प्रवाहच थांबतो तिथे, जिथे तू उभी असतेस… प्रत्येक वळणावर भेटतेस, कधी साथ देतेस कधी उगाच हात सोडून हरवतेस.वाट असते पण मार्ग दिसत नाही. नशीब म्हणत म्हणत पुढे जाताना पुन्हा प्रत्येक मार्गावर तू दिसतेस…. मी थांबतेच पण पुन्हा पुन्हा तूला प्रश्न विचारावसा वाटतो, साथ देणार की हात सोडणार…?? सहज उत्तरतेस तू पुढे तर चाल, मी आहेच की! तुझ्या ह्या वाक्याने चालण्याचा भलताच धीर येतो…!! पाऊलं पुढे पडतात पण भय, भीती आणि असंख्य शंका मनात घेऊन….!! क्षणात एखादा असा प्रसंग येतो आणि हसाव की रडावं तेच कळत नाही….!! पुन्हा मी तुला विचारते तू ही सहज उत्तरतेस….”तुझं आयुष्य…. हसलीस तरी तुझं भल… रडलीस, अडखळलीस थांबलीस तर तुझचं नुकसान…..!! ती हात झटकून सहज मोकळी होते…, सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत अचानक तू अस काहितरी वागतेस की दोष कोणाचा…?? हा साधा प्रश्न मनात येतो… आणि तुला विचारणार…. त्या आधीच तू उत्तरतेस…..!! जिला एवढे प्रश्न विचारायची धडपड आहे…. तीच दोषी असेल तर…., पुन्हा मी तीच्यासमोर हार मानते आणि ती बाकी कोणीही नसून फक्त आणि फक्त “नियती” च असते……!!! उगाच स्वतःवरच हसून पुन्हा मी स्वतःला, परिस्थितीला दोष देत म्हणते….. तिच्याच मनात नाही…… तर काय होणार….?? !! जी खूप काही करून शून्यातच असते…..!!
तसही शून्यात काही वाढवलं किंवा कमी केल तरी काहीच बदल होत नाही…..!!
Destiny is no matter of chance. It is a matter of choice. It is not a thing to be waited for, it is a thing to be achieve…..!!