September 13, 2025

Category: साहित्य

पंचचामर वृत्त – नियम आणि उदाहरणे
अक्षरगणवृत्त, ब्लॉग, वृत्त, व्याकरण, साहित्य

पंचचामर वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – पंचचामर वृत्त प्रकार – अक्षरगणवृत्त (समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – १६ + १५ वृत्त अक्षर संख्या – ११ + ११ गणांची विभागणी – ज, र, ज, र, ज, ग (ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा । ल गा ल गा) यति – इंद्रवज्रा आणि […]

Read More
नेणीव म्हणजे काय?
अध्यात्म, कविता, ब्लॉग, मुक्तांगण, ललित, साहित्य

नेणीव म्हणजे काय?

“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]

Read More
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
अध्यात्म, इतिहास/आख्यायिका, प्रवास, फेरफटका, ब्लॉग

जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १

१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]

Read More
बोअरिंग जॉब? ऐका भगवद्गीता काय सांगते
अध्यात्म, ब्लॉग, मुक्तांगण, साहित्य, स्तोत्र

बोअरिंग जॉब? ऐका भगवद्गीता काय सांगते

प्रत्येकाच्या आजूबाजूला किमान एक व्यक्ती तरी असतेच जिला आपला जॉब बोअरिंग वाटत असतो, कंटाळवाणा वाटत असतो. त्या व्यक्तीला जर आपण विचारलं “मग कशाला करतोयस हे काम?” तर ती व्यक्ती कुटुंब, अर्थार्जन इत्यादींचा आधार घेत म्हणते “पर्याय नाही”. अशा वेळेस त्याला काय उत्तर द्यावं किंवा सांगावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर, “निष्काम कर्मयोगाचे तत्वज्ञान” अवघ्या […]

Read More
“पाटील” शब्दाचा रोचक इतिहास
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग, साहित्य

“पाटील” शब्दाचा रोचक इतिहास

इतिहासाची पाने पालटताना “पाटील” शब्दाबद्दल एक वेगळा संदर्भ सापडला. याबद्दल आम्ही पूर्वी वाचले नव्हते. शिलाहार राजवंशातील हरिपालदेव राजाचा ठाण्यातील आगाशी नावाच्या गावी शक संवत १०७२ सालचा एक शिलालेख सापडला होता. त्याच्या मजकुराचा उद्देश खालीलप्रमाणे या मजकुरात “पट्टकिल” म्हणजेच पाटील असा उल्लेख ठळकपणे दिसत आहे. हा शिलालेख वाचल्यावर आम्ही संशोधन सुरु केले. तेव्हा लक्षात आले की […]

Read More
ये रे घना, ये रे घना – आरती प्रभू – रसग्रहण
कविता, ब्लॉग, रसग्रहण, साहित्य

ये रे घना, ये रे घना – आरती प्रभू – रसग्रहण

काही काही गाणी मराठी मनात अगदी खोलवर रुजलेली आहेत. इतकी की गाण्याच्या सुरुवातीचा संगीताचा नुसता एक स्वर जरी ऐकवला तरीही संपूर्ण गाणं मनातल्या मनात आपोआप सुरु होतं एखाद्या रेकॉर्ड प्लेअर सारखं. त्याच मनातल्या ऑल टाईम फेव्हरिट गाण्यांच्या यादीतले एक गाणे म्हणजे “ये रे घना, ये रे घना”! चिं त्र्यं खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांचे शब्द, […]

Read More
आरती करितो गणपतीदेवा – गणपतीची आरती
अध्यात्म, आरती संग्रह, साहित्य

आरती करितो गणपतीदेवा – गणपतीची आरती

शब्दयात्री कडून भक्तांसाठी गणपतीची आणखीन एक नितांत सुंदर आरती आरती करितो गणपतीदेवा, दे मज मति आतां।सर्व संकटे हरिसी सत्वर, गुण तुझे गातां॥धृ.॥ पार्वतीतनया विघ्ननाशका, तारिसी तू भक्तां ।उद्धरले जड मूढ सर्वहि, नाम तुझे गातां॥१॥ नित्य निरंतर भजतां येईल, निजपद तें हातां।म्हणून चरणी लीन सदा हरि, तल्लीन तुज पाहतां॥२॥

Read More
घनाक्षरी वृत्त – नियम आणि उदाहरणे
ब्लॉग, मात्रावृत्त, वृत्त, व्याकरण, साहित्य

घनाक्षरी वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – घनाक्षरी वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – ३१ / ३२ / ३३ मात्रांची विभागणी – घनाक्षरी वृत्तात पहिल्या तीन चरणात ८ मात्रा आणि शेवटच्या चरणात ७/८/९ मात्रा असतात. मात्र जर शेवटच्या चरणात जेवढ्या मात्र असतील तितक्याच मात्रा काव्याच्या अखेरपर्यंत असल्या पाहिजेत हा नियम आहे. यति – ८ – […]

Read More
माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन
पुस्तक, प्रवास, ब्लॉग, समालोचन

माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन

अमरनाथ यात्रा आणि मंदिराबद्दल कोणाला माहिती नाही!? खरं सांगायचं तर प्रवासवर्णन हा काही माझा पुस्तक प्रकारातला आवडता विषय (genre) नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या दुकानातील या विभागाकडे मी बघत सुद्धा नाही. पण, हे प्रवासवर्णन किंवा “यात्रा-वर्णन” देव काकांनी लिहिले असल्यामुळे वाचणे क्रमप्राप्त होते. वाचायला थोडा उशीर झाला हे मात्र खरं पण ते माझ्या आवडी-नावडीमुळे नव्हे तर […]

Read More
कोकिळा वृत्त – नियम आणि उदाहरणे
ब्लॉग, मात्रावृत्त, वृत्त, व्याकरण, साहित्य

कोकिळा वृत्त – नियम आणि उदाहरणे

वृत्ताचे नाव – कोकिळा वृत्त प्रकार – मात्रावृत्त (अर्ध समवृत्त) वृत्त मात्रा संख्या – २६ (चंद्रकांत) + १६ (पादाकुलक) मात्रांची विभागणी – कोकिळा वृत्तात पहिल्या चरणात २६ मात्रा आणि पुढील चरणात १६ मात्रा असतात, त्यामुळे हे अर्धसमवृत्त आहे. यति – चंद्रकांत आणि पादाकुलक यांचे यति नियम लागू पडतात. नियम – पहिल्या चरणात (धृपद) चंद्रकांतच्या २६ […]

Read More