December 9, 2024
चिपळूण शहराच्या नावाच्या इतिहास

चिपळूण शहराच्या नावाच्या इतिहास

Spread the love

आम्ही बापट, आमचे मूळगाव कोकणातील चिपळूण पासून जेमतेम ८ मैल अंतरावर आहे. सांगायचा मुद्दा इतकाच की इतिहासातील चित्त्पावनांबद्दल काही संदर्भ शोधत असताना “भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे” एक पत्रक वाचनात आले. या पत्रकातील चित्त्पावनांबद्दलच्या इतिहासाबद्दल रा. वि. का राजवाडे यांच्या प्रबंधात या शहराच्या नावाच्या इतिहासाबद्दल माहिती दिलेली आहे. त्या पत्रकाचा संदर्भ खाली देईनच.

तर त्या प्रबंधात काही गोष्टी मांडलेल्या आहेत.

  1. या शहराचा उल्लेख साधारण २०० वर्षांपूर्वीच्या लेखांतून “चिपोळण” असा झालेला दिसतो.
  2. शब्दाची फोड चि + पळूण अशी केली पाहिजे
  3. चिपोळण, या शब्दातील “पोळण” हा शब्द “पुलिन” या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. पुलिन म्हणजे नदीचा अथवा समुद्राचा तट किंवा नदी अथवा समुद्रातील छोटे बेट. आपण मराठीत याला पुळण म्हणतो.
  4. यावरून चिपळूण या शब्दाचे पूर्वी रूप “चिपोळिण” किंवा “चिपोलिन” असले पाहिजे कारण पूर्वीच्या लेखांत हे उल्लेख सापडतात. काही कागदपत्रांत “चिपुळिण” असाही उल्लेख सापडतात.
  5. आता चिपळूण मधील “चि” चा इतिहास पाहू. शहर, आत्ता मोठे झाले पण पूर्वी तर ही फक्त वस्ती होती.
  6. पूर्वीचे गाव दोन नद्यांच्या मधील पुळणावर वसलेले होते. या दोन नद्या म्हणजे वसिष्ठी आणि शिव.
  7. यातील दुसरी नदी शिव नदीच्या नावावरून म्हणजेच “शिव” + “पुलिन” असे “शिवपुलिन” असे बनले.
  8. शिवपुलिन शद्बाचा अपभ्रंश सिवपुलिन किंवा सिवपुळिण आणि त्याचा अपभ्रंश चिअपुळिण आणि पुढे त्याचा अपभ्रंश चिपुळिण.
  9. आणि चिपुळिण शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे चिपळूण असे झाले.
  10. थोडक्यात शिव नदीच्या पुळणावर वसलेले गाव म्हणजे चिपळूण!

अनेक लोकांना वाटतं की चिपळूण शहराच्या नावाचा आणि चित्तपावन यांचा काहीही संबंध नाही!

भगवान परशुराम मंदिर (चिपळूण)

याच शहराच्या जवळ परशुराम पर्वत आहे जिथे भगवान परशुराम यांनी तपश्चर्या केली होती आणि तिथेच त्यांचे वास्तव्य होते. आजही तेथे भगवान परशुराम यांचे सुंदर मंदिर आहे. भगवान परशुराम, हा परशुराम पर्वत आणि चित्तपावन ब्राह्मण यांचा काय संबंध आहे ते पुन्हा कधीतरी सांगेन. तूर्तास हा ब्लॉग चिपळूण शहराच्या नावापुरता ठेवू.

ब्लॉग आवडला असल्यास नक्की इतरांपर्यंत पोहोचवा. इतर इतिहास विषयक ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


संदर्भ

  1. भारतीय इतिहास संशोधक मंडळ (द्वितीय संमेलन वृत्त)
  2. पुलिन शब्दाचे अर्थ
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *