महाराष्ट्री समाजात पेशव्यांच्या इतिहासाबद्दल एकंदरीतच अज्ञान आणि गैरसमज खूप आहेत. इतिहासाची पाने उलगडली तर असे लक्षात येते की ज्या त्या काळाची जगण्याची एक व्यवस्था असते, जी त्या कालानुरूप बनलेली असते. कालच्या व्यवस्थेचे आजच्या व्यवस्थेशी तुलनात्मक अध्ययन करणे तसे अवघड असते. तसेच आजची व्यवस्था ५० वर्षांनंतर अत्यंत दूषित ठरवली जाणार नाही कशावरून? असो, मुद्दा इतकाच की […]
मोगरा फुलला – मूळ रचना आणि भावार्थ
मोगरा फुलला.. “मोगरा फुलला.. मोगरा फुलला” संत ज्ञानेश्वर माऊलींनी आंतरिक सुखाच्या अनुभवाचे वर्णन या रचनेत केलेले आहे. कै. लतादीदींचे स्वर कानावर पडले की अध्यात्मिक अमृताचे तुषार अंगावर अलगद पडू लागल्यासारखे वाटते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि लतादीदींचे स्वर हा एक वेगळाच सात्विक योग आहे. कैक वर्षे ही रचना फक्त मराठीच नव्हे तर अमराठी लोक सुद्धा […]
मॅडम तुसाद – कलाकार, फ्रेंच राज्यक्रांती आणि रक्तरंजित इतिहास
मॅडम तुसाद – एक प्रसिद्ध अपरिचित कलाकार मॅडम तुसाद (Madame Tussaud) (१ डिसेंबर, १७६१ – १६ एप्रिल, १८५०), एक प्रसिद्ध मूर्तिकार. त्यांचे मूळ नाव “मेरी”. आज त्यांनी स्थापित केलेली मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये Madame Tussauds जगभरात प्रसिद्ध आहेत. गरिबीतून मार्ग काढत, नशिबाची साथ मिळत नावारूपास आलेल्या मॅडम तुसाद यांची आयुष्यगाथा खूप रोचक आहे. खरं सांगायचं तर […]
मनुस्मृति – आदरातिथ्य आणि अतिथी
मनुस्मृति ग्रंथातील तिसऱ्या अध्यायात अतिथी आणि आदरातिथ्य यांच्याविषयी काही शिकवण दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यातील काही गोष्टी आजही अनेक घरांमध्ये पाळल्या जातात. सनातन धर्मातील अनेक गोष्टी निसर्ग आणि मानव यांच्या एकत्त्वावर आधारित असल्याने ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत, मानवी आचाराला धरून आहे त्याचे प्रतिबिंब भारतीयांच्या आयुष्यात दिसून येते. मनुस्मृति च्या या अध्यायात तिसऱ्या अध्यायात अतिथी कोण […]
साटं-लोटं म्हणजे काय? – इतिहास आणि व्युत्पत्ति
साटं-लोटं आणि मराठी लहानपणापासून साटं-लोटं हा शब्दप्रयोग कानावर पडत आलेला आहे. माझ्या मते प्रत्येक मराठी माणसाने कधी ना कधी हा “साटं-लोटं करणे” हा वाक्प्रचार उपयोगात आणलेला आहे किंवा ऐकलेला आहे. मी सर्वप्रथम “साटं-लोटं” शब्दप्रयोग ऐकला तो लग्नाच्या बाबतीत. माझ्या नातेवाईकांमध्ये एका कुटुंबात असे झालेले आहे. दोन कुटुंबातील मुलामुलींचे विवाह एकमेकांच्या कुटुंबात होणे म्हणजे साटं-लोटं! थोडक्यात […]
फकीर – मराठी कविता
या माझ्या चालण्या, थांबण्या अडखळण्याच्या परिक्रमेतील अजून एक पडाव म्हणजे फकिराचं कोंदण लाभलेलं क्षणिक वैराग्य. खरं तर वैराग्याचा अर्थ फार मोठा आहे. त्याच्या अनंत पसरलेल्या पाउलखुणांवर वर्षानुवर्ष साचत आलेल्या अध्यात्मिक भस्माला माझ्या सारख्या सामान्य माणसाचा उसासा काय हलवणार? संसारावर, आयुष्यावर प्रेम करायचं असेल तर एकदा तरी वैराग्याची भावना दाटून यावी लागते एकदा तरी फकिराचे फाटके […]
Caught Out: Crime. Corruption. Cricket – एक झुकलेले आभाळ
क्रिकेट आणि आपण “Caught Out: Crime. Corruption. Cricket” आजच Netflix हा माहितीपट / शोधपट पाहिला आणि अनेक विचार मनात दाटून आले. क्रिकेट.. कोणाही सामान्य भारतीयाप्रमाणे मलाही क्रिकेट आवडायचे. साधारणपणे भारतात क्रिकेट अजिबात न आवडणार्या माणसाकडे आंबा न आवडणार्या माणसासारखे बघितले जायचे. पण तेव्हा तो “खेळ” होता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजच्या काळात क्रिकेटला निव्वळ खेळ […]
William Wordsworth – She Dwelt among the Untrodden Ways (मराठी रसग्रहण)
William Wordsworth William Wordsworth, इंग्रजी काव्यांगणातील एक अढळ तारा! आज ७ एप्रिल William Wordsworth यांचा जन्मदिवस. एक Romantic Poet किंवा कल्पनाविश्वात रममाण होणारा कवी अशी त्यांची ख्याती. Romantic या शब्दाचा अर्थ प्रणयरम्य असाही होतो. एकंदरीतच प्रेमाच्या अनंत रंगांनी आपले कल्पनाविश्व ज्यांनी रंगवले आणि त्यातच रमले अशा कवींपैकी एक William Wordsworth. त्यांची आठवण म्हणून त्यांचीच एक […]
प्रांतप्रर्थाना – मोरोपंत पराडकर पुण्यतिथी
मोरोपंत पराडकर “महाकवी” मोरोपंत पराडकर, मराठी साहित्यातील अखेरचे महाकवी म्हणून ज्यांची ओळख आहे ते मोरोपंत पराडकर. रामभक्त मोरोपंतांचे शके १७१६ चैत्र शुद्ध पौर्णिमेला देहावसान झाले. इतिहासकार त्यांच्या अखेर क्षणाचे वर्णन “मोरोपंत रामरूप झाले” असा करतात. मोरोपंत संत नव्हते पण अत्यंत चारित्र्यवान पुरुष होते. थोर रामभक्त आणि मराठी भाषेवर, निस्सीम प्रेम करणारे कवी होते. कविता करायची […]
Poom Lim – देवाने तारलेला माणूस!
द्वितीय युद्ध आणि बुडलेले जहाज “देव तारी त्याला कोण मारी ?” किंवा “वह शमा क्या मुझे जिसे रोशन खुदा करे”, हे खरं आहे! आपला काळ सरण्याच्या आधी कोणीही जात नाही आणि आपला काळ झाल्यानंतर कोणीही राहात नाही. आयुष्यात असे कित्येक प्रसंग येतात जेव्हा असं वाटतं की आता आयुष्य उरलेलं नाही. छोट्या छोट्या आजारांनी सुद्धा माणसं […]