झेन गुरू बांकेई पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्यांच्या व्याख्यानाला येत असत. फक्त झेन पंथीयच नव्हे तर इतर पंथांचे लोक देखील त्यांचे व्याख्यान ऐकायला यायचे. याचे मुख्य कारण असे होते की गुरू बांकेई आपल्या व्याख्यानात झेन पंथाचे काहीही सांगत नसत. ते फक्त मनापासून जगण्याबद्दल उपदेश करत असत. त्यांची लोकप्रियता बघून निचिरेन पंथाचे एक गुरू […]
Image by Sasin Tipchai from Pixabay
झेन कथा मराठीत – हत्ती आणि आंधळे (Lord Buddha’s Teachings)
एकदा वेगवेगळे धर्म आणि पंथ मानणाऱ्या काही लोकांमध्ये खूप वादावादी झाली. प्रत्येक जण “आमचाच देव खरा आहे आणि आमचीच देवाची व्याख्या खरी आहे” या मतावर ठाम होते. त्यांच्यातला वाद विकोपाला गेला तेव्हा त्यांनी गौतम बुद्धाकडे जायचं ठरवलं. गौतमाने शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकलं आणि शिष्यांना एक सुंदर हत्ती व चार आंधळ्यांना घेऊन यायला सांगितलं. काही वेळाने […]
झेन कथा मराठीत – गोड फळ (Delicious Fruit)
एकदा एका माणसाच्या मागे एक वाघ लागला. माणूस जीवाला वाचवण्यासाठी जंगलातून पळत सुटला. वाघ पाठलाग करत होता. पळता पळता माणूस एका खोल दरीच्या इथे पोहोचला. वाघ पाठलाग करतच होता. शेवटी तो माणूस त्या दरीमध्ये जाणाऱ्या एका वेलीला धरून दरीमध्ये उतरला. त्याला वाटलं की सुटलो. तो वाघ त्या दरीच्या वर उभा होता. माणूस त्या दरीमध्ये, एका […]
झेन कथा मराठीत – खरंच का !? (Really !?)
झेन गुरू हाकुईन हे एक अत्यंत साधे, सरळ व स्वच्छ चारित्र्याचे म्हणून सर्वदूर प्रसिद्ध होते. त्यांच्या घराच्या शेजारी एका भाजीवाल्याचे घर होते. भाजीवाल्याला एक सुंदर तरुण मुलगी होती. एके दिवशी अचानक भाजीवाला आणि त्याच्या बायकोला समजतं की त्यांची मुलगी गरोदर आहे! भाजीवाला आणि त्याची बायको अत्यंत रागावतात आणि तिला गर्भातील मुलाचा बाप कोण आहे विचारतात. […]
झेन कथा मराठीत – भरलेला पेला (Empty Cup)
एकोणिसाव्या शतकात जपानमध्ये नान’इन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. त्यांची ख्याती ऐकून एका युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर नान’इन यांना भेटायला येतात. प्रोफेसर पाश्चात्य शिक्षण घेतलेले होते. प्रोफेसर, नान’इन यांना भेटायला त्यांच्या घरी येतात. झेन गुरू त्यांचे यथोचित स्वागत करतात आणि त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारतात. “आम्ही तुमच्याकडून झेनबद्दल माहिती घ्यायला. झेनबद्दल शिकायला आलेलो […]
झेन कथा मराठीत – मी संन्यासी का झालो (Why I became a monk?)
वृद्ध झेन गुरू शांत स्वरात म्हणाले,
“कधी वेळ मिळालाच.. तर मी संन्यासी का झालो ही कथा तुम्हाला सांगेन”
झेन कथा मराठीत – कदाचित (Maybe)
“तू खूप नशीबवान आहेस..” इचिरोच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी पटकन बोलला
आणि पुन्हा एकदा इचिरो शांतपणे उत्तरतो.. “कदाचित!”