जय देव जय देव निजबोधा रामा ।परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।। स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली ।तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।जय देव जय देव निजबोधा रामा ।। १ ।। उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह अहंभाव रावण निवटोनी ।। […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग ३
जेजुरी गड आणि कडेपठार या शृंखलेतील मागील भागात आपण खंडोबाचे मंदिर ते कडेपठार या मार्गाबद्दल माहिती पाहिली. अर्थातच ती रोमांचक होतीच पण या पुढचा जो आमचा प्रवास घडला, जी यात्रा घडली आणि जे काही अनुभव आले ते आणखीन रोमांचक आहेत. कारण आतापर्यंत मी फक्त प्रवास, भौतिक वस्तू आणि त्यांच्याबद्दल माझे अध्यात्मिक आणि इतर विचार व्यक्त […]
मनुस्मृति : भेसळ आणि संदर्भहीन दिशाभूल
आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप […]
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले – संत तुकाराम महाराज (भावार्थ)
एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।। गाढव आणि ब्रह्मचर्य संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात […]
नेणीव म्हणजे काय?
“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
बोअरिंग जॉब? ऐका भगवद्गीता काय सांगते
प्रत्येकाच्या आजूबाजूला किमान एक व्यक्ती तरी असतेच जिला आपला जॉब बोअरिंग वाटत असतो, कंटाळवाणा वाटत असतो. त्या व्यक्तीला जर आपण विचारलं “मग कशाला करतोयस हे काम?” तर ती व्यक्ती कुटुंब, अर्थार्जन इत्यादींचा आधार घेत म्हणते “पर्याय नाही”. अशा वेळेस त्याला काय उत्तर द्यावं किंवा सांगावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर, “निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान” अवघ्या […]
आरती करितो गणपतीदेवा – गणपतीची आरती
शब्दयात्री कडून भक्तांसाठी गणपतीची आणखीन एक नितांत सुंदर आरती आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥ पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥ नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥
मनुस्मृति – हिंसा आणि धर्म
मनुस्मृति बद्दल जितके समज पसरलेले आहेत त्यावरून, या ग्रंथात हिंसा, न्याय, दंड इत्यादी विषयांवर काय सांगितले आहे हे फारसे कुणाला माहित असेल असे वाटत नाही. पण आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे ते भावनिक न होता वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे हे तर्कसंगत आहे. हिंसा हा शब्द कानावर पडताच जवळजवळ सगळ्या भारतीयांना “अहिंसा परमो धर्मः” हे […]
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी – संत ज्ञानेश्वर महाराज – अर्थ आणि भावार्थ
संत ज्ञानेश्वर महाराज “माऊली” महाराष्ट्राच्या अध्यात्मिक नभांगणातील एक अढळ आणि प्रखर ध्रुवतारा. इतक्या कमी वयात इतकी अध्यात्मिक उंची गाठणं हे फक्त अवतारी पुरुषच साधू जाणे! माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच आजूबाजूचा प्रपातासारखा वाहणारा काळ एका क्षणात सामावून जातो आणि उरते ती […]