September 13, 2025

Category: मुक्तांगण

कला म्हणजे काय? – एक विचित्र उदाहरण
ब्लॉग, मुक्तांगण

कला म्हणजे काय? – एक विचित्र उदाहरण

कला म्हणजे काय? “कला” समस्त मानव प्रजातीला प्रत्येक पिढीला पडणारा एक सनातन प्रश्न. आज पुन्हा या प्रश्नाच्या मृगजळात काही काळ यथेच्छ डुंबून घेतलं. ट्विटरवर एक ट्विट पाहिला ज्यात काही चित्रांची अनेक दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे असं सांगण्यात आलं होतं. अर्थातच जेव्हा कुठल्या कलाकृतीला एवढी किंमत मिळते तेव्हा चकित व्हायला होतं. कलाकार म्हणून थोडा आनंद पण […]

Read More
त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर
इतिहास/आख्यायिका, फेरफटका, ब्लॉग, मुक्तांगण

त्रिशुंड गणपती मंदिर – पुण्यातील एक अद्भुत आणि अपरिचित मंदिर

त्रिशुंड गणपती – थोडी पार्श्वभूमी काही कलाकृती, काही जागा आणि काही मंदिरे दुर्दैवाने अपरिचित राहतात. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर हे असेच एक अत्यंत अपरिचित, दुर्लक्षित आणि अद्भुत मंदिर! १७५४ च्या दरम्यान बांधलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे एका दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देते. हिंदू मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत. हिंदू मंदिर ही कला, श्रद्धा आणि इतिहास यांचा […]

Read More
एक पावसाळी रात्र – फांदीवरून उडून गेलेला पक्षी
ब्लॉग, मुक्तांगण, ललित

एक पावसाळी रात्र – फांदीवरून उडून गेलेला पक्षी

आभाळाच्या झाडावर मेघांचे घरटे थरथर होते. मला माझा एकांत सहसा सलत नाही पण हा एकटेपणा मात्र खायला उठतो. पाऊस सुरू आहे, संथ.. अविरत जणू त्याला मृत्यूचे भयच नाही. अल्लड झालाय हल्ली म्हणे. विचारांनी मला वेढून टाकलंय म्हणू की मी विचारांचे पांघरूण केलयं म्हणू? प्रत्येक प्रसंग अनुभवांच्या पन्हाळीतून आपली ओल मागे ठेवत वाहतोय, एका अगम्य आणि […]

Read More
कांचन आणि आपट्याचे पान ।
ब्लॉग, मुक्तांगण

कांचन आणि आपट्याचे पान ।

दसरा आला की मला आपट्याच्या पानांपेक्षा जास्त आठवण येते ती कांचनाच्या पानांची! कवी ग्रेस यांचे एक वाक्य आहे, “रामाच्या वनवासाची खरी भागीदारीण झाली उर्मिला”. कांचनाच्या पानांची मला थोडी फार तशीच गत वाटते. वर्षानुवर्षे लोक आपट्याची पाने म्हणून कांचनाची पाने ओरबाडत आहेत, बाजारात विकत आहेत आणि विकत घेणारे विकत घेत आहेत. एखाद्याने अभागी असावे तरी किती? […]

Read More
सध्याचे ऐतिहासिक चित्रपट आणि उथळ विचार
ब्लॉग, मुक्तांगण

सध्याचे ऐतिहासिक चित्रपट आणि उथळ विचार

माझ्या आयुष्यात घडलेली घटना.. एक जण गेल्या ५-७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिका व चित्रपट यांचे दाखले देत तावातावाने मुद्दे मांडायचा प्रयत्न करत होता.त्याला साधा प्रश्न विचारला “आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांबरोबर कोण कोण होते आणि त्यांना कोणी कोणी मदत केली?”तेव्हापासून बिचारा ऑफलाईन आहे! ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांच्यात दाखवल्या जाणाऱ्या घटना, त्या ज्या पद्धतीने मांडल्या जात […]

