महाराष्ट्री समाजात पेशव्यांच्या इतिहासाबद्दल एकंदरीतच अज्ञान आणि गैरसमज खूप आहेत. इतिहासाची पाने उलगडली तर असे लक्षात येते की ज्या त्या काळाची जगण्याची एक व्यवस्था असते, जी त्या कालानुरूप बनलेली असते. कालच्या व्यवस्थेचे आजच्या व्यवस्थेशी तुलनात्मक अध्ययन करणे तसे अवघड असते. तसेच आजची व्यवस्था ५० वर्षांनंतर अत्यंत दूषित ठरवली जाणार नाही कशावरून? असो, मुद्दा इतकाच की इतिहासाचा अभ्यास करताना, त्यावर टीका टिपणी करताना काळाचे भान ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला इतिहासातील अनेक गोष्टींबद्दल गैरसमज असतात. जे केवळ ज्ञानानेच दूर होऊ शकते. आपल्याकडे पूर्वी बलुतेदार पद्धती होती हे तर सर्वांना ठाऊक आहे. अर्थातच पेशव्यांच्या काळातही ही पद्धती होती. पण पेशव्यांनी दलित बलुतेदारांवर अन्याय केल्याचे विनापुरावे दाखले सतत दिले जातात. पण, आज पेशवेकालीन कागदपत्रे वाचत असताना मोठी विलक्षण बाब समोर आली. जी या ब्लॉगमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे.

वरील “पेशवेकालीन” बलुत्याच्या वाटणीत एक महत्त्वाची बाब आपल्याला आढळून येईल. लोकांच्या समजाच्या विरुद्ध, चांभार, मांग आणि महार या दलित वर्गातील बलुतेदार मंडळींना सर्वाधिक वाटणी देण्यात आलेली आणि जोशी, गुरव, सोनार आणि मुलाणा यांना सगळ्यात कमी!
यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की बलुत्याची वाटणी जातींच्या श्रेष्ठ – कनिष्ठतेवर, स्पृश्यास्पृश्यतेवर अवलंबून नाही. एका सनदेत नाही म्हणजे किमान त्या काली हे कायद्याला धरूनच होते! तसे नसते तर असा निवाडा दिलाच गेला नसता. यावरून असेही समजायला हरकत नाही की, बलुत्यांची वाटणी स्थळ, काळ आणि उपयुक्तता यांवर अवलंबून होती. इतकेच नव्हे तर जामीन देण्यासाठी किंवा साक्ष मांडण्यासाठी सर्व बलुतेदार मंडळींना सामान हक्क होता. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतील खालील उल्लेख पाहा

मुद्दा इतकाच की इतिहासाबद्दल स्वतः वाचन करण्याआधी मत बनवणे तसेच पुराव्याखेरीज मांडलेली मते घातक आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे पेशव्यांबद्दल अनेक गैरसमज समाजात सहज पसरवले जातात याला एकच उत्तर आहे अज्ञान दूर करणे!