मला विचाराल तर नोकरदार मध्यमवर्ग स्वतःच्या घरात जन्माला आलेली कला आणि कलाकार यांच्यासाठी एक चिरंतन थडगे आहे. कलाकाराचा खून करून त्यावर आनंदाने भयाची चादर चढवली जाते आणि वर व्यावहारिक परिपक्वतेचे उपदेश एखाद्या नशेप्रमाणे एकदुसऱ्यांना दिले जातात. या थडग्यावर उभे राहून ही अहमामिका सुरू असते आणि कलाकार वास्तविकतेच्या ढिगाऱ्याखाली थडग्यात हुंदके देत असतो आणि विचारत असतो […]
बेरोजगारी .. ट्विटर निबंध
काल ट्विटर वर अगदी बेमालूमपणे एका हॅशटॅग बेरोजगारी यावर लिहू लागलो. लिहिता लिहिता हे लक्षातच आलं नाही की मी एक लघु निबंध किंवा छोटा ब्लॉगच लिहून काढलेला आहे. त्याच ट्विट्सचं संकलन खाली करत आहे. मी स्वतः नोकरी करतो त्यामुळे उद्योग आणि व्यवसाय यांवर फार बोलू शकणार नाही. पण जे नोकरी विषयक किंवा शिक्षण विषयक सल्ला […]
कावळे
गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या […]
Marriage Photo by Foto Pettine on Unsplash
सजातीय अंतरजातीय विवाह – एक मॉडर्न विचार
सध्या नेते मंडळी आपापली कामं करण्यापेक्षा, लोकांच्या लग्नांबद्दल जास्त चिंतीत दिसतात. लग्न सजातीय१ (एकाच जातीत) आहे की अंतरजातीय (वेगवेगळ्या जातीत) याची काळजी त्यांना दिवसरात्र झोपू देत नाहीये. आपण कंटाळवाणे लोक, असल्या जुन्या जातींच्या फंदात न पडता पुढे (म्हणजे पुढच्याच्या पुढे नव्हे) तर भविष्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या आजुबाजूला अशी अनंत उदाहरणे जिथे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा आणि इतर […]
Noise Pollution Image by mohamed Hassan from Pixabay
हॉर्न ओके पैसे
उत्क्रांतीच्या शर्यतीत माणूस बराच पुढे आला असला तरीही अजूनही काही माकडांच्या सवयी त्याने शाबूत ठेवल्या आहेत, असं आपल्याला सर्वसामान्यपणे रोज रस्त्यावर पदोपदी दिसत असतं. पण अशा या माकडपंथी लोकांना याचं अजिबात भान नसतं की आपल्या अशा वागण्याने माकडांची किती बदनामी होते. असो.. अशा या थोर विभुतींमध्ये माझ्या मते पहिला क्रमांक लागतो तो हॉर्न वाजवणाऱ्यांचा! त्यातून […]
‘फुले बटाटे आणि मी’ .. !
एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ?
ग्रेस तू का गेलास?
हे आजचं स्वप्न आहे. याला स्वप्न म्हणावं की मनाच्या कुठल्यातरी दूरच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एका बाळमुठीने लपवलेले एक रंगवलेले पान? अजून बरंच काही विचारायचं होतं मला. खिडकीतून सूर्य हळुहळू लुप्त होताना दिसत होता.पण तेवढ्यात डोळे उघडले आणि…ग्रेस तू का गेलास?