ही एक फार जूनी कथा आहे, एका माणसाला त्याच्या बायकोचे भूत दिसत असे. तर झालं असं की.. एक तरुण बायको आजारामुळे मरणासन्न झालेली होती. तिचे तिच्या नवऱ्यावर अतोनात प्रेम असते. जेव्हा तिला जाणीव होते की, मरण जवळ येऊन ठेपलेली असते तेव्हा ती नवऱ्याला सांगते, “माझे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे. मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये आणि तुम्ही देखील माझ्यापासून […]
झेन कथा मराठीत – खरं प्रेम (True Love)
ही कथा आहे खरं प्रेम आणि वरवर असणारे आकर्षण यांच्याबद्दल.. एका झेन मठात जवळजवळ २० पुरुष अनुयायी आणि एक एशून नावाची महिला अनुयायी, एका मोठ्या गुरूंच्याकडे झेन पंथाची आराधना करत होते, ध्यान करत होते. एशून एक सुंदर स्त्री होती, तरुण होती आणि डोक्यावरचे केस मुंडन करून आणि अगदी साधे कपडे परिधान करूनही ती आकर्षक दिसत […]

झेन कथा मराठीत – आंधळा आणि कंदील (Blind man and Lantern)
एकदा एक आंधळा माणूस दुपारी एका मित्राकडे भेटायला गेला. गप्पा मारता मारता रात्र झाली, अंधार पडला. आंधळा माणूस घरी जायला निघतो. आंधळा माणूस आणि त्याच्या मित्राच्या घराच्या मध्ये एक जंगल असते. हा माणूस घरी जायला निघणार तेवढ्यात त्याचा मित्र त्याला थांबवतो आणि म्हणतो “मित्रा अंधार पडलाय थांब जरा” असं म्हणून एक कागदी कंदील घेऊन येतो […]
झेन कथा मराठीत – चोर शिष्य झाला! (Thief Becomes Disciple)
एकदा झेन गुरू शिचिरी कोजुन, आपल्या घरी मंत्रोच्चारण करत बसलेले होते. एक चोर हातात तलवार घेऊन त्यांच्या घरात शिरतो आणि गुरूंना तलवार दाखवून धमकी देतो “सगळे पैसे काढा नाहीतर मी जीव घेईन” शिचिरी गुरू यत्किंचितही विचलित न होता उत्तर देतात “पैसे तिकडे कपाटात आहेत, तिकडून घे माझ्या मंत्रोच्चारात व्यत्यय आणू नकोस” चोर कपाटातून पैसे काढायला […]

झेन कथा मराठीत – अतृप्त माणूस (More Is Not Enough)
एक दगड फोडून आपले पोट भरणारा माणूस स्वतःच्या परिस्थितीवर अत्यंत दुःखी होता. त्याला सतत वाटत असे की आपण सामर्थ्यवान व्हावं. एकदा बाजारातून जात असताना तो एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या दाराशी उभा राहतो. दारातून अनेक धनाढ्य आणि इतर मान मरातब असलेले लोक त्या व्यापाऱ्याला भेटायला येत जात होते. व्यापारी स्वतः सुंदर अशा बंगल्यात उंची कपडे घालून बसलेला […]
झेन कथा मराठीत – आज्ञापालन (Obedience)
झेन गुरू बांकेई पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्यांच्या व्याख्यानाला येत असत. फक्त झेन पंथीयच नव्हे तर इतर पंथांचे लोक देखील त्यांचे व्याख्यान ऐकायला यायचे. याचे मुख्य कारण असे होते की गुरू बांकेई आपल्या व्याख्यानात झेन पंथाचे काहीही सांगत नसत. ते फक्त मनापासून जगण्याबद्दल उपदेश करत असत. त्यांची लोकप्रियता बघून निचिरेन पंथाचे एक गुरू […]

झेन कथा मराठीत – हत्ती आणि आंधळे (Lord Buddha’s Teachings)
एकदा वेगवेगळे धर्म आणि पंथ मानणाऱ्या काही लोकांमध्ये खूप वादावादी झाली. प्रत्येक जण “आमचाच देव खरा आहे आणि आमचीच देवाची व्याख्या खरी आहे” या मतावर ठाम होते. त्यांच्यातला वाद विकोपाला गेला तेव्हा त्यांनी गौतम बुद्धाकडे जायचं ठरवलं. गौतमाने शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकलं आणि शिष्यांना एक सुंदर हत्ती व चार आंधळ्यांना घेऊन यायला सांगितलं. काही वेळाने […]
झेन कथा मराठीत – चूक आणि बरोबर (Right and Wrong)
झेन गुरू बांकेई यांच्या ध्यानसाधनेच्या मठात जपानमधील अनेक झेन पंथाचे अनेक शिष्य आणि पालन करणारे सामील होत असत. एकदा अशा मेळाव्यात बरेच जण सामील झाले होते. एक शिष्य चोरी करताना पकडला गेला. इतर शिष्य, चोरी करणाऱ्या शिष्याला मठातून काढून टाकण्यासाठी तक्रार घेऊन बांकेईंकडे गेले. पण बांकेई गुरूंनी त्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पण पुन्हा एकदा तोच शिष्य चोरी करताना पकडला गेला. आता मात्र इतर शिष्य […]
झेन कथा मराठीत – गोड फळ (Delicious Fruit)
एकदा एका माणसाच्या मागे एक वाघ लागला. माणूस जीवाला वाचवण्यासाठी जंगलातून पळत सुटला. वाघ पाठलाग करत होता. पळता पळता माणूस एका खोल दरीच्या इथे पोहोचला. वाघ पाठलाग करतच होता. शेवटी तो माणूस त्या दरीमध्ये जाणाऱ्या एका वेलीला धरून दरीमध्ये उतरला. त्याला वाटलं की सुटलो. तो वाघ त्या दरीच्या वर उभा होता. माणूस त्या दरीमध्ये, एका […]
झेन कथा मराठीत – खरंच का !? (Really !?)
झेन गुरू हाकुईन हे एक अत्यंत साधे, सरळ व स्वच्छ चारित्र्याचे म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होते. त्यांच्या घराच्या शेजारी एका भाजीवाल्याचे घर होते. भाजीवाल्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. एके दिवशी अचानक भाजीवाला आणि त्याच्या बायकोला समजतं की त्यांची मुलगी गरोदर आहे! भाजीवाला आणि त्याची बायको अत्यंत रागावतात आणि तिला गर्भातील मुलाचा बाप कोण आहे विचारतात. […]