एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।। गाढव आणि ब्रह्मचर्य संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात […]
ठाकूर कुशाल सिंह राठोड – १८५७ च्या उठावात ब्रिटिशांना आव्हान देणारे ठाकूर
ठाकूर कुशाल सिंह राठोड १८५७ चा उठाव म्हटलं की आपल्याला काही ठराविक नावेच आठवतात. आजच्या दिवसाचा म्हणजेच २१ ऑगस्ट चा इतिहास शोधताना एक पोस्ट दिसली. आणि लक्षात आलं की या वीराचे नाव देखील आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा ठाकूर कुशाल सिंह राठोड यांच्याबद्दल थोडी माहिती मिळवली. अर्थातच इतिहास मोठा विस्तृत असणार आहे. आगामी काळात आणखीन भर […]
बुद्धाचा ऱ्हाट – उत्तम कांबळे – पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – बुद्धाचा ऱ्हाटलेखक – उत्तम कांबळे प्रकाशक – मनोविकास प्रकाशन (ISBN 9789385266515)अधिकार – उत्तम कांबळे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काळ आहे म्हणजेच साधारण १९५०. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्याबरोबर करोडो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला या घटनेच्या पार्श्ववभूमीवर ही कथा घडते. देश स्वतंत्र झाला तरीदेखील आपण स्वतंत्र झालेलो नाही, माणूस झालेलो नाही, वर्षानुवर्षांची जातीची […]
जोन ऑफ आर्क : एका रणरागिणीची करुण कहाणी..
इतिहास आणि फ्रांस इतिहासात असे क्वचितच वाचायला किंवा ऐकायला मिळते की ज्यांनी एखाद्या राजाला, सिंहासन मिळवून दिले त्यांनाच राजाने दगा फटका केला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीत हे खरे आहे की ज्यांनी क्रांती आणली, त्यांनाच अखेर या क्रांतीमध्ये शिरच्छेदाला सामोरे जावे लागले. पण राजांनी असे केल्याचे फारसे ऐकिवात नाही. पण जोन ऑफ आर्क च्या बाबतीत मात्र असेच […]
सर्सर सर्सर वाजे, पत्ताच पत्ताच नाही – आरती प्रभू
“सर्सर सर्सर वाजे” आरती प्रभू यांची एक अप्रतिम निसर्गकविता जिला मानवी अनुभवविश्वाचे संदिग्ध गोंदण लाभले आहे. आरती प्रभू म्हणजे अर्थातच खानोलकर यांच्या कवितेत कायमच एक प्रकारची अस्वस्थता, उणीव आणि रुखरुख जाणवते. आरती प्रभू अस्सल हाडाचे कवी आणि कलावंत होते. एखाद्या कलावंताचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि अनुभवले. कोकणच्या मातीत जन्माला आलेला हा मनस्वी कवी नेहमीच […]
पांडवेश्वर – माझे अपूर्ण तीर्थाटण
तारीख २१ फेब्रुवारी. माझ्यासाठी महत्वाचा असलेल्या या दिवशी आम्ही कुटुंबीयांनी थेऊर आणि नंतर मोरगाव येथे जाऊन श्रींचे दर्शन घ्यायचे ठरवले. ही दोन तीर्थक्षेत्रे ठरताच, वडिलांनी आणखीन एका प्राचीन शिवालयाचे नाव सुचवले “पांडवेश्वर”. खरं सांगायचं तर मला पांडवेश्वर या शिवल्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पांडवांनी या शिवालयाचे स्थापना केली अशी आख्यायिका आहे. वडिलांना वर्तमानपत्रे किंवा तत्सम लेखातून […]
अब्राहम लिंकन यांनी दाढी वाढवली!
वाचकहो! जगात काही गोष्टी, काही घटना इतक्या रोचक असतात की त्या सांगितल्यावाचून चैन पडत नाही. अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहम लिंकन आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. प्रत्येकाने किमान एकदा तरी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेलच. त्यांचे फोटो, पुतळे आणि विशिष्ट शरीरयष्टी देखील सुपरिचित आहे. पण.. एक गोष्ट जी या सगळ्यात सर्रास दिसते ती आधीपासून तशी नव्हती. ती […]
पंचचामर वृत्त – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – पंचचामर वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ + १५ वृत्त अक्षर संख्या – ११ + ११ गणांची विभागणी – ज, र, ज, र, ज, ग (ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा) यति – इंद्रवज्रा आणि […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग २
“जेजुरी गड आणि कडेपठार” च्या मागच्या भागात आपण जेजुरी गडाची यात्रा केली. आता या ब्लॉगमध्ये आपण जेजुरी गड ते कडेपठार आणि कडेपठाराहून परत जेजुरी गड अशी यात्रा करू. जेजुरी गडावर त्यामानाने गर्दी अधिक असल्यामुळे आम्ही (म्हणजे मी आणि माझे बाबा) कडेपठाराकडे कूच करायचे ठरवले. आणि त्या दिशेने जाऊ लागलो. पादत्राणे जिथे काढली होती त्या ठिकाणी […]
बोअरिंग जॉब? ऐका भगवद्गीता काय सांगते
प्रत्येकाच्या आजूबाजूला किमान एक व्यक्ती तरी असतेच जिला आपला जॉब बोअरिंग वाटत असतो, कंटाळवाणा वाटत असतो. त्या व्यक्तीला जर आपण विचारलं “मग कशाला करतोयस हे काम?” तर ती व्यक्ती कुटुंब, अर्थार्जन इत्यादींचा आधार घेत म्हणते “पर्याय नाही”. अशा वेळेस त्याला काय उत्तर द्यावं किंवा सांगावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर, “निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान” अवघ्या […]