणसाच्या माथ्यावर येतो. माणसाकडे एकटक बघू लागतो. सूर्य माथ्यावर तापतो आणि माणसाला भयंकर उकडायला लागतं शेवटी तो माणूस आपल्या अंगावरची शाल उतरवून पिशवीत ठेवतो. आणि अशा प्रकारे सूर्य पैज जिंकतो!
आता या कथेचं लोकप्रिय तात्पर्य असे सांगितले जाते की, “श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जोर लावायची आणि आदळआपट करायची गरज नसते, शांत राहून श्रेष्ठत्व सिद्ध करता येते“
पण ही शिकवण डोकं न चालवणाऱ्यांसाठी, किंवा आततायी लोकांसाठी जास्त लागू पडते. जे तुम्ही आणि मी नाही आहोत. मग आपल्यासाठी या कथेत बोध घेण्यासारखं काय आहे?
पैज माणसाची शाल उडवण्याऐवजी घराची कौलं उडवण्याची किंवा जमिनीवरून एखादे पण उडवण्याची लागली असती तर? सूर्य जिंकू शकला असता का?
आहे ना.. समजा पैज माणसाची शाल उडवण्याऐवजी घराची कौलं उडवण्याची किंवा जमिनीवरून एखादे पण उडवण्याची लागली असती तर? सूर्य जिंकू शकला असता का? नाही ना ! म्हणजेच आपल्याला शिकण्यासारखं हे आहे की भावनेच्या भरात आव्हान स्वीकारू नका, आधी आव्हान कशाबद्दल आहे याचा विचार करा, आपली पात्रता आहे का? आपल्या बलस्थानांचा उपयोग होणार आहे का? ते बघा आणि मग आव्हान स्वीकारा. आव्हान स्वीकारताना आपला अहं आणि अति आत्मविश्वास बाजूला ठेवा (डोक्यात हवा जाऊ देऊ नका) आणि मग आव्हान स्वीकारायचे की नाही ते नीट विचार करून ठरवा.
आव्हान स्वीकारताना आपला अहं आणि अति आत्मविश्वास बाजूला ठेवा (डोक्यात हवा जाऊ देऊ नका) आणि मग आव्हान स्वीकारायचे की नाही ते नीट विचार करून ठरवा. 🤠
आमचे इतर ब्लॉग्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.