वृत्ताचे नाव – अनुष्टुभ (अनुष्टुप)
वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त)
वृत्त मात्रा संख्या – निश्चित नियम नाही
वृत्त अक्षर संख्या – एकूण ३२, प्रत्येक चरणात ८ अक्षरे
गणांची विभागणी – निश्चित नियम नाही
यति – ८ व्या अक्षरानंतर
नियम –
अनुष्टुभ वृत्तात / छंदात गणांचा निश्चित क्रम अथवा, मांडणी अपेक्षित नसते. पण कितव्या अक्षरावर लघु किंवा गुरू गण असावा याबद्दल नियम आहे. पण अनेकदा या नियमाचे उल्लंघन झालेले दिसते.
पञ्चमं लघु सर्वत्र सप्तमं द्विचतुर्थयोः । गुरु षष्ठं च पादानां शेषेष्वनियमो मतः
प्रत्येक चरणात पाचवे अक्षर लघु असले पाहिजे, सहावे आणि सातवे अक्षर आलटून पालटून लघु – गुरू गण! बाकी अक्षरांसाठी कुठला नियम नाही.
अनुष्टुभ (अनुष्टुप) बद्दल माहिती
अनुष्टुभ (अनुष्टुप) छंद अत्यंत प्राचीन छंद आहे. वेदांपासून, उपनिषदांपर्यंत आणि रामायणापासून श्री रामदासस्वामी कृत मारुती स्तोत्रापर्यंत अनंत काव्ये, श्लोक, स्तोत्रे अनुष्टुभ छंदात रचलेली आहेत. उपयोग करण्यास अत्यंत सोपा असा हा छंद ८-८ अक्षरांची समान विभागणी असल्यामुळे पठण करण्यास सोपे जाते.
संस्कृत मध्ये अनुष्टुभ म्हणजे गुणगान करणे, प्रशंसा करणे.
अनेक जणांना या छंदाला अनुष्टुभ म्हणावे की अनुष्टुप म्हणावे याबद्दल प्रचंड शंका असते. पण काळजी करू नका भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार अनुष्टुभ आणि अनुष्टुप एकच आहेत!
अनुष्टुभ (अनुष्टुप) छंद ब्रह्माण्डाचे वर्णन करते असे मानले जाते. ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात ब्रह्माण्डाचे वर्णन अनुष्टुभ (अनुष्टुप) छंदातील २ कडव्यात वर्णन केलेले आहे.
काही काही कवी अनुष्टुप / अनुष्टुभ छंदाला श्लोक असे देखील म्हणतात.
अनुष्टुप म्हणजे संस्कृतमध्ये तुपाचा अभाव असा देखील होतो पण याचा आणि छंदाचा काहीही संबंध आढळून आलेला नाही!
वृत्ताचे लक्षणसूत्र
१.
पाचवे लघु साहावे
ते गुरू सगळीकडे
आलटून ऱ्हस्व दीर्घ
पालटून सप्ताक्षरी
– (“हृद्रोग”, रोहित बापट)
२.
पञ्चमं लघु सर्वत्र सप्तमं द्विचतुर्थयोः ।
गुरु षष्ठं च सर्वेषाम् एतच्छ्लोकस्य लक्षणम् ॥
३.
पञ्चमं लघु सर्वत्र सप्तमं द्विजतुर्थयोः |
गुरु षष्ठं च पादानां चतुर्णां स्यादनुष्टुभि ॥
– (“वृत्तरत्नाकरम्”)
अनुष्टुभ (अनुष्टुप) वृत्ताची उदाहरणे
अनुष्टुभ छंदाची सर्वोत्तम उदाहरणे म्हणजे “श्री रामरक्षा स्तोत्र“, श्रीमद्भगवद्गीता, महामृत्युंजय मंत्र आणि “मारुती स्तोत्र”
चरितं रघुनाथस्य
शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां
महापातकनाशनम् ॥१॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं
रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं
जटामुकुटमण्डितम् ॥२॥
– (“श्रीरामरक्षा स्तोत्र”, बुधकौशिक ऋषी)
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे
समवेता युयुत्सव:
मामका: पाण्डवाश्चैव
किमकुर्वत सञ्जय
..
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे ॥४-८॥
– (“श्रीमद्भगवद्गीता”, श्री व्यास मुनी)
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनात्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
– (“महामृत्युंजय मंत्र”)
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
– (“मारुती स्तोत्र”, श्री समर्थ रामदास स्वामी)
अनुष्टुभ (अनुष्टुप) वृत्ताची आणखीन काही उदाहरणे खाली देत आहे. यांचा उपयोग वाचक/विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी करू शकतात. तुमचा अभ्यास या ब्लॉगच्या comments मध्ये दाखवू शकता. आणखीन काही उदाहरणे असल्यास ती देखील comments मध्ये देऊ शकता!
गागाभट्ट यांनी जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला तेव्हा सर्व संस्कार, कृती आणि व्यवहार “शिवराजाभिषेकप्रयोग:” मध्ये लिहून ठेवले
त्वं नो गुरु: पिता माता प्रभुस्त्वं च परायणम्।
त्वत्प्रसादाच विप्रर्षे सर्व मे स्यान्मनोगतम्॥१५३॥
आपव्दिमोक्षणार्थाय कुरु यज्ञमतंद्रित: ।
ऋत्विग्भि: सहितै: शुध्दै: संयतै: सुसमाहितै: ॥१५४॥
– (“शिवराजाभिषेकप्रयोग:”, गागाभट्ट)
मातेंचि मानुनी थोर ।
कर्मे सर्व समर्पिती ।
तरी अद्वैतयोगेंचि ।
मातें ध्याती उपासती
– (वामन पंडित)
लग्नात कन्यादान करते वेळी वधुपित्याने खालील मंत्र म्हणून कन्यादान करायचे असते. हा श्लोक पठण करून धर्म,अर्थ, काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्ध्यर्थं ही कन्या तुम्हास दिली आहे. धर्म, अर्थ, काम पुरुषार्थासमयी तिचे उलंघन करू नये, असे वरास सांगावे.
गौरी कन्यामिमां विप्र यथाशक्तिविभूषिताम् ।
गोत्राय शर्मणे तुभ्यं दत्ता विप्र समाश्रय ।
कन्ये ममाग्रतो भूयाः कन्ये मे देवि पार्श्वयोः ।
कन्ये मे पृष्ठतो भूयास्त्वद्दानान्मोक्षमाप्नुयाम् ॥
मम वंशकुले जाता पालिताबहु वत्सरान् ।
तुभ्यं विप्रा मया दत्ता पुत्रपौत्रप्रवर्धिनी ॥
धर्मेचार्थे च कामे च नातिचरितव्या त्वयेयम् ॥
करूनि काय जिंकील रविला काजवा रण ॥
करिल गज-वक्राचे काय गा काज वारण ॥
साधूच्या लंघनी होतो नीचाचा घात रोकडा ॥
बोकडा मारक नव्हे मेरूचा काय हो कडा ॥
– (“अंबरीषाख्यान”)
प्रियंवदा वृत्तातील या ब्लॉगच्या comments मध्ये तुम्हीही आणखीन उदाहरणे देऊ शकता!