एक जुनी झेन कथा आहे. एकदा एक तरुण संन्यासी शांती च्या शोधात आपल्या गुरूंकडे गेला आणि म्हणाला, “मला आत्मज्ञानाची खूप ओढ आहे, पण माझे मन स्थिर होत नाही. मला शांती कशी मिळेल?” गुरू हसले आणि म्हणाले, “चल, माझ्यासोबत ये.” त्यांनी संन्यासीला एका नदीकाठावर नेलं. नदी खळखळ वाहत होती. गुरू म्हणाले, “ही नदी पाहा. ती कधी […]
झेन कथा मराठीत – संयमी योद्धा
ही झेन कथा आहे एका योद्धाची, संयमी योद्धाची! पूर्वी जपानमध्ये एक उत्तम तलवारबाज होते. त्यांची ख्याती मोठी होती. याला आणखीन एकच कारण म्हणजे, ते झेन मास्टर देखील होते. झेन मास्टर आणि उत्तम तालवारबाज, वयाने ज्येष्ठ आणि प्रावीण्याने श्रेष्ठ त्यामुळे त्यांची चांगलीच ख्याती होती. त्याच काळात आणखीन एक तलवारबाज होता. उत्तम होता. त्याची एक सवय होती. […]
झेन कथा मराठीत – एशुन वर उघड प्रेम
ही झेन कथा आहे एशुन नावाच्या झेन शिष्येची. कथा छोटी आहे पण मानवी मनाच्या भित्रेपणाबद्दल, स्वतःची फसवणूक करण्याबद्दल आणि सत्यनिष्ठतेबद्दल बरंच काही सांगणारी आहे. कथा अशी.. एका झेन मठात, अनेक शिष्य जमत असत. एकदा झालं असं की एके वर्षी त्या झेन मठात २० पुरुष शिष्य आणि एकच स्त्री शिष्या होती. ती शिष्या म्हणजे “एशुन”! एशुन […]
झेन कथा मराठीत – सगळं काही सर्वोत्तम ! (Everything’s Best!)
सर्वोत्तम दुकान. चांगले आणि वाईट ही काही अंशी मनाची समजूत देखील आहे. तसेच प्रामाणिक माणसाची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची, निवडण्याची दृष्टी देखील वेगळी असते. मनाने सर्वोत्तम असणे जास्त महत्त्वाचे आहे. अशा मानसिकतेच्या दुकानदाराचे सर्वोत्तम दुकान पाहून झेन गुरूंना देखील ज्ञान मिळाले! जपानी झेन गुरू बानझान यांच्यासमोर घडलेली ही घटना. घटना तशी साधारण आहे पण, त्यातून मिळणारी […]
चहा घ्या! – झेन कथा मराठीत
पूर्वी जपानमध्ये एक जोशु नावाचे एक गुरु होऊन गेले. जोशु गुरु त्यांच्या दुर्बोध सवयींसाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येकाला “चहा घ्या” असं म्हणत चहा देत असत. बाकी काही विषय वाढत नसे! एकदा एक प्रवासी जोशुंकडे आला. जोशु गुरु सगळ्यांना चहा देत होते. त्यांनी अनोळखी प्रवासी माणसाला विचारले “अनोळखी माणसा, आपण याआधी भेटलो आहोत […]

झेन कथा मराठीत – योग्य प्रमाण (Right Proportion)
जपानमध्ये सेन नोरी क्यु नावाचे चहा बनवण्यात निष्णात गुरू होते. ते त्यांच्या चहातील पदार्थांचे आणि प्रक्रियेचे प्रमाण यांच्यासाठी प्रसिद्ध होते. या गुरूंची ही, आयुष्यात योग्य प्रमाणाचे महत्त्व सांगणारी गोष्ट. एकदा सेन नोरी क्यु गुरूंना आपल्या घराच्या एका खांबावर फुलाच्या परडीसाठी एक खिळा ठोकायचा असल्याने, त्यांनी एका सुताराला बोलावले. सुतार आला आणि त्याने खिळा नक्की कुठे […]
झेन कथा मराठीत – निसरडी वाट (Sleepery Stone)
ज्ञानाची वाट निसरडी असते, प्रत्येक पाऊल जपून ठेवले पाहिजे. साकीतो नावाचे एक झेन गुरू होते. लोक त्यांना Stonehead म्हणत. याला कारण त्यांचे केस नसलेले डोके आणि त्यांची खडकावर बसून एखाद्या स्थिर खडकाप्रमाणे ध्यानसाधनेची सवय. एकदा एका झेन अनुयायाने, अजून एक गुरू मा त्सु यांच्याकडे, गुरू साकीतो यांना आव्हान द्यायची ईच्छा व्यक्त केली. मा त्सु शांतपणे […]

झेन कथा मराठीत – आभार!? (Do You Want Me To Thank you!?
आभार कुणी कुणाचे मागायचे?.. पूर्वी उमेझा नावाचा एक धनाढ्य व्यापारी होता. त्याला दानधर्म करायचा नाद होता. त्याच्या गावात एक शियेत्सु नावाच्या झेन गुरूंचा मठ होता. उमेझाच्या मनात आले की आपण या शियेत्सु गुरूंना काही पैसे दान करू, म्हणजे ते अजून मोठा मठ बंधू शकतील. असा,विचार करून उमेझा, सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या मोठ्या थैल्या घेऊन शियेत्सु गुरूंच्या […]
झेन कथा मराठीत – भिकाऱ्याचे झेन (Story of Tosui A Beggar’s Zen)
तोसुई नावाचे एक खूप प्रतिष्टीत आणि मोठे झेन धर्मगुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. तोसुई वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये जाऊन प्रवचन द्यायचे. झेन ची प्रवचने देता देता त्यांची ख्याती इतकी वाढली की त्यांच्या अनुयायांची संख्या खूप जास्त वाढली. जिथे जिथे तोसुई जायचे तिथे तिथे त्यांचे अनुयायी जायचे. हळूहळू तोसुई गुरूंना याचा उबग आला आणि […]
झेन कथा मराठीत – एशून चा मृत्यू (Eshun’s Death)
स्त्री झेन संन्यासी एशून साधारण ६० वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांना जाणीव झाली की हा दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे, मृत्यू समिप आलेला आहे! त्यांनी आजूबाजूच्या झेन अनुयायांना सारणासाठी लाकडे गोळा करायला सांगितली. अनुयायी थोडे विचारात पडले पण नंतर त्यांनी लाकडे गोळा केली. हळुहळू चिता बनते. एशून त्या सरणावर जाऊन मध्यभागी बसतात आणि चिंता पेटवायला सांगतात. […]