उमाजी नाईक सिनेमा – १९३८
आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल थोडी माहिती शोधात असताना एक रोचक माहिती मिळाली. उमाजी नाईक यांच्यावर एक सिनेमा ४ जून १९३८ ला प्रदर्शित झाला होता.
आमच्या माहिती नुसार हा सिनेमा आणि त्याची चित्रफीत आता लोकांमध्ये (पब्लिक) उपलब्ध नाही. अधिक माहिती असणाऱ्यांनी आमच्या माहितीत नक्की वृद्धी करावी!
गुगल वर फार माहिती नाही मग आम्ही इतर अनेक ठिकाणी शोधल्यावर “बॉम्बे क्रॉनिकल” या मुंबईत छापल्या जाणाऱ्या नियतकालिकेत आम्हाला “उमाजी नाईक” या सिनेमाच्या काही जाहिराती, सिनेमाचे समालोचन आणि छायाचित्रे सापडली. वाचकांसाठी ती देत आहोत.
उमाजी नाईक सिनेमाची माहिती
निर्माते | उदय स्टुडिओ |
लेखक | विष्णुपंत औंधकर |
दिग्दर्शक | गजानन जहागीरदार |
नृत्य दिग्दर्शक | सरपोतदार |
संगीत | सदाशिव नार्वेकर |
गीते | विष्णू गणेश देशपांडे |
कलाकार | केशवराव दाते, मधुकर गुप्ते, कमला देवी बडोदेकर, शंकरराव भोसले, रजनी, सुशिला |
आता खाली बॉम्बे क्रॉनिकल मध्ये छापून आलेल्या जाहिराती आणि इतर माहिती पाहू.
१. जाहिरात – ४ जून १९३८ ला प्रदर्शित झाला
२. “उमाजी नाईक” सिनेमा चित्रपटातील एक क्षण – ८ जून १९३८
३. सिनेमाचे समीक्षण – ८ जून १९३८
४. जाहिरात – ११ जून १९३८ (२ रा आठवडा)
५. जाहिरात – २९ जून १९३८ (३ रा आठवडा)
६. “उमाजी नाईक” सिनेमा चित्रपटातील क्षण – २९ जून १९३८
रोचक:
- या चित्रपटाच्या जाहिरातींमध्ये महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाबद्दल काही विचार देखील मांडले गेले आहेत.
- या चित्रपटाद्वारे निर्माते निश्चितच सशस्त्र क्रांतीची कथा लोकांसमोर ठेवत आहेत. लोक, जे ब्रिटिशांच्या राज्यात गुलामीत जगत होते.
- ब्रिटिशांच्या राज्यात ब्रिटिशांच्या विरोधात मत मांडणारा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्याच्या नेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल शिकण्यासारखी बाब!
सध्या तरी आम्ही “उमाजी नाईक” या सिनेमा बद्दल ही माहिती शोधू शकलो. भविष्यात आणखीन माहिती मिळाली की पुन्हा तुमच्यासमोर सादर करू.
इतर ऐतिहासिक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.