Month: June 2020

३० जून १९३४ आणि हिटलर नावाच्या भस्मासुराचा उदय Der große SS-Schutz-Staffel-Appell der Gruppe Ost der SS. in Berlin! Der Stabschef Hauptmann [Ernst] Röhm, (rechts) der Reichsführer der SS. [Heinrich] Himmler, (mitte) und der Gruppenführer der Gruppe Ost der SS. [Kurt] Daluege, (links) beim Gespräch im Lager in Döberitz. August 1933 (Ausschnitt)
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

३० जून १९३४ आणि हिटलर नावाच्या भस्मासुराचा उदय

आपल्या सगळ्यांना हिटलर, त्याची नाझी पार्टी आणि त्याने ज्यूंवर केलेले अनन्वीत अत्याचार यांबद्दल इतिहासाच्या पुस्तकांमधून शिकवलं गेलेलं आहे. पण, जे काही शिकवलं गेलं ते दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगाने. मला हा प्रश्न कायम पडायचा की मुळात हिटलर सत्तेत आलाच कसा? जर्मनीचे लोक तर हुशार समजले जातात. मग त्यांनी अशा क्रूर आणि खुनशी माणसाला निवडून कसं आणलं? त्याने ज्यूंच्या विरोधात चालवलेला प्रचार सगळ्यांना माहिती आहे. पण हिटलरचा […]

Read More
झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong) Image by Pexels from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong)

झेन गुरू बांकेई यांच्या ध्यानसाधनेच्या मठात जपानमधील अनेक झेन पंथाचे अनेक शिष्य आणि पालन करणारे सामील होत असत. एकदा अशा मेळाव्यात बरेच जण सामील झाले होते. एक शिष्य चोरी करताना पकडला गेला. इतर शिष्य, चोरी करणाऱ्या शिष्याला मठातून काढून टाकण्यासाठी तक्रार घेऊन बांकेईंकडे गेले. पण बांकेई गुरूंनी त्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं.  पण पुन्हा एकदा तोच शिष्य चोरी करताना पकडला गेला. आता मात्र इतर शिष्य […]

Read More
विषारी टोमॅटो? – टोमॅटोचा एक रोचक इतिहास
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

विषारी टोमॅटो? – टोमॅटोचा एक रोचक इतिहास

आजच्या दिवशी म्हणजेच २८ जून १८२० साली सगळ्यांनी पहिल्यांदा हे मान्य केलं की टोमॅटो विषारी फळ नाही आणि ते खाण्यास योग्य आहे हे सगळ्यांनी मान्य केलं. ऐकायला विचित्र वाटेल पण इंग्लंड, उत्तर युरोप व अमेरिका येथे कैक वर्षे टोमॅटो हे एक विषारी फळ मानले जात होते.टोमॅटो आपण भाजी म्हणून खात असलो तरी वनस्पतीशास्त्रानुसार टोमॅटो हे […]

Read More
जोगिया Painting by Fr. RENALDI PINXIT
कविता, रसग्रहण, साहित्य

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंगपसरली पैंजणे सैल टाकुनी अंग,दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीतबकात राहिले देठ, लवंगा, साली झूंबरी निळ्या दीपांत ताठली वीजका तुला कंचनी, अजुनी नाही नीज?थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठीते डावलुनी तू दार दडपिले पाठी.  हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान,निरखिसी कुसर वर कलती करुनी मानगुणगुणसि काय ते?- गौर नितळ तव कंठी –स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी. […]

Read More
झेन कथा मराठीत – गोड फळ (Delicious Fruit) Smiling Buddha Image by James C from Pixabay
कथा, झेन कथा, साहित्य

झेन कथा मराठीत – गोड फळ (Delicious Fruit)

एकदा एका माणसाच्या मागे एक वाघ लागला. माणूस जीवाला वाचवण्यासाठी जंगलातून पळत सुटला. वाघ पाठलाग करत होता. पळता पळता माणूस एका खोल दरीच्या इथे पोहोचला. वाघ पाठलाग करतच होता. शेवटी तो माणूस त्या दरीमध्ये जाणाऱ्या एका वेलीला धरून दरीमध्ये उतरला. त्याला वाटलं की सुटलो. तो वाघ त्या दरीच्या वर उभा होता. माणूस त्या दरीमध्ये, एका […]

Read More