Read More
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास
ब्लॉग, मुक्तांगण

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास

आजची लोकशाही.. थोडी पार्श्वभूमी आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आलेला आहे. अनेक माध्यमांद्वारे लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. बघावं तिकडे लोकशाहीचा उदो उदो सुरु आहे. मी मात्र एका विचाराने त्रस्त आहे. तो मी मांडेनच. पण त्याच्या आधी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणं गरजेचं आहे. सांप्रत काळात लोकशाहीला राज्यव्यवस्थेचा सर्वोत्तम मार्ग असे घोषित केलेले आहे. माझ्याही […]

Read More
चौकटीतले विश्व – गरज, प्रारब्ध, लाचारी आणि करुणा
चौकटीतले विश्व, फेरफटका, ब्लॉग, मुक्तांगण

चौकटीतले विश्व – गरज, प्रारब्ध, लाचारी आणि करुणा

चित्र हजार शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते हे मी नवीन सांगण्याची गरज नाही. पण कधी कधी एखादा प्रसंग, मनाच्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये असा काही बसतो की विचारांची ढवळाढवळ सुरु होते. काही दिवसांपूर्वी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. फिरत फिरत जंगली महाराज रस्त्यावर आलो. बालगंधर्व जवळील फुटपाथवर चालण्याची इच्छा झाली. त्यातल्या त्यात बरा भाग आहे चालण्यासाठी. आधीच काही फोटो, […]

Read More
फेरफटका – आजचा काल (Pune Street Photography)
चौकटीतले विश्व, प्रवास, फेरफटका, ब्लॉग, मुक्तांगण

फेरफटका – आजचा काल (Pune Street Photography)

पहाटे उठल्या उठल्या आधी खिडकीतून बाहेर बघितलं, कुठेही ढग दिसत नव्हते! ताबडतोब आवरून बाहेर पडलो. कुठे ते बाहेर पडेपर्यंत निश्चित माहित नव्हतं. बाहेर पडताना प्रभात रोडच्या दिशेने जायचं मनात होतं पण बिल्डिंगबाहेर पाय पडताच, ते सरळ अलका टॉकीज चौकाकडे चालू लागले. आणि मनातल्या मनात एक Google Map तयार झाला. अलका चौक, डेक्कन, जंगली महाराज रस्ता […]

Read More
दीप अमावस्या – एका कवीचे मनोगत (Deep Amavasya)
ब्लॉग, मुक्तांगण

दीप अमावस्या – एका कवीचे मनोगत (Deep Amavasya)

मला कायमच अंधार, दिवा आणि प्रकाश या त्रिवेणीने स्तंभित केलेले आहे. दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस म्हणजे तर या त्रिवेणीच्या अस्तित्त्वाचा उत्सवच! मग माझ्यातला कवी कसा काय स्वस्थ बसू शकतो? देवाच्या कृपेने मी अजून तरी स्वतःला “अंधार वाईट” या भ्रमापासून दूर ठेवू शकलेलो आहे. याचे कारण असे आहे की, अंधार नसला तर प्रकाशाचे काय महत्त्व […]

Read More
मृत्युंजयी सावरकर
ब्लॉग, मुक्तांगण

मृत्युंजयी सावरकर

प्रति मृत्युंजयी तात्याराव सावरकर, तुमचे चरणस्पर्श करून काही शब्द मांडायचा यत्न करतो आहे, जे काल २४ जुलै २०२२ सकाळपासून मनात एखाद्या वावटळासारखे घोंगावत आहेत. ज्या क्षणी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाने “मृत्युंजयी सावरकर” हे शब्द मंचाच्या पार्श्वभूमीवर मांडलेले पहिले, तेव्हापासून हे मानसिक धैर्य आणि शब्दशक्ती गोळा करायचा प्रयत्न करत आहे. कारण, अथांग आणि अनंत आकाशाच्या व्याप्तीचे […]

Read More