मी स्वतः नोकरी करतो त्यामुळे उद्योग आणि व्यवसाय यांवर फार बोलू शकणार नाही. पण जे नोकरी विषयक किंवा शिक्षण विषयक सल्ला मागायला येतात त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे नुसत्या डिग्री वर अवलंबून राहू नका. काहीतरी वेगळी गोष्ट सुध्दा शिका, आत्मपरीक्षण करत रहा. #बेरोजगारी
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
मला अमेरिका आणि भारत यांमध्ये जो महत्वाचा फरक मला जाणवला तो म्हणजे Dignity of Labour म्हणजेच कष्टाची गरिमा. आपल्याकडे हे काम छोटे हे काम मोठे वगैरे फार आहे. आपल्याकडे सिनेमाची तिकिटे फाडणे कमीपणाचं लेखतात आणि कुणीही हे करायला पटकन तयार होणार नाही, पण मी हे केलेलं आहे. #बेरोजगारी
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
मी जर हे भारतात केलं असतं तर लोकांनी आणि मी ही स्वतःला कमी लेखलं असतं.पडेल ते काम करण्याची तयारी असायला हवी.आज लाखो युवक #बेरोजगारी म्हणून रडत आहेत पण एकही उद्या झाडू उचलणार नाही,इस्त्री करणार नाही दुकानात सेल्समन होणार नाही कारण आपण शिक्षण मिळवलं म्हणजे ढगाला हात लागले असं वाटतं
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
कधीतरी स्वतःलाही आरश्यात बघितलं पाहिजे. स्वतःच्या परिस्थितीला सतत दुसऱ्यांना दोष देणारे समाजाच्या काहीही भल्याचे नाहीत आणि स्वतःचा ही उत्कर्ष करत नाहीत. प्रयत्न करा, कष्ट करा.. २०० अर्ज केल्यावर नोकरी मिळते पण १९९ अर्ज करायला घाबरु नका आणि थकू नका. #बेरोजगारी
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
शिक्षण आणि ज्ञान यातला फरक ओळखा.डिग्री मिळाली म्हणजे तुम्ही ज्ञानी होत नाही आणि नुसतीच एखादी गोष्ट येते म्हणून अति आत्मविश्वास ठेवू नका.स्वतःला कशात गती आहे ओळखा.मित्राने केलं,घरच्यांनी सांगितलं,सध्या डिमांड आहे म्हणून शिकणार असाल तर #बेरोजगारी ला तुम्हीच जबाबदार आहात.
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
अजून एक भाकड गोष्ट म्हणजे सचिन तेंडूलकर चे आणि बिल गेट्स इत्यादींचे दाखले देत शिक्षणाला, गुणांना कमी लेखणे. तुम्ही सचिन नाही, बिल गेट्स नाही आणि मार्क झुकरबर्ग देखील नाही त्यामुळे फालतू गोष्टींवर लक्ष्य न देता अभ्यासावर लक्ष्य द्या चांगले गुण मिळवा. #बेरोजगारी #वास्तव
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
सगळ्यात महत्त्वाचं #बेरोजगारी बेरोजगारी करत रडत बसल्याने काहीही होणार नाहीये. प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. नाहीतर काळ एखाद्या बुलडोझर सारखा तुम्हाला चिरडून पुढे निघून जाईल. जागे व्हा. वेळ आणि शक्ती सत्कारणी लावा.
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
सगळ्यांनाच व्यवसाय करता येत नाही, त्या साठी लागणारी चलाखी देखील नसते. दुसरा कोणीतरी सांगतो म्हणून नाही तिथे लाखो पैसे गुंतवू नका. आधी त्या व्यवसायाचे ज्ञान मिळवा, अभ्यास करा मगच त्यात पडा. नोकरी सोडून व्यवसायाच्या मागे गेलेले #बेरोजगारी त पडलेले तरुण मी पाहिलेले आहेत.
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
आणि हो जमलंच तर ट्विटर, व्हॉट्सऍप, फेसबुक कमी करा. #बेरोजगारी मध्ये नोकरी धंद्यावर लक्ष्य जास्त द्या आणि राजकारणावर कमी. दुसऱ्याकडे जर सद्गुण असतील तर त्याची जात नंतर बघा नाहीतर निराशेच्या गर्तेत पडून रहाल. सरकार आयुष्याला पुरे पडणार नाहीये हे सत्य मान्य करा. स्वतः कष्ट करा.
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019
बोलण्यासारखं लिहिण्यासारखं खूप काही आहे. मुख्य मुद्दा हाच की वायफळ अपेक्षा न ठेवता वास्तविकता ओळखून निर्णय घ्या आणि प्रयत्न करा. सकारात्मक रहा. #बेरोजगारी
— Rohit Bapat 🇮🇳 (@rhtbapat) February 3, 2019