पूर्वी कर्नाटकातील होयसळ राज्याचा विष्णू वर्धन नावाचा एक राजा होता. विष्णू वर्धन वैष्णव पंथ पाळत असे. त्याचा आदी शंकराचार्यांच्या “माया” सिद्धांताला विरोध होता. अवघे विश्व एक माया आहे असं आदी शंकराचार्यांचं म्हणणं होतं. याचा एक अर्थ असाही होतो की राजाकडे जी काही संपत्ती, राज्य वगैरे आहे ती सगळी माया आहे. कोणत्या राजाला हे ऐकायला आवडेल. एकदा राजा विष्णू वर्धन ने आदी शंकराचार्यांना धडा शिकवायचं ठरवलं.
आदी शंकराचार्य दक्षिण भारतात भ्रमण करत होते. तेव्हा विष्णू वर्धनने त्यांना होयसळ ला बोलावले. राजवाड्यात एका मस्तवाल हत्तीला लपवून ठेवले. आदी शंकराचार्यांनी येण्याचे मान्य केले. जसे आदी शंकराचार्य राजवाड्यात आले, राजाने त्यांच्यावर त्या मस्तवाल हत्तीला सोडायचा दिला. तो मस्तवाल हत्ती शंकराचार्यांच्या दिशेने धावला, तसे ते देखील बचावासाठी धावले.
हे पाहून उन्मत्त राजा उद्गारला
“शंकराचार्य! तुम्ही तर म्हणत होते की जगात सगळं काही माया आहे. मग आता या हत्तीपासून लांब कशाला पळत आहात?”
तेव्हा आदी शंकराचार्यांनी उत्तर दिले
“राजा! माझे पळणे देखील एक माया आहे!”
राजा खजील झाला आणि त्याला आपली चूक समजली..