दारू म्हटलं की लोक नाक मुरडतात. पण अशांसाठी गालिब म्हणतो “कंबख्त तू ने पी ही नहीं”. मद्य आणि काव्य यांचा तसाही अगदी वैदिक काळापासून संबंध आहे. प्रत्येक काळातील कवींनी आपापल्या परीने मद्य आणि काव्य यांच्या संयोगाने निर्मण होणाऱ्या आभासी पण पूर्णसत्य दर्शी विश्वाच्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न विंदा करंदीकर यांच्या “प्यालो किती […]
बीज अंकुरे अंकुरे – रसग्रहण आणि भावार्थ
“बीज अंकुरे अंकुरे” कुणाला माहित नसलेला ८० आणि ९० च्या दशकात वाढलेला मराठी माणूस शोधूनच काढावा लागेल. मधुकर पांडुरंग आरकडे यांची ही अप्रतिम कविता! ही कविता मराठी पाठ्यपुस्तकात तर होतीच आणि “गोट्या” नावाच्या मराठी मालिकेचे शीर्षक गीत म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे! अशोक पत्की यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केलेले आहे. हे गाणे आणि हे शब्द […]
पांढरे हत्ती – कवी ग्रेस – अर्थ आणि भावार्थ
ग्रेस! नुसते नाव वाचले तरी माणूस हळूहळू आपल्या विश्वातून एका अव्यक्त भावनांच्या राईत प्रयाण करू लागतो. प्रत्येक शब्द जणू एक लोलक आहे ज्याला अनंत पैलू आहेत. रसिक संदर्भांच्या खिडक्यांतून विविध पैलू बघत बघत एका अनंत प्रवासात निघून जातो. कवी ग्रेस यांच्या कविता मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत हे म्हणणं म्हणजे सूर्याला ‘तो बघा सूर्य’ म्हणण्यासारखं आहे. […]
मधु मागसि माझ्या सख्या परि – हिंदी अनुवाद
राजकवी भा रा तांबे यांची “रिकामे मधुघट” किंवा लोकांना परिचित असलेले शीर्षक म्हणजे “मधु मागसि माझ्या सख्या परि” ही कविता माहित नसलेला मराठी शोधूनच काढावा लागेल. पण या कवितेचा हिंदी अनुवाद आहे हे किती जणांना माहित आहे? आज जुनी मासिके वगैरे चाळत असताना १९५९ सालच्या, हिंदी डायजेस्ट “नवनीत” मध्ये स्व. पंडित नरेंद्र शर्मा यांनी, मधू […]
काटा रूते कुणाला – कविता, किस्सा आणि रसग्रहण
काटा रूते कुणाला, आक्रंदतात कोणी। मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे! हे शब्द कानी पडताच मराठी रसिकांच्या मनात आणि मुखात “वाह” किंवा “आह” या प्रतिक्रिया अगदी नैसर्गिकरित्या उमटली नाही तर त्याला रसिक म्हणावे की नाही अशी शंका मनात येईल. खरं सांगायचं तर, कवयित्री शांताबाई शेळके मराठी वाङ्मयाला लाभल्या, मराठी मातीत जन्माला आल्या हा एक दैवयोगच […]
पेशवे आणि दलित बलुतेदार
महाराष्ट्री समाजात पेशव्यांच्या इतिहासाबद्दल एकंदरीतच अज्ञान आणि गैरसमज खूप आहेत. इतिहासाची पाने उलगडली तर असे लक्षात येते की ज्या त्या काळाची जगण्याची एक व्यवस्था असते, जी त्या कालानुरूप बनलेली असते. कालच्या व्यवस्थेचे आजच्या व्यवस्थेशी तुलनात्मक अध्ययन करणे तसे अवघड असते. तसेच आजची व्यवस्था ५० वर्षांनंतर अत्यंत दूषित ठरवली जाणार नाही कशावरून? असो, मुद्दा इतकाच की […]
मॅडम तुसाद – कलाकार, फ्रेंच राज्यक्रांती आणि रक्तरंजित इतिहास
मॅडम तुसाद – एक प्रसिद्ध अपरिचित कलाकार मॅडम तुसाद (Madame Tussaud) (१ डिसेंबर, १७६१ – १६ एप्रिल, १८५०), एक प्रसिद्ध मूर्तिकार. त्यांचे मूळ नाव “मेरी”. आज त्यांनी स्थापित केलेली मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये Madame Tussauds जगभरात प्रसिद्ध आहेत. गरिबीतून मार्ग काढत, नशिबाची साथ मिळत नावारूपास आलेल्या मॅडम तुसाद यांची आयुष्यगाथा खूप रोचक आहे. खरं सांगायचं तर […]
Caught Out: Crime. Corruption. Cricket – एक झुकलेले आभाळ
क्रिकेट आणि आपण “Caught Out: Crime. Corruption. Cricket” आजच Netflix हा माहितीपट / शोधपट पाहिला आणि अनेक विचार मनात दाटून आले. क्रिकेट.. कोणाही सामान्य भारतीयाप्रमाणे मलाही क्रिकेट आवडायचे. साधारणपणे भारतात क्रिकेट अजिबात न आवडणार्या माणसाकडे आंबा न आवडणार्या माणसासारखे बघितले जायचे. पण तेव्हा तो “खेळ” होता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजच्या काळात क्रिकेटला निव्वळ खेळ […]
संथ वाहते कृष्णामाई! – चित्रपट आणि भावार्थ
संथ वाहते कृष्णामाई – एका दुपारची गोष्ट संध्येच्या दिशेने झुकत चाललेल्या एका निवांत दुपारी गिटार वाजवत असताना अचानक राग “वृंदावनी सारंग” चे काही स्वर आपोआप छेडले गेले आणि नकळत “संथ वाहते कृष्णामाई” या गीताचे बोल वाजवू लागलो. लहानपणापासून हे गाणे ऐकत आलेलो आहे. या नितांत सुंदर आणि भावपूर्ण गीताचे बोल मला वाजवता आले याचा आनंद […]
Pattie Boyd “Layla” – एक अपरिचित लैला
Pattie Boyd “Layla” आज १७ मार्च म्हणजे Pattie Boyd “Layla” चा जन्मदिन! Pattie Boyd हे नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला ही व्यक्ती नक्की कोण आहे हे समजणार नाही! संदर्भ देखील लागणार नाहीत. पण ज्यांना Rock संगीतात रस आहे त्यांच्या कानावरून Eric Clapton या कलाकाराचे Layla हे गाणे एकदा तरी जातेच. जिच्या प्रेमात पडून Eric Clapton ला […]