“बोबडा बलराम” नात्याने मोठ्या पण वयाने लहान “दादा”च्या निरागसतेचे दर्शन घडवणारी गदिमा यांची एक अप्रतिम कविता. लहान वयाचा बलराम, कृष्ण सावळा आहे म्हणून यशोदेला काय काय उपाय कर म्हणजे कृष्ण गोरा होईल ते अगदी भाबडेपणाने सांगत आहे. यात “तू गोरी, मी गोरा मग हा कृष्ण काळा कसा?” असा प्रश्न देखील हा बोबडा बलराम आईला विचारतो. अत्यंत वेगळी अशी ही कविता. या कवितेला एक प्रायोगिक कविता म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ही कविता वाचता वाचता बालरामाचे भाबडे आणि बोबडे स्वर, गदिमा अगदी डोळ्यांसमोर उभे करतात.
दूद नको पाज्यू हलीला काल्या कपिलेचे काला या मनती आइ ग, पोल गुलाक्याचे तूच घेउनी पगलाखाली पाजत जा या शांज-शकाली तुजियाशम गोले, होउदे लूप शोनूल्याचे तूही गोली, मीही गोला काला का हा किशन् एकला? लावु नको तित्ती, नको ग बोत काजलाचे थेउ नको ग याच्यापाशी वाल्यामधल्या काल्या दाशी देउ नका याला, नहाया पानी यमुनेचे पालनयात तू याच्या घाली फुले गोजिली चाप्यावलली लावित जा अंगा, पांधले गंद चंदनाचे नकोश निजवू या अंधाली दिवे थेव ग उशास लात्ली दावु नको याला कधीही खेल शावल्यांचे नको दाखवू, नको बोलवू झालावलचे काले काउ हंश याश दावी, शाजिले धवल्या पंखांचे हंशाशंगे याश खेलुदे चांदाशंगे गोथ्थ बोलुदे ल्हाउ देत भवती, थवेही गौल-गौलनींचे मथुलेहुन तु आन चिताली गोली कल ही मूल्ती काली हशशी का बाई, कलेना कालन हशन्याचे ? – गदिमा (ग. दि. माडगूळकर)
गदिमांच्या “जोगिया” या कवितेचे रसग्रहण इथे वाचा..
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]