काल ट्विटर वर अगदी बेमालूमपणे एका हॅशटॅग बेरोजगारी यावर लिहू लागलो. लिहिता लिहिता हे लक्षातच आलं नाही की मी एक लघु निबंध किंवा छोटा ब्लॉगच लिहून काढलेला आहे. त्याच ट्विट्सचं संकलन खाली करत आहे. मी स्वतः नोकरी करतो त्यामुळे उद्योग आणि व्यवसाय यांवर फार बोलू शकणार नाही. पण जे नोकरी विषयक किंवा शिक्षण विषयक सल्ला […]
कावळे
गॅलरीतून बाहेर डोकावलं तेव्हा झाडामध्ये फडफड होताना दिसली. काही कावळे तोंडात मांसाचा भलामोठा तुकडा असणाऱ्या कावळ्याला, वेढून बसले होते. आपल्या तीक्ष्ण नजरेने जणू ते धमकी देत होते. त्यांच्या त्या बघण्याची मला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. कारण मी एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला ठार मारताना बघितलेलं आहे. वेढ्यातल्या प्रत्येक कावळ्याला त्या तुकड्यामधला हिस्सा हवा होता. माझ्या […]

सजातीय अंतरजातीय विवाह – एक मॉडर्न विचार
सध्या नेते मंडळी आपापली कामं करण्यापेक्षा, लोकांच्या लग्नांबद्दल जास्त चिंतीत दिसतात. लग्न सजातीय१ (एकाच जातीत) आहे की अंतरजातीय (वेगवेगळ्या जातीत) याची काळजी त्यांना दिवसरात्र झोपू देत नाहीये. आपण कंटाळवाणे लोक, असल्या जुन्या जातींच्या फंदात न पडता पुढे (म्हणजे पुढच्याच्या पुढे नव्हे) तर भविष्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या आजुबाजूला अशी अनंत उदाहरणे जिथे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा आणि इतर […]

हॉर्न ओके पैसे
उत्क्रांतीच्या शर्यतीत माणूस बराच पुढे आला असला तरीही अजूनही काही माकडांच्या सवयी त्याने शाबूत ठेवल्या आहेत, असं आपल्याला सर्वसामान्यपणे रोज रस्त्यावर पदोपदी दिसत असतं. पण अशा या माकडपंथी लोकांना याचं अजिबात भान नसतं की आपल्या अशा वागण्याने माकडांची किती बदनामी होते. असो.. अशा या थोर विभुतींमध्ये माझ्या मते पहिला क्रमांक लागतो तो हॉर्न वाजवणाऱ्यांचा! त्यातून […]
अटकेपार भगवा झेंडा – पेशव्यांचा इतिहास
पार्श्वभूमी गेल्या काही दिवसांत पेशवे (ब्रिटिशांहून) क्रूर आणि भेदभाव करणारे म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. असो याबद्दल चर्चा नंतर. आजकाल पेशव्यांचा फक्त मोजकाच (स्वतःला पटतो तेवढाच) इतिहास वाचला, सांगितला आणि वापरला जातो, पण अटकेपार भगवा फडकवण्याबद्दल फारसं बोललं जात नाही! पण या सगळ्या इतिहासात आजचा दिवस बरेच जण विसरून गेलेत. ८ मे ही तारीख खरं तर कुठेतरी, […]
विमान प्रवास – इ-तिकीट
एकदा कुठून कुठे जायचं हे नक्की झालं की पुढचा मुद्दा येतो तिकीटाचा. सध्या सगळी विमान तिकिटे ऑनलाईन जातात. त्यामुळे तिकीट काढल्यावर हातात येतं ते म्हणजे इ-तिकीट. कुठल्याही इ-तिकीटावर खालील गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात..१. प्रवास करणाऱ्याचं नाव (Passenger Names)२. पी एन आर नंबर (PNR Number)३. गंतव्याचे ठिकाण (विमानतळ) (Departure/Departs)४. पोहोचायचे ठिकाण (विमानतळ) (Arrival/Arrives)५. विमान क्रमांक (Flight […]

पहिला विमान प्रवास?
घाबरू नका ! पहिला विमान प्रवास म्हटलं की आधी मनात विचार येतो तो म्हणजे.. “अरे बापरे !! आता कसं होणार ? आपल्याला हे जमणार का ?” म्हणूनच मी यावर थोडं मार्गदर्शन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे पुढे जायच्या आधी एकच गोष्ट सांगायची आहे “विमान प्रवास हा एक अत्यंत सोपा आणि सरळ प्रकार आहे. काही चुकीच्या कल्पनांमुळे […]
ती गेली तेव्हा रिमझिम (पूर्ण कविता)
ती गेली तेव्हा रिमझिम .. ही कवी ग्रेस यांची कविता घराघरात पोहोचली जेव्हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या कवितेला सुरांची जोड दिली. पण या गाण्यामध्ये कवितेतील फक्त तीनच कडवी घेतली गेली. त्यामुळे खूपशा लोकांना पूर्ण कविता माहित नाहीये. मी ही पूर्ण कविता सादर करत आहे ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होतामेघांत अडकली किरणे, हा सूर्य […]
शिवछत्रपती
देशी गनिमी उत्पात । स्वकीयांनी केला घातराहिली ना अब्रू घरात । जावे कोठे ?।। देवळे जाहली माती । संतांच्या जाळील्या पोथीस्वधर्म सोडूनी जाती । केविलवाणे ।। मावळ रक्तात न्हाता । सह्याद्री क्षीण होताजाहली तयांची माता । शिवनेरी ।। सांडोनी स्वतःचे जगणे । हिंदवी राज्य कारणेराज्याची बांधिली तोरणे । कडेकपारी ।। कुणी उमराव सरदार । पातशाहीचे […]
‘फुले बटाटे आणि मी’ .. !
एक शांत पक्षी अर्ध्या निष्पर्ण फांदीवर उभा एकटक कुठेतरी पहातो आहे आणि समोर बरीच झाडे. त्याला आठवत असेल का .. आत्तापर्यंत किती घरटी बांधली आणि ऋतू बदलला की सोडून दिली ?