नारद उवाच
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम् ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ||
मराठी अनुवाद
श्री नारद मुनी म्हणतात की सर्वप्रथम नतमस्तक होऊन गौरीपुत्र विनायक, अष्टविनायक यांना नमन करूया. श्रीगणेशाला नमन केल्यावर, प्रतिदिन आयु (आरोग्य), मनोकामना आणि सिद्धी (सुख-संपदा) प्राप्तीसाठी या १२ नामांचे स्मरण करावे.
१ वक्रतुंड
२ एकदन्त
३ कृष्णपिंगाक्ष
४ गजवक्र
५ लंबोदर
६ विकट
७ विघ्नराजेन्द्र
८ घूम्रवर्ण
९ भालचन्द्र
१० विनायक
११ गणपति
१२ गजानन
जो मनुष्य सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी (तिन्ही संध्या) या बारा नामांचे स्मरण, पठण, उच्चारण करेल त्याला विघ्नाचे भय स्पर्श देखील करत नाही आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे उत्तम साधन आहे.
या नामजपाने विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र आणि मोक्षार्थ्याला मोक्ष प्राप्त होतो. या गणपती स्तोत्राचे नित्य जप करा. सहा महिने जप करणाऱ्या मनुष्याला इच्छित फलप्राप्ती होते. एक वर्ष जप करणाऱ्या मनुष्याला सिद्धी प्राप्त होते यात शंका नाही. या स्तोत्राला (भोजपत्रावर) लिहून जो ८ ब्राह्मणांना दान करेल त्याला, श्री गणेशाच्या कृपेने (प्रसाद) सर्व विद्या प्राप्त होतील.
अशा तऱ्हेने श्री नारद पुराणात दिलेले संकटनाशन श्रीगणेश स्तोत्र संपूर्ण होत आहे.
संपूर्ण आरती संग्रहासाठी इथे क्लिक करा