चकवा.. घटना साधारण १५-१६ वर्षांपूर्वीची आहे, मी आणि माझा मित्र सकाळी ११ च्या सुमारास तळजाई टेकडीवर जायला निघालो. आमच्या कॉलेज पासून साधारण ५-१० मिनिटं लागतात.
तळजाई देवीच्या मंदिराशेजारी दोन-तीन लहान मोठी चहाची दुकानं होती, त्यापैकीच एक दुकान आम्हा सर्वांचा कट्टा बनला होता, कॉलेज मध्ये कुठे दिसलो नाही तर इथे नक्की दिसणार. रोजचा कट्टा होता.
दुचाकीवरून मी आणि मित्र या कट्ट्यावर पोहोचलो, पाहतो तर सर्व दुकानं बंद. ११ वाजून गेले होते, सुट्टीचा दिवस नव्हता तर नेहमी चालू असणारी दुकानं आज बंद होती. काही कळेना. आम्ही तळजाई टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या “कॉर्नर” बेकरीकडे जायला निघालो. तिथे पोहोचलो तर ती बेकरीही बंद झाली होती. आता मात्र हद्द झाली, आज असं काय आहे की ११ वाजताच सगळं बंद झालं होतं.
मग अचानक नजर घड्याळाकडे गेली. ती वेळ पाहताच आम्ही दोघेही जागीच उडलो.
घड्याळात ४ वाजत आले होते. डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मोबाईल काढला तरी तेच, दोघांच्याही मोबाईल मध्ये ४ वाजत आले होते, कानामागून घाम आता ओघळू लागला होता. आम्ही तडक कॉलेज वर आलो, बघतो तर तिथेही शेवटचे लेक्चर चालू झाले होते.
साधारण ११.१५ ते ४ आम्ही कुठे होतो? आम्ही कोणत्या जगात होतो? कुठे भटकलो होतो? काय करत होतो? माहिती नाही.
आज एवढ्या वर्षांनीदेखील हा प्रसंग आठवून सर्रकन काटा येतो. चकवा काय असतो हे नकळत अनुभवलं होतं.
मूळ लेख 👇🏻 (आवडल्यास फेसबुक पेज ला लाईक करा, फोल्लोव करा आणि शेअर करा!)
आणखीन भुताच्या गोष्टी इथे वाचा.