सर्वोत्तम दुकान. चांगले आणि वाईट ही काही अंशी मनाची समजूत देखील आहे. तसेच प्रामाणिक माणसाची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची, निवडण्याची दृष्टी देखील वेगळी असते. मनाने सर्वोत्तम असणे जास्त महत्त्वाचे आहे. अशा मानसिकतेच्या दुकानदाराचे सर्वोत्तम दुकान पाहून झेन गुरूंना देखील ज्ञान मिळाले! जपानी झेन गुरू बानझान यांच्यासमोर घडलेली ही घटना. घटना तशी साधारण आहे पण, त्यातून मिळणारी […]
चहा घ्या! – झेन कथा मराठीत
पूर्वी जपानमध्ये एक जोशु नावाचे एक गुरु होऊन गेले. जोशु गुरु त्यांच्या दुर्बोध सवयींसाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या मठात येणाऱ्या प्रत्येकाला “चहा घ्या” असं म्हणत चहा देत असत. बाकी काही विषय वाढत नसे! एकदा एक प्रवासी जोशुंकडे आला. जोशु गुरु सगळ्यांना चहा देत होते. त्यांनी अनोळखी प्रवासी माणसाला विचारले “अनोळखी माणसा, आपण याआधी भेटलो आहोत […]
वानोळा
माहेरी आलेली लेक, जेव्हा सासरी परत जायला निघते तेव्हा माहेरचे लोक आपल्या लेकीने सासरी रिकाम्या हाती जाऊ नये म्हणून बरोबर “वानोळा” द्यायचे. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आणि घरातील परिस्थितीनुसार कोणत्या वस्तू वानोळा म्हणून द्यायच्या हे ठरवलं जायचं. घरात शेती असेल तर भाज्या, पालेभाज्या, कणसे किंवा शेंगा. फळबागा असतील तर फळे, केळी, नारळ वगैरे. कधी घरातील […]
वैष्णव जन तो – मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर
लहानपणापासून आपण “वैष्णव जन तो” हे भक्तीगीत ऐकत आलेलो आहोत. हे काव्य थोर गुजराती संत, कवी आणि विष्णुभक्त नरसी मेहता (नरसिंह मेहता) यांनी रचलेले आहे. पण खूप कमी जणांना माहित आहे की, या सुपरिचीत भक्तिगीताचे मूळ शब्द वेगळे आहेत. महात्मा गांधींनी आपल्या गायनात वेगळे शब्द आणले. या ब्लॉगमध्ये आम्ही मूळ काव्य व त्याचे मराठी भाषांतर […]
बोबडा बलराम – ग. दि. माडगूळकर (गदिमा) – रसग्रहण
“बोबडा बलराम” नात्याने मोठ्या पण वयाने लहान “दादा”च्या निरागसतेचे दर्शन घडवणारी गदिमा यांची एक अप्रतिम कविता. लहान वयाचा बलराम, कृष्ण सावळा आहे म्हणून यशोदेला काय काय उपाय कर म्हणजे कृष्ण गोरा होईल ते अगदी भाबडेपणाने सांगत आहे. यात “तू गोरी, मी गोरा मग हा कृष्ण काळा कसा?” असा प्रश्न देखील हा बोबडा बलराम आईला विचारतो. अत्यंत वेगळी अशी ही कविता. या कवितेला एक […]
समईच्या शुभ्र कळ्या (संपूर्ण कविता) – आरती प्रभू (अर्थ आणि रसग्रहण)
समईच्या शुभ्र कळ्या – (संपूर्ण कविता) समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते केसातच फुललेली जाई पायांशी पडते. भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे. साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची. गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्याची बोटे वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये […]
स्त्रियांना मताधिकार देणारा जगातील पहिला देश..
स्त्रियांना मताधिकार आजच्या जगात स्त्रियांना मताधिकार असणे, त्यांनी मतदानात सक्रिय सहभाग घेणे इतकंच काय तर उमेदवार म्हणून उभे राहणे हे देखील एकदम सामान्य आहे. कोणालाच यात काहीच विशेष वाटत नाही. पण १९ व्या शतकापर्यंत स्त्रियांना मताधिकार नव्हता हे किती जणांना माहित आहे? ज्या ज्या पाश्चात्य देशांना आपण “प्रगत” समजतो त्या देशांमध्येही स्त्रियांना मतदानाचा अधिकार अगदी आत्ता […]
छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पाटलीणबाईंनी केलेली टीका शांतपणे ऐकून घेतली!
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोडोली गावी मुक्काम छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून स्वराज्यात परत येत होते तेव्हा त्यांनी अनेक ठिकाणी विश्राम केला. अनेक लोकांनी, कुटुंबांनी आणि साधू-संतांनी त्यांची या प्रवासात मदत केली. वेषांतर केल्यामुळे त्यांना कोणीच ओळखू शकत नव्हते. त्याच प्रवासातील हा एक रोचक किस्सा जेव्हा एका गावच्या पाटलीणबाई छत्रपती शिवाजी महाराजांवर भयंकर चिडल्या, त्यांना वाईट साईट बोलल्या. पण, […]
प्रवाह, परिस्थिती आणि नियती.. एक चिंतन
प्रवाहच थांबतो तिथे, जिथे तू उभी असतेस… प्रत्येक वळणावर भेटतेस, कधी साथ देतेस कधी उगाच हात सोडून हरवतेस.वाट असते पण मार्ग दिसत नाही. नशीब म्हणत म्हणत पुढे जाताना पुन्हा प्रत्येक मार्गावर तू दिसतेस…. मी थांबतेच पण पुन्हा पुन्हा तूला प्रश्न विचारावसा वाटतो, साथ देणार की हात सोडणार…?? सहज उत्तरतेस तू पुढे तर चाल, मी आहेच […]
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि आपली जबाबदारी
लोकशाहीमध्ये फक्त लोकच सत्तेत आणू शकतात आणि तेच सत्तेतून बाहेर काढू शकतात. एवढी शक्ती जर लोकांच्या हातात असेल तर जबाबदारी देखील तेवढ्याच प्रमाणात वाढते.