Pattie Boyd “Layla” आज १७ मार्च म्हणजे Pattie Boyd “Layla” चा जन्मदिन! Pattie Boyd हे नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला ही व्यक्ती नक्की कोण आहे हे समजणार नाही! संदर्भ देखील लागणार नाहीत. पण ज्यांना Rock संगीतात रस आहे त्यांच्या कानावरून Eric Clapton या कलाकाराचे Layla हे गाणे एकदा तरी जातेच. जिच्या प्रेमात पडून Eric Clapton ला […]
ब्रुटस तू सुद्धा !?
अंगावर उंची वस्त्रे परिधान करून नेहमीप्रमाणे तो सभेत आला. विश्वविजेता म्हणून ज्याची ख्याती होती आणि प्रखर शासक म्हणून ज्याचा वचक होता. तो राजा आपल्या सभेकडे नजर टाकून आपल्या सिंहासनाच्या दिशेने जाऊ लागला. सभागृहात शांतता होती. एक विचित्र शांतता. सर्पाने काळोखात लपून बसावे अशी शांतता. पण त्याने दुर्लक्ष केले कारण अशा अनेक सर्पांना त्याने युद्धभूमीवर हरवलेले […]
हिरु ओनोडा – अखेरचा सैनिक! आत्मसमर्पण न करणारा एक असामान्य सैनिक
हिरू ओनोडा – पूर्वार्ध हिरु ओनोडा.. आज पुन्हा या असामान्य सैनिकांची अविश्वसनीय गोष्ट वाचनात आली. कारण आजच्या दिवशी म्हणजे ९ मार्च १९७४ रोजी अखेर “आपल्या कमांडिंग ऑफिसरने अधिकृतरीत्या सांगितलेले नसल्याने, विश्वयुद्ध संपले हे जवळजवळ तीस वर्षे मान्य न करणाऱ्या” त्या सैनिकाने आपले शस्त्र खाली ठेवले! त्या जपानी सैनिकांची गोष्ट मी पूर्वी देखील कधीतरी वर्तमानपत्रात वाचली […]
छत्रपती शिवाजी महाराज आणि “गोब्राह्मण”
गोब्राह्मण प्रतिपालक सध्याच्या राजकारणाने प्रेरित समाजात कुठली गोष्ट सनसनाटी होईल, कुठली वादग्रस्त होईल आणि कुठली गोष्ट भावना दुखावणारी होईल हे सांगता येणं कठीण आहे. त्यातून जेव्हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा येतो तेव्हा तर विचारायलाच नको. यातलाच एक वितंड म्हणजे शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते की नव्हते? खरं सांगायचं तर काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदी २०-२५ वर्षांपूर्वी […]
अखंड सावधान असावे – समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र
नुकतीच दासनवमी होऊन गेली. श्री समर्थ रामदास स्वामींचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व इतके अगाध आणि प्रचंड आहे की, आमच्या मते अजूनही त्यांची योग्यता पूर्णतः लोकांच्या लक्षात आलेली नाहीये. ऐकीव माहिती, राजकीय कारस्थाने आणि ऐतिहासिक अभ्यासाचा अभाव या विखारी त्रयीनीं अनेक महापुरूषांप्रमाणे समर्थ रामदास स्वामींचे चरित्र देखील सामान्य माणसाच्या आकलनापासून दूर नेवून ठेवलेले आहे. तरीही समर्थांचे इतके […]
व्हॅलेंटाईन डे – इतिहास आणि आख्यायिका
व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी म्हणजेच हा दिवस तरुण (मनाने आणि वयाने दोन्ही) मंडळींचा एक आवडता दिवस. आपल्या प्रियकराला, प्रेयसीला, नवऱ्याला, बायकोला एखादी भेटवस्तू देणे किंवा गुलाबाचे फूल देणे, त्यांच्याबरोबर फिरायला जाणे आणि मजा करणे, एवढंच जवळपास सगळ्यांना माहित आहे. कुणा कुणाला या दिवसामागच्या इतिहासाबद्दल थोडीफार देखील माहिती असते. एकंदरीतच व्हॅलेंटाईन डे हा ताजेपणा, प्रेम आणि […]
अनागोंदी कारभाराचा गमतीशीर इतिहास
“अनागोंदी कारभार” वाक्प्रचार “अनागोंदी कारभार” भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी जनांसाठी काही नवीन नाही! सरकार दरबारी तर अनागोंदी कारभार जणू पाचवीलाच पूजलेला आहे. सगळ्यांना या वाक्प्रचाराचा अर्थ माहित आहे. अनागोंदी कारभार म्हणजे पूर्ण अव्यवस्था, भोंगळ कारभार किंवा कशाचा कशाला मेळ नसणे! पण अनेकदा हा प्रश्न पडायचा की हा वाक्प्रचार आला कुठून? अनागोंदीचा काय अर्थ आहे? विशेषतः […]
दामाजी नाईक – अपरिचित दर्या सुभेदार!
दामाजी नाईक आणि पेशव्यांचे आरमार केवळ युद्धनौका शत्रुच्या हाती लागू नये म्हणून नौकेसकट अग्निसमाधी घेणारे शूर वीर “दामाजी नाईक”! गोष्ट आहे १७५०-६० च्या आसपासची. पण, माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या जवळजवळ कोणालाच या वीर योद्ध्याचे नाव देखील माहित नसेल. जिथे पेशव्यांबद्दल माहिती नसते तिथे त्यांच्या आरमाराबद्दल माहिती असणे फारच दूर राहिलं! “पेशव्यांचे आरमार” हे शब्द […]
बाजार बुणगे म्हणजे कोण?
बाजार बुणगे .. (गैर) समज बाजार बुणगे! हे विशेषण राजकारणाच्या कर्दमी वाटांवर वारंवार ऐकायला मिळते. मी देखील बाजार बुणगे हा शब्द लहानपणापासून ऐकत, वाचत आलेलो आहोत. पण, साधारण अर्थ समजला तरीही नेमका अर्थ कधी कळला नाही. ज्या वयात वाचन कमी होते त्या काळी बाजार बुणगे, या शब्दांचा अर्थ समजून घेताना “बाजार” या शब्दावर देखील अधिक […]
दारूबंदी ! गोष्ट अमेरिकेतील “दारूबंदी”ची
दारूबंदी आणि काही प्रश्न कोणत्याही देशात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा, नेते दारूबंदी करण्याबद्दल विचार करत असतात. भारतात देखील वेळोवेळी ड्राय डे (दिवसभराची दारूबंदी) घोषित केलेले आहेत. अनेक राज्यांमध्ये कायद्याने दारूबंदी केलेली आहे. दारूबंदी बद्दल लोकांची अगदी टोकाची भूमिका ऐकायला मिळते. अर्थातच यामागे कारणे देखील आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत, […